संघर्ष अस्तित्वाचा ५ @ प्रेरणादायी कथा
( मागच्या भागात आपण पाहिलं की कावेरी मोहन आणि सासरच्या मंडळींच्या तावडीतून सुटून जाते. पण कोणीच आपलं नाही मग अश्या जगण्याचा काय उपयोग असा विचार करून कावेरी नदीच्या पुलावरून उड्डी मारायला जाते पण तिथून जाणाऱ्या माधुरीला ती दिसते आणि माधुरी तिला वाचवते आणि आपल्या घरी घेवून जाते. कावेरी थोडी सावरल्यावर कावेरी सर्व कहाणी माधुरीला सांगते. चिडलेली माधुरी कावेरीला पोलिसात तक्रार करायला सांगते. पण खचलेल्या कावेरीत तेवढी हिम्मत नसते. त्यामुळे मला फक्त शांत आणि स्वतःच्या पायावर उभं राहून आयुष्य जगायचं आहे असं म्हणते. त्यावर माधुरी कावेरीला एक नवीन व्यक्तिमत्व द्यायचं ठरवते.... आता पुढे..... )
कावेरी माधुरीला म्हणते, " माधुरी तुझी खूप ओळख असेल ना, मग मला नोकरी बघ ना कुठे तरी. किती दिवस मी असं बसून राहू. " यावर माधुरी म्हणते, " कावेरी ते ठीक आहे पण तुझं शिक्षण जेमतेम १२ वी झालं आहे. त्यात तूला कुठलाही अनुभव नाही, त्यामुळे नोकरी मिळणं थोडं कठीण आहे. "
हे ऐकून कावेरीचा चेहरा पडतो. ते पाहून माधुरी म्हणते, " मी काय म्हणते कावेरी आपण एक काम करू, आधी तूला आपण Basic Computer Classes लावूयात. २-३ महिन्यांचा Course असतो. त्यामुळे तूला नोकरी लागण्याचे chance वाढतील आणि मी काही ठिकाणी सांगून ही ठेवेन म्हणजे तोपर्यंत काही ना काही होईलच. "
कावेरी - " म्हणजे Computer Class साठी पैसे तूच भरणार. आधीच मी तुझ्या घरात राहते. मी...... "
माधुरी कावेरीला मधेच तोडत म्हणते, " अगं बाई आता देतेय, तूला नोकरी लागली की मला थोडे थोडे परत कर. पण प्लीज आता उपकाराची भाषा सुरु नको करुस. "
माधुरीचं बोलणं कावेरीला पटलं.
कावेरीचे Computer classes सुरु झाले. कावेरी सर्व घर आवरून आपलं काम आणि अभ्यास करत होती. हळूहळू कावेरीला आत्मविश्वास वाटू लागला. Course पूर्ण होता होता माधुरीने सांगितले की एका डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये काम आहे. सकाळी ९ ते १ आणि संध्याकाळी ५ ते १० शिवाय क्लिनिक घरापासून १० मिनिट च्या अंतरावर होतं. पगार कमी होता पण सध्या चालण्यासारखा होता. Computer चालवणे येणे महत्वाचे होते, कारण रुग्णांचे डिटेल्स सर्व computer मधेच ठेवत होते. कावेरीची ही नोकरी पक्की झाली आणि कावेरीने आनंदाने माधुरीला मिठी मारली. त्यावर माधुरीने कावेरीला विचारलं, " मधल्या वेळेचं काय करणार आहेस? " त्यावर कावेरी म्हणते, " घरातलं आवरून आणि रात्रीच जेवण बनवून जाईन. " यावर माधुरी म्हणते, " कावेरी घरकामाच्या बाहेर कधी पडणार तू? "
कावेरी, " म्हणजे? "
माधुरी, " म्हणजे आता आपण तुझं ऍडमिशन करणार अहोत. Distance ने शिक्षण पूर्ण कर. मध्ये मिळालेल्या वेळेत अभ्यास कर, पायावर उभं राहायचं आहे ना? मग भक्कम उभं राहायचं. "
कावेरीला माधुरीचं बोलणं पटत. ती पुढचं शिक्षण करायला तयार होते. माधुरी शिक्षण बोर्ड मधून कावेरीच्या Duplicate Result मागवून घेते.
कावेरी आता Distance ने शिक्षण घेऊ लागते आणि आता हळूहळू कावेरीचा आत्मविश्वासही वाढत असतो. जन्मापासून आतापर्यंत घुसमट सहन करणारी कावेरी आता मोकळा श्वास घेत होती. हे नवीन आयुष्य आता तिला आवडू लागलं होतं. आपण स्वतः ही आयुष्यात काही करू शकतो असं या आधी कधीच कावेरीच्या मनात आलं नव्हतं. त्यामुळे कदाचित ती होणार अन्याय निमूटपणे सहन करत होती. ही गोष्ट कावेरीच्या लक्षात आली.
एक दिवस सकाळी माधुरी म्हणाली, " कावेरी नाश्ता करून आपण बाहेर जातोय, त्यामुळे जेवण बनवत नको बसूस. "
कावेरी, " बाहेर म्हणजे कुठे ? "
माधुरी, " ते तिथे गेल्यावर कळेल. आता फक्त नाश्ता करून तयार हो बस. " कावेरी मान हलवून, नाश्ता करून तयार व्हायला जाते.
कावेरी माधुरी सोबत जाते. गाडीतून खाली उतरते तर समोर पाटी होती, 'जिव्हाळा '. माधुरी कावेरीला एका अनाथ आश्रमात + वृद्धाश्रमात आणते. माधुरी म्हणते, " कावेरी हे आश्रम म्हणजे अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम एकत्र आहे. दोन्ही एकत्र केल्यामुळे मुलांना आजी आजोबांचं प्रेम मिळत आणि आजी आजोबांना लहान मुलांचं. दोंघाचा एकटेपणा कमी होतो. येथे आल्यावर आपलं दुःख आपोआप छोटं वाटू लागतं. जगण्याची नवी उमेद मिळते.
लहान लहान मुलं, अनाथ असून एक आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर. आपण आपलं दुःख जास्तच कुरवाळत बसतो असं वाटल कावेरीला. रात्री झोपताना कावेरी विचार करत होती. आपण ही यांच्या साठी जमेल तेवढं करायचं. असं कावेरी मनोमन ठरवते. माधुरी कावेरीत होणार बदल नोटीस करत होती. कावेरीत अजून बदल करण्यासाठी काय काय करता येईल याचा विचार माधुरी करत होती.
संघर्ष अस्तित्वाचा १ @ प्रेरणादायी कथा
https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-1_3347
संघर्ष अस्तित्वाचा २ @ प्रेरणादायी कथा
https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-2_3384
संघर्ष अस्तित्वाचा ३ @ प्रेरणादायी कथा
https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-3_3407
संघर्ष अस्तित्वाचा ४ @ प्रेरणादायी कथा
https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-4_3437
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा