"श्लोक, हे बघ... हा व्हाईट शर्ट मी आजच धुतलाय. जर यावर चुकून शाईचा एक थेंब जरी पडला ना, तरी पूर्ण शर्ट खराब दिसणार. कितीही महागडा साबण वापरला तरी तो डाग जात नाही. माणसाचं चारित्र्यही या पांढऱ्या शर्टसारखं असतं रे राजा, एकदा डाग पडला की तो पुसता येत नाही!"
पुण्यातील एका साध्या पण छोटया फ्लॅटच्या बाल्कनीत बसून विवेक आपल्या चौदा वर्षांच्या मुलाला, श्लोकला समजावून सांगत होता. विवेक एका खाजगी बँकेत नोकरीला होता तर श्लोक नुकताच नववीत गेला होता.
श्लोक थोडा वैतागून म्हणाला,
" बाबा, पण यात माझ्या मित्रांचा काय संबंध रे? "
अद्वैत आणि त्याचे मित्र फक्त स्टाईल मारतात, त्यात काय एवढं ? आपण कोणासोबत फिरतो यापेक्षा आपण स्वतः कसे आहोत हे महत्त्वाचं नाही का ? "
अद्वैत आणि त्याचे मित्र फक्त स्टाईल मारतात, त्यात काय एवढं ? आपण कोणासोबत फिरतो यापेक्षा आपण स्वतः कसे आहोत हे महत्त्वाचं नाही का ? "
विवेक हसला आणि त्याने बाल्कनी मध्ये ठेवलेल्या कुंडीतील गुलाबाच्या रोपाकडे बोट दाखवले.
"श्लोक, हे बघ गुलाबाचं रोप. याला सुगंधी फुलांसोबत काट्यांचीही साथ असते. पण हेच रोप जर तू निवडुंगाच्या शेजारी लावलंस ना, तर काही दिवसांनी तुला गुलाबाचा सुगंध कमी आणि काट्यांचा त्रास जास्त जाणवेल. आपण कोणासोबत बसतो-उठतो, यावरूनच जगाला आपली ओळख पटते."
" पण बाबा, अद्वैत मला रोज शाळेनंतर त्यांच्या ग्रुपमध्ये बोलवतो. ते सगळे मोठ्या घरचे आहेत, महागड्या गाड्यांमधून येतात. त्यांच्यासोबत राहिलो तर माझी कॉन्फिडन्स वाढेल असं वाटतं मला. " श्लोकने आपलं मत मांडलं.
विवेकने श्लोकच्या खांद्यावर हात ठेवला.
" बडी , कॉन्फिडन्स आणि मग्रुरी यात पुसटशी रेषा असते. तुला आठवतंय ? तुझा जुना मित्र तन्मय ? बिचारा साध्या सायकलवर येतो, पण गेल्या परीक्षेत जेव्हा तुला गणित समजत नव्हतं, तेव्हा तो स्वतःचे खेळ सोडून तुझ्यासोबत दोन तास बसला होता. ती मैत्री तुला पुढे नेणारी होती. आणि अद्वैत ? काल जेव्हा तू सायकलवरून पडला होतास, तेव्हा तो तुला उचलण्याऐवजी तुझ्या पडण्यावर हसत उभा होता. ही मैत्री तुला खाली ओढणारी आहे."
श्लोक विचारात पडला. त्याच्या मनात अद्वैतची झगमगाटी दुनिया आणि तन्मयचा साधा स्वभाव यांचा संघर्ष सुरू झाला.
विवेक पुढे म्हणाला ,
" लक्षात ठेव श्लोक, कोळशाच्या खाणीत कितीही जपून चाललास तरी कपड्यांना काळीख लागतेच. मित्र निवडताना ते तुमच्या गुणांचे कौतुक करणारे हवेत, तुमच्या चुकांवर टाळ्या वाजवणारे नव्हे."
त्याच वेळी श्लोकच्या फोनवर अद्वैतचा मेसेज आला. विवेकचे कान सावध झाले.
" लक्षात ठेव श्लोक, कोळशाच्या खाणीत कितीही जपून चाललास तरी कपड्यांना काळीख लागतेच. मित्र निवडताना ते तुमच्या गुणांचे कौतुक करणारे हवेत, तुमच्या चुकांवर टाळ्या वाजवणारे नव्हे."
त्याच वेळी श्लोकच्या फोनवर अद्वैतचा मेसेज आला. विवेकचे कान सावध झाले.
" आज रात्री गच्चीवर पार्टी आहे, चोरून ये. बाबांना सांगू नकोस. खूप मज्जा येईल ! "
श्लोकने फोन बघितला आणि मग वडिलांकडे पाहिले. वडिलांच्या डोळ्यांत एक अनामिक भीती आणि विश्वास दोन्ही होते.
अद्वैतचा मेसेज वाचून श्लोकचं मन द्विधा मनस्थितीत अडकलं. एकीकडे वडिलांनी दिलेला व्हाईट शर्टाच एक्झामपल होत आणि दुसरीकडे अद्वैतच्या ग्रुपमध्ये सामील होऊन कूल दिसण्याची ओढ होती. शेवटी, वयानुसार येणाऱ्या कुतूहलाचा विजय झाला.
रात्री अकरा वाजता, जेव्हा विवेक आणि त्याची बायको गाढ झोपले होते, तेव्हा श्लोक चोरपावलांनी घराबाहेर पडला. अद्वैतच्या टोलेजंग बंगल्याच्या गच्चीवर पार्टी सुरू होती. जोर जोरात संगीत, महागडे पिझ्झा आणि हातात डबे घेऊन काही मुलं धिंगाणा घालत होती.
श्लोक तिथे पोहोचल्यावर ...
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा