सनईच्या सुरात गुपित...भाग 10
"देशमुख कुटुंबाचं अजून एक गुपित आहे आणि ते उघड झालं तर तुमचा हा सौदा कुठलाही उपयोगाचा ठरणार नाही."
पलिकडून फोन कट झाला.
सायलीने घाबरून अनिरुद्धकडे पाहिलं.
"हा कोण होता? आणखी कुठलं गुपित?"
अनिरुद्धला काही सुचेना.
दोघे विचार करत असतानाच दार ठोठावल्याचा आवाज झाला.
दोघे विचार करत असतानाच दार ठोठावल्याचा आवाज झाला.
सायलीने दरवाजा उघडला आणि समोर एक पत्र पडलेलं होतं. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं,
"तुम्हाला वाटतंय की सत्याचा सौदा तुम्ही जिंकलात? खेळ तर आता सुरू झाला आहे."
सायलीने पत्र हातात घेताच तिच्या हाताला काही चिकटसर लागलं. तिने भीतीने बोटं पाहिली ती लालसर झाली होती रक्तासारखी..
त्या रात्री दोघांनाही झोप लागली नव्हती. अनिरुद्धने वकील देशपांडे यांना फोन लावला पण त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीनं पेपर उघडला आणि पहिल्याच पानावर मोठी बातमी झळकली होती.
"देशमुख कुटुंबाच्या जुन्या प्रकरणात नवा ट्विस्ट...
एका अनोळखी व्यक्तीने मोठा गौप्यस्फोट
करण्याची धमकी दिली.."
एका अनोळखी व्यक्तीने मोठा गौप्यस्फोट
करण्याची धमकी दिली.."
सायलीच्या हातातला पेपर थरथरत होता,
तिने घाबरून अनिरुद्धकडे पाहिलं.
"हे प्रकरण अजून संपलेलं नाही अनिरुद्ध आपण एखाद्या मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर आहोत."
अनिरुद्धने तिच्या हातून पेपर घेतला आणि बातमी नीट वाचू लागला.
"देशमुख कुटुंबाच्या जुन्या प्रकरणात नवा ट्विस्ट...
एका अनोळखी व्यक्तीने मोठा गौप्यस्फोट करण्याची धमकी दिली..."
एका अनोळखी व्यक्तीने मोठा गौप्यस्फोट करण्याची धमकी दिली..."
त्याच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं, या प्रकरणाचा आणि त्यांच्या सौद्याचा काही संबंध आहे का? आणि तो फोन करणारा माणूस कोण?
तितक्यात त्याच्या मोबाईलवर पुन्हा एक अनोळखी नंबर झळकला.
"हॅलो." अनिरुद्धने काळजीने फोन उचलला.
"तुम्ही अजून काहीच समजून घेतलेलं नाहीये देशमुख. एक महत्त्वाचं गुपित अजून उघड व्हायचंय." पलिकडून हसण्याचा आवाज आला.
"लवकरच तुमच्यासमोर सत्याचं असं रूप येईल ज्यामुळे तुमचं आयुष्यच बदलून जाईल."
अनिरुद्ध काही बोलणार तोच फोन कट झाला.
"काय म्हणत होते?" सायलीने घाईने विचारलं.
"हे असं कोण खेळतंय आपल्यासोबत?" अनिरुद्धच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता.
तेवढ्यात बेल वाजली.
सायलीने दार उघडलं समोर पेपरात गुंडाळलेला एक लिफाफा पडलेला होता. तिने काळजीपूर्वक तो उचलला. आत एक जुना पिवळसर पडलेला फोटो होता.
फोटोमध्ये एक भव्य वाडा दिसत होता. वाड्यासमोर उभ्या असलेल्या चार व्यक्तींपैकी एक चेहरा तिला परिचित वाटला… तो देशमुख कुटुंबाच्या जुन्या फोटोमधील दिसत होता.
"अनिरुद्ध हा फोटो बघ, ह्या वाड्याचा आणि आपल्या कुटुंबाचा काही संबंध आहे का?"
अनिरुद्धने फोटो नीट पाहिला आणि तो गारठला.
"हे शक्य नाही, हा तर आपल्या आजोबांचा वाडा आहे पण तो कित्येक वर्षांपूर्वी नष्ट झाला असं सांगितलं जातं."
"म्हणजे काहीतरी खोटं सांगितलं गेलंय." सायलीने पुटपुटलं
त्या क्षणी त्यांच्या घराचा फोन वाजला.
सायलीने संकोचत रिसीव्हर उचलला.
"तुमच्या हातातला फोटो नीट बघा," पलिकडून ओळखीचा आवाज ऐकू आला.
"त्या वाड्यात एक गुपित दडलेलं आहे आणि ही फक्त सुरुवात आहे."
फोन कट झाला.
सायली आणि अनिरुद्ध एकमेकांकडे बघत राहिले आता हा खेळ अधिकच गडद होत चालला होता.
त्या अनोळखी फोन कॉलने सायली आणि अनिरुद्धला अस्वस्थ केलं होतं. पण त्याच वेळी घरातलं वातावरण हलकंफुलकं होतं.
रोहनचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्याच्या बायकोला अनिकाला घराशी जुळवून घ्यायला वेळ लागत होता. ती गोड स्वभावाची आणि प्रेमळ होती पण मोठ्या कुटुंबात नवी नवरी म्हणून तिला स्वतःला सिद्ध करायचं होतं.
"बाबा आम्ही आज फिरायला जायचं ठरवलंय." रोहनने सांगितलं.
"कुठे?" अनिरुद्धने विचारलं.
"असं ठिकाण ठरवलं नाहीये अजून पण समुद्रकिनारा किंवा एखादा सुंदर हिल स्टेशन बघूया म्हणतो." अनिका हसत म्हणाली.
सायलीने त्यांच्याकडे समाधानाने बघितलं. घरात लग्नानंतरचा आनंदी माहोल होता पण तिच्या मनात अजूनही त्या गूढ फोन कॉलचा विचार घोळत होता.
त्याच संध्याकाळी रोहन आणि अनिका फिरायला गेले. समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना लाटांचा आवाज आणि मऊ वाळू त्यांना नव्या आयुष्याची गोडी अनुभवायला लावत होती.
"खरं सांगू?" रोहनने अनिकाकडे बघत विचारलं.
"काय?
"लग्नाआधी कधी वाटलंच नव्हतं मला हे सगळं इतकं रोमँटिक असतं."
अनिकाने हसत त्याच्या खांद्यावर हलकीशी टपली मारली. "तेच म्हणते तू इतका बोरिंग आहेस की, आधी वाटलं होतं तू मला फिरायला नेणारच नाहीस."
"अगं आता नव्याने सगळं शिकतोय."
त्या दोघांचा गप्पांचा ओघ सुरू असतानाच तिकडे सायली आणि अनिरुद्ध अजूनही त्या फोटोच्या गूढतेत अडकले होते.
"हा वाडा कुठे आहे? हे शोधायचं आहे." अनिरुद्धने ठामपणे म्हटलं.
सायलीने फोटो पुन्हा पाहिला. एका कोपऱ्यात हलकासा मिटलेला शिक्का दिसत होता.
'देशमुख वाडा १९७५'
'देशमुख वाडा १९७५'
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेज वर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा