Login

संघर्ष अस्तित्वाचा ९

------
संघर्ष अस्तित्वाचा ९ @ प्रेरणादायी कथा ( मागच्या भागात आपण पाहिलं की माधुरीच्या नकळत कावेरी माधुरीच्या बर्थडे गिफ्ट चं प्लॅनिंग करते. त्यासाठी ती माधुरी कामानिमित्त बाहेर असताना पुन्हा महिला आश्रमात जाते. तिथे तिची ओळख कमलशी होते. जिचं विणकाम कावेरीला फार आवडलं होतं. कमलशी बोलताना कमल तिची सर्व कहाणी कावेरीला सांगते. कावेरीला कमल आणि तिची जीवन कहाणी एकच वाटते. आता कावेरी अजून पेटून उठते. तिला तिच्यासारख्या आणि कमल सारख्या मुलींसाठी काहीतरी करायचं होतं. आता पुढे....... ) कावेरी झपाटल्यासारखी अभ्यासाला लागते. यावेळी निकाल लागतो. मुख्य परीक्षेत कावेरी देशात २७ वी तर राज्यात १६ वी येते. माधुरीला तर काय करू नि काय नको असं होतं. तीने फक्त वेड्यासारखं नाचायचं बाकी ठेवलं होतं. कावेरी हे पाहून रडू लागते. ते पाहून माधुरी तिला विचारते, " अगं आज एवढा मोठा दिवस आहे. आणि तू रडते का ? " त्यावर कावेरी म्हणते, " माधुरी माझ्यासाठी एवढं आनंदी कधीच कोणी झालं नाही गं. जिथे माझ्या असण्या - नसण्याने फरक पडत नव्हता. तिथे माझ्यासाठी कोन असं आनंदी होणार. तू माझ्या आयुष्यातील पहिली अशी व्यक्ती आहेस. जिच्यासाठी मी महत्वाची आहे. म्हणून डोळ्यात पाणी आलं. " माधुरी, " अगं झालं गेलं विसरून जा. आता नवी सुरुवात आहे ना तुझी. रडणं बंद कर आता." कावेरीला Interview साठी दिल्लीला जायचं होतं. त्यासाठी अजून एक महिना होता. माधुरीचा वाढदिवस १०- १२ दिवसांवर आला होता. त्यामुळे कावेरी पुन्हा त्या महिलाश्रमात गेली. तिने कमलला बोलवायला सांगितलं पण कमल नव्हती. कावेरीने चौकशी केली तर कळलं की कमलला काम मिळालं म्हणून ती गेली. कावेरीने गिफ्ट बनवायला तिच्याकडेच दिलं होतं, आणि आता एवढ्यात दुसरीकडून बनवूनही घेता येणार नव्हतं. म्हणून कावेरी कमलचा पत्ता मागते. तेव्हा आश्रमातून उडवा उडवीची उत्तरे मिळतात. कावेरीला हे विचित्र वाटतं. कावेरी बाहेर जाताना तिला आश्रमातच्या बागेत एक मुलगी दिसते. ती पायाने अपंग होती. कावेरी तिच्याजवळ जाते आणि तिचं नाव विचारते.तिचं नाव 'राधा '. कावेरी तिच्या बाजूला बसून गप्पा मारते. बोलताना कळत की एका अपघातात तिचे आई - वडील आणि भाऊ मरण पावले आणि त्याच अपघातात तिचे पाय गेले होते. ती जवळजवळ ४ वर्ष या आश्रमात होती. बोलता बोलता ती कमल बद्दल विचारते. त्यावर राधा म्हणते, " ताई, या आश्रमातून अश्या बऱ्याच मुली गेल्या. काम मिळालं म्हणून. पण..... " कावेरी, " पण काय राधा ? " राधा, " ताई, कधीच कळलं नाही की त्या परत कधी भेटायला सुद्धा या आश्रमात का येत नाहीत. कोणत्याही मुलीला काम लागलंय हे ती गेल्यावरच कळत सगळ्यांना. " कावेरी, " काय ? असं कसं ? " राधा, " हो ताई, असचं आहे. एखाद्या सकाळी उठल्यावर कळत की एखाद्या मुलीला काम मिळालं म्हणून ती गेली. " हे ऐकून कावेरी हैराण होते. त्यात आश्रम मधल्या लोकांनी तिला दिलेली उडवा उडवीची उत्तरे. कावेरीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काहीतरी गडबड आहे हे कावेरीच्या लक्षात आलं. कावेरी घरी येते आणि घडलेला सर्व प्रकार ती माधुरीला सांगते. माधुरीलाही ही गोष्ट खटकते. काहीतरी मोठा problem आहे हे लक्षात येतं तिच्या. कावेरी आणि माधुरी एका ओळखीच्या पोलीस स्टेशनला जातात. समाजसेवेत असल्यामुळे माधुरी आणि कावेरीचीही पोलिसांसोबत ओळख होती. कावेरीने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यांनाही यात काहीतरी चुकीचं असल्याचं लक्षात आलं पण पुरावे नसताना त्यांच्यावर छापा किंवा केस करू शकत नव्हते ते. यावर काय करावं असा विचार सुरु होता. कावेरीने सुचवलं की आपण आपली एखादी मुलगी तिथे पाठवायची ती तिथे राहून माहिती काढू शकेल. पोलीस आणि इतर सर्वांना ही गोष्ट पटते. पोलीस यासाठी वरिष्ठांची परवानगी काढून यासाठी तयारी करतात. एका दुसऱ्या समाजसेवा करणाऱ्याची मदत घेऊन एका महिला पोलिसलाच त्या आश्रमात पाठवलं गेलं. त्या महिला पोलीस वेळोवेळी माहिती पुरवत होत्या. पण नजरेत येण्यासारखं काही नव्हतं. पण एकदा रात्री त्याच्या लक्षात आलं की एका स्त्रीला आश्रमातील लोक कुठेतरी घेवून जात होते. त्या महिला पोलिसांनी त्यांच्या न कळत त्याचा पाठलाग केला. आणि त्याचं बरोबर पोलीस स्टेशनला information दिली. त्या मुलीला एका माणसाला विकत होते ते. या सर्वांत महिला पोलीस कर्मचारी त्याच्यावर नजर ठेवून होत्या. पोलीस त्यांना रंगेहात पकडतात. पोलिसांच्या हाती एक टोळीच लागली होती. आश्रमात लाचार, अन्याय झालेल्या, घरच्यानी सोडलेल्या मुली येतात. त्या गायब झाल्या तरी कोणी विचारायला येणार नव्हतं. त्यामुळे आश्रमात मुली आल्या की काही दिवसात तिची माहिती वेगवेगळ्या ठिकाणी पाठवली जायची आणि चांगली किंमत जिथून मिळेल तिथे विकल्या जायच्या. आणि आश्रमात त्या मुलींना काम लागलं म्हणून त्या गेल्या असं सांगितलं जायचं. अश्या अनेक मुली विकल्या गेल्या होत्या. आश्रमातून एका शांत, समाधानी आणि स्वकर्तृत्वावर उभं राहून जगायचं अशी आस असायची मुलींची पण इकडे हालत अजून भयंकर होतं होती. पोलीस त्यांच्याकडून पत्ता घेवून कमलला विकलं तिथे छापा मारतात. आणि कमलसह अनेक मुलींना मोकळ करतात. त्या मुलींना एका चांगल्या महिला आश्रमात नेतात आणि तिथेच त्यांची व्यवस्था करतात. दुसऱ्या दिवशी माधुरी आणि कावेरी त्यांना भेटायला जातात. कमल आणि इतर मुली माधुरी आणि कावेरीचे आभार मानतात. कावेरीला आपल्याला आता अजून जोमाने अभ्यास करावा लागेल Interview साठी असं वाटतं. कारण अश्या अनेक मुली आहेत, ज्या अन्यायाच्या कचाट्यात आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे, ज्यांना माधुरीसारखी मैत्रीण भेटत नाही. अश्या मुलीची शक्य तितकी मदत करायची. कावेरी आता Interview ची जोरात तयारी करू लागली..... क्रमश...... संघर्ष अस्तित्वाचा १ @ प्रेरणादायी कथा https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-1_3347 संघर्ष अस्तित्वाचा २ @ प्रेरणादायी कथा https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-2_3384 संघर्ष अस्तित्वाचा ३ @ प्रेरणादायी कथा https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-3_3407 संघर्ष अस्तित्वाचा ४ @ प्रेरणादायी कथाhttps://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-4_3437संघर्ष अस्तित्वाचा ५ @ प्रेरणादायी कथाhttps://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-5_3470 संघर्ष अस्तित्वाचा ६ @ प्रेरणादायी कथाhttps://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-6_3500 संघर्ष अस्तित्वाचा ७ @ प्रेरणादायी कथाhttps://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-7_3533 संघर्ष अस्तित्वाचा ८ @ प्रेरणादायी कथा https://www.irablogging.com/blog/sanghrsh-astitvacha-8_3575
0

🎭 Series Post

View all