सनईच्या सुरात गुपित...भाग 9
अनिरुद्धने तो कागद पाहून गडबडीत फोन काढला.
"आपण लगेच हे कुणाला तरी द्यायला हवं. कदाचित हेच पुरावे आपल्याला न्याय मिळवून देतील."
सायली आणि अनिरुद्ध आता एका मोठ्या निर्णयाच्या टप्प्यावर उभे होते. हे पुरावे पोलिसांकडे द्यायचे का? की अधिक खोलवर चौकशी करायची?
"आईने सांगितलं होतं की सत्य कधी कधी शांत ठेवलेलं बरं असतं." सायली विचारात पडली.
"पण काही वेळा सत्य बाहेर आलं पाहिजे." अनिरुद्ध म्हणाला.
"आपण हे पुरावे योग्य ठिकाणी पोहोचवू."
सायली विचारात पडली.
सायली विचारात पडली.
"खरंच हे केल्यानं काही फरक पडेल?"
सायली आणि अनिरुद्ध गोंधळात पडले होते. पुरावे हाती होते पण पुढचं पाऊल काय टाकायचं हे ठरत नव्हतं.
"आपण हे पोलिसांकडे दिलं तर कदाचित सुदर्शनरावांना शिक्षा होईल." अनिरुद्ध म्हणाला.
"पण त्यासोबतच आपल्या कुटुंबावरही मोठा परिणाम होईल." सायली काळजीने म्हणाली.
"आईनेही सांगितलं होतं की काही सत्यं बाहेर आल्यावर नाती तुटू शकतात."
त्या क्षणीच त्यांच्या समोर आणखी एक अडथळा आला.
काही मिनिटांतच देशमुख कुटुंबाचे मोठे वकील देशपांडे सर थेट त्यांच्या घरात आले.
"सायली अनिरुद्ध मला माहित आहे की तुम्हाला काही माहिती मिळाली आहे." ते थेट विषयावर आले.
सायली आणि अनिरुद्ध अवाक झाले. त्यांना एवढ्या लवकर कसं कळलं?
"काय माहिती? कोणती माहिती? तुम्ही कशाबद्दल बोलताय." अनिरुद्ध अडखळत बोलला.
"अनिरुद्ध तुला चांगलंच माहित आहे मी कशाबद्दल बोलतोय. त्यावर आपण बोलू शकतो आणि मी तुम्हाला अधिक माहिती देऊ शकतो."
"काय सांगायचं आहे तुम्हाला?" अनिरुद्ध थोडा तणावात म्हणाला.
"तुम्ही हे पुरावे पोलिसांकडे द्यायचं ठरवलंत तर संपूर्ण कुटुंब बदनाम होईल. सुदर्शनरावांनी काही चूक केली असेल पण त्या काळात त्यांनी अनेक मोठ्या लोकांची मदतही केली आहे. आता त्यांना शिक्षा झाली तर देशमुख कुटुंबावरच डाग लागेल."
सायली आणि अनिरुद्ध एकमेकांकडे पाहू लागले.
"म्हणजे तुम्ही आम्हाला थांबवायला आलात?" सायलीने थेट विचारलं.
"नाही मी तुम्हाला एक संधी द्यायला आलो आहे."
वकील गंभीर आवाजात म्हणाले.
"सुदर्शनराव हे मान्य करायला तयार आहेत की त्यांनी काही गैरव्यवहार केले होते. पण त्याऐवजी आपण हे पुरावे गुप्त ठेवले तर ते स्वतःहून सामाजिक कार्यात काही योगदान देतील त्यांच्या वाईट कर्मांची काहीतरी भरपाई करतील."
"सुदर्शनराव हे मान्य करायला तयार आहेत की त्यांनी काही गैरव्यवहार केले होते. पण त्याऐवजी आपण हे पुरावे गुप्त ठेवले तर ते स्वतःहून सामाजिक कार्यात काही योगदान देतील त्यांच्या वाईट कर्मांची काहीतरी भरपाई करतील."
सायलीला आश्चर्य वाटलं.
"म्हणजे एकप्रकारे सत्याचा सौदा?"
"म्हणजे एकप्रकारे सत्याचा सौदा?"
"तुम्हाला काय योग्य वाटतं ते करा." वकील म्हणाले.
"पण या निर्णयाचा परिणाम फक्त सुदर्शनरावांवर नाही तर तुमच्या कुटुंबावरही होईल."
वकील गेल्यावर सायली आणि अनिरुद्ध खोल विचार करू लागले.
"काय करायचं?" अनिरुद्ध विचारात पडला.
"आपण न्यायासाठी लढायचं की कुटुंबासाठी गप्प राहायचं?"
सायली शांत बसली होती.
सायली शांत बसली होती.
तिला आईचे शब्द आठवत होते कधी कधी सत्य लपवणं हीच मोठी शिक्षा असते.
"माझ्या मनात एक वेगळा विचार आहे," सायली अचानक म्हणाली.
"काय?" अनिरुद्ध उत्सुकतेने विचारलं.
"आपण हे पुरावे गुप्त ठेवू पण एका अटीवर."
"कुठल्या अटीवर?"
"सुदर्शनरावांनी फक्त सामाजिक कार्य नाही करायचं तर त्यांच्या गैरव्यवहारामुळे ज्यांचं नुकसान झालं त्यांना भरपाई द्यायची."
अनिरुद्ध विचार करू लागला.
"म्हणजे एका वेगळ्या प्रकारे न्याय मिळवायचा?"
सायलीने मान डोलावली.
"आपण पोलिसांचा मार्ग न निवडता सत्याचा वेगळा उपयोग करू शकतो."
सायली आणि अनिरुद्धने वकिलांशी पुन्हा संपर्क साधला आणि आपला निर्णय सांगितला.
"सुदर्शनरावांना एक संधी मिळेल पण त्यांनी त्यांच्या चुकीची किंमत मोजली पाहिजे." अनिरुद्ध ठामपणे म्हणाला.
काही आठवड्यांतच सुदर्शन देशमुख यांनी एका मोठ्या पत्रकार परिषदेत आपला भूतकाळ कबूल केला आणि समाजासाठी मोठे योगदान देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी आपल्या संपत्तीचा मोठा भाग सामाजिक कार्यासाठी देण्याचं कबूल केलं.
त्यांना शिक्षा झाली नाही पण त्यांचं नाव कायमचं बदनाम झालं.
त्यांना शिक्षा झाली नाही पण त्यांचं नाव कायमचं बदनाम झालं.
सायली आणि अनिरुद्धने कदाचित तातडीचा न्याय मिळवला नव्हता पण त्यांनी एक वेगळा मार्ग निवडला जो त्यांच्या कुटुंबासाठी आणि न्यायासाठी योग्य होता.
काही दिवसांतच देशमुख कुटुंबावर नवे वादळ कोसळले.
त्या रात्री सायली आणि अनिरुद्ध जेवायला बसले होते, तेवढ्यात फोन वाजला, अनोळखी नंबर होता. अनिरुद्धने कॉल उचलला.
"अनिरुद्ध देशमुख?" पलिकडून एक गंभीर आणि खोल आवाज ऐकू आला.
"हो, कोण बोलतंय?" अनिरुद्ध सावध झाला.
"तुम्हाला वाटतं की तुम्ही एका कबुलीपत्राने खेळ संपवलात? पण काही गोष्टी अजून उघड व्हायच्या आहेत. सत्य लपवलं तरी सावल्या असतातच."
अनिरुद्ध आणि सायली एकमेकांकडे पाहू लागले. तो आवाज काहीसा ओळखीचा वाटला.
"तुला काय म्हणायचंय?" अनिरुद्धने आवाज कडक केला.
"देशमुख कुटुंबाचं अजून एक गुपित आहे आणि ते उघड झालं तर तुमचा हा सौदा कुठलाही उपयोगाचा ठरणार नाही."
पलिकडून फोन कट झाला.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेज वर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा