*सांग ना गं आई मला*
सांग ना गं आई मला तू
नेहमी करते ना मी अभ्यास,
रोजच करुन कंटाळते गं
रविवार तरी असू दे खास.
नेहमी करते ना मी अभ्यास,
रोजच करुन कंटाळते गं
रविवार तरी असू दे खास.
सुट्टीच्या दिवशी आम्ही
होऊन छान फुलपाखरू,
उंच उंच गं उडून हवेत
मस्त मजेत फेऱ्या मारु.
होऊन छान फुलपाखरू,
उंच उंच गं उडून हवेत
मस्त मजेत फेऱ्या मारु.
दोस्तांसोबत रंगवू गप्पा
गंमती जमती भारी खूप,
देशील का गं खायला तू
साखर चपाती लावून तूप.
गंमती जमती भारी खूप,
देशील का गं खायला तू
साखर चपाती लावून तूप.
तुला तर आहे माहित
नाही मी मुळीच हट्टी,
हसत खेळत सर्वांशी
करते मी खूपच गट्टी.
नाही मी मुळीच हट्टी,
हसत खेळत सर्वांशी
करते मी खूपच गट्टी.
नको देऊ मला मोबाईल
दोस्तांसोबतच खेळेन,
मनसोक्तपणे दंग होऊन
मैदानावर बागडत पळेन.
दोस्तांसोबतच खेळेन,
मनसोक्तपणे दंग होऊन
मैदानावर बागडत पळेन.
दिवसभर थकुन भागून
येईन जेव्हा मी घरी ऐटीत,
सांग ना गं आई मला तू
घेशील का गं तुझ्या मिठीत.
-------------------------
©®सौ. वनिता गणेश शिंदे
येईन जेव्हा मी घरी ऐटीत,
सांग ना गं आई मला तू
घेशील का गं तुझ्या मिठीत.
-------------------------
©®सौ. वनिता गणेश शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा