संघर्ष एक कथा - भाग १०

mangesh and shalini how they face flood situation and save their house from flood.

संघर्ष एक कथा - भाग १०

क्रमश:भाग ९

अदिती चे बारसे झाल्यावर शालिनी  ची आई घरी निघून गेली . मंगेश आई मात्र या वेळी शहरातच थांबली . आदिती च्या येण्याने सगळ्यात जास्त जीव सुखावला होता ते मंगेश च्या आई चा . तिला पण  मुलीची हौस होती . शालिनी किती म्हटली तरी ती सून होती . आदिती ला मालिश करायची ,मस्त अंघोळ घालायचे काम मंगेश आई आवडीने करत असे . कधी कधी राघव आणि माधव ला पण घालायची . सध्या घराचे वातावरण खूप छान होते  सर्वांचे रुटीन छान चालू होते .

पावसाळा सुरु झाला . मंगेश चे घर दोन खोल्यांचे घर होते आणि वर पत्रा . उन्हाळ्यात मरणाचे गरम , पावसाळ्यात पत्राचा आवाज तर यायचाच पण थोडं थोडं गळायचे पण . रात्री मोठा पाऊस आला कि हांथरुन भिजून जायची . इकडे एक पातेलं लाव तिकडे बदली लाव असा उद्योग करावा लागायचा . यावर्षी पाऊस जरा खूपच जास्त होता . सलग चार पाच दिवस झाला जरा म्हणून थांबला नव्हता . नदीचे पाणी वाढत चालले होते . पर्वा तर बाजारपेठेत पाणी शिरले होते . नगरपालिकेचा भोंगा वाजला कि सगळे घाबरून जायचे . पाण्याने धोक्याची पातळी गाठली कि भोंगा वाजायच्या . माधव , राघव नुसते पाण्यात खेळायचे आणि सारखे भिजायचे . सर्दी खोकले तर पाचवी ला पुजलेले . तापसरी एकाला आली कि एका मागो माग तिघांना यायची . शालिनी ला तर या आजरपणांमुळे पावसाळा नको नको होयचा.

एक दिवस संध्याकाळी शालिनी जेवण करत होती तोच भोंगा वाजला . शालिनी ला भीती वाटली कारण आज मंगेश अजून घरी आला नव्हता . बाजारपेठेत वारंवार  पाणी भरायचे . धरणाचे पाणी सोडले कि खाली गावात पण पाणी यायचे . पाऊस  कोसळत होता त्यात मंगेश पाणी भरल्यामुळे ऑफिस मध्ये बहुदा अडकला कि काय असे तिला वाटू लागले होते . आणि दुपारी जेवायला घरी आला होता तेव्हा रात्री बटाटा वडा कर असे सांगून गेला होता . शालिनी ने वडे तळायलाच घेतले होते तर भोंगा वाजला होता .

शालिनी ने स्टोव्ह बंद केला आणि त्याची वाट बघू लागली . काळजीनं तिने देवासमोर  दिवा लावला  . ह्यांना व्यवस्थित घरी येऊ दे असे मनोमन म्हणाली . तेवढ्यात सायकल ची घंटी वाजली . मंगेश घरा  जवळ आला कि त्यांच्या सायकल ची घंटी वाजवायचा . ती वाजण्याची त्याची एक स्टाईल होती त्यावरून शालिनीला  आणि मुलांना पण लगेच कळायचे कि मंगेश आलाय ते. मंगेश पूर्ण भिजून आला होता. बाजारात दुकानांमध्ये पाणी शिरलंय . रस्त्यावर पाणी साचलंय . आणि पाणी वाढतच चाललंय शिवाय पाऊस पण जोरात पडतोय

मंगेश "आज ची रात्र जरा कठीण वाटतेय . पाणी वाढत चाललंय . मी अक्षरश:सायकल डोक्यावर घेऊन आलोय "

तोपर्यंत शालिनीने मंगेश ला चहा टाकला .मुलं पण बाबा आले बाबा आले करत गोंधळ करत होते आणि मंगेश ची आई आदिती ला बाजूला ठेवून मेथीची भाजी निवडत हाती .

शालिनी "अहो विहीर पण खूप वर पर्यंत भरलीय . आज जर पाऊस थांबला नाही तर विहिरींची पाणी आणि मागून शेतातील पाणी आपल्या घरापर्यंत येईल "

मंगेश "हो ना .. मागून आणि पुढून दोन्ही  कडून पाणी घरात येण्याचे वाटत आहे . काय करावं रात्री अचानक पाणी वाढले तर काय करायचं ?

शेजारच्या काकूंच घर जरा उंचावर आहे आणि त्यांचा मोठा वाडाच होता .

शालिनी "रात्री आईंना आणि मुलांना झोपायला त्यांच्याकडे पाठवू  नि पण दोघे इकडे थांबू बघू काय होतंय ते "

मंगेश "हो चालेल , म्हणजे मूल आणि आई तरी तरी व्यवस्थीत  राहतील . "

मंगेश "रात्री खालचे सामान सगळे वरती कॉट वर ठेऊ . "

शालिनी पटापट जेवणाचे बघू लागली

शालिनी ने बटाटे वडे चा बेत आखला होता . पण आज बटाटे वडे खाताना मज्जा  नव्हती कारण रात्री काय होईल याचा काही नेम नाही . पाणी भरणार  हे तर चित्र स्पष्ठ दिसत होत . मुलांना वरण  भात  भरवून आजी बरोबर शेजारी झोपयाला पाठवले . पाणी मागच्या दारापर्यंत आले होते . आता थोडा जरी पाऊस वाढला तरी पाणी खोलीत शिरणार होते . शालिनी चे जिन्नस आणि भाज्या सगळं वरती रॅक वाट ठेवून दिले . मंगेश ने  गादी , चादर , उश्या बेड च्या वर ठेवलें . कपडे एका बोचक्यात भरले आणि बेड वर ठेवले . ज्या ज्या वस्तू वरती ठेवता येतील ते वर ठेवले . आणि बघता बघता मागच्या दारातून विहीर पूर्ण भरल्यामुळे खोलीत यायला लागलं . एखाद्या होडीला जर एखादे होल पडले तर पाणी कसे पटापट आत येईल तसेच त्यांच्या खोलीमध्ये पाणी भरू लागले . पाणी आतल्या खोलीचा उंच उंबरठा पार करून बाहेरच्या खोलीमध्ये पण येऊ लागले . ज्या वस्तु  खाली राहिल्या त्या पाण्यावर तरंगू लागल्या . दोघेही भिजलेल्या वस्तू उचलतहोते  .

काही काही वस्तू मंगेश म्हणतो , जाऊ दे गेलं तर गेलं आणि नेमकी त्याच वस्तूत शालिनी चा जीव अडकलेला असायचा . मग मन कठीण करून ती ती वस्तू टाकायला तयार होयाची . दरम्यान पाण्याची खोली खूपच वाढू लागली . बोल बोलता पाणी मंगेश च्या ढोपरा  पर्यंत आले. शेवटी मंगेश शालिनीला घेऊन शेजारच्या घरी झोपायला गेला . राहतील त्या वस्तु राहतील. जातील त्या जातील . कारण करणार काय ? पाऊस थर थांबत नव्हता आणि खोलीतील पाण्याचा जोर वाढत चालला होता .

घरात सगळीकडे पाणी वाढत होते  आणि शालिनीच्या  डोळ्यातले पाणी  थांबत नव्हते .

मंगेश खुप दमला होता . शेजाऱ्यांच्या घरात चटई वर पडल्या पडल्या झोपला . सकाळी उठला तर  पाऊस दमला  होता . शालिनी ला बहुदा आत्ताच डोळा लागला असावा . तो उठून लगेच घरात गेला . त्याच्या खोलीतले पाणी पण ओसरले होते . खाली सगला  चिखल साचला होता . एखादा बेडूक उड्या मारत त्याच्या समोरून गेला . कदाचित कॉट खाली साप सुद्धा निघू शकेल इतका कचरा घरात होता . मंगेश काही विचार न करता खराटा हातात घेतला आणि साफ सफाई ला लागला . आजू बाजूच्या बऱ्याच जणांच्या खोल्यांची हीच अवस्था होती .

सर्व च जण कोणाच्या च्या कोणाच्या घरात रात्र  काढून आले होते . सामाना चे खूप नुकसान झाले होते . त्या दिवशी घरमालकांनी सर्व भाडेकरूंना चहा नाश्ता स्वतः बनवून दिला . लागेल ती मदत ते भाडेकरूंना करत होते . आता घर साफ करायला स्वच्छ पाणी लागणार होते पण विहीर च भरून वाहल्ल्यामुळे विहिरीचे पाणी लाल झालेले . तरीही लोक तिकडून पाणी आणून आणून खोल्या साफ करत होते . खराब वस्तू फेकून देत होते आणि दुपारी १२ वाजे पर्यंत घरातली घाण निघाली . पुन्हा नव्याने संसार मांडण्याची वेळ आली होती . शालिनी ने जिन्नस वरती ठेवले ते सगळे चांगले होते . तेच जिन्नस काढून शालिनीने पुन्हा स्टोव्ह पेटवला आणि भाताचं पातेलं चढवलं . मुलांना विहिरी वरच अंघोळी घातल्या . आई सगळ्या चादरी पाण्यातून काढण्यासाठी विहिरीवर जाऊन बसली होती . एक झालं कि एक अशे अनेक कपडे आज तिने पाण्यातून काढेल होते . एक एक करून शालिनी आणि तिने मिळून भांडी डबे घासून काढले होते .

मंगेश च्या खोलीची अवस्था बघून कवी कुसुमाग्रजांची कविता डोळ्यासमोर आली

गंगा माई पाहुनी आली ,गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण पोरी सारखी चार भितींत नाचली

मोकळ्या हाती जाईल कशी , बायको मात्र वाचली

भिंत खचली , चूल विझली ,होते नव्हते नेले

प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे   ठेवले

कारभारणीला घेऊन संगे , सर  आता लढतो आहे

पडकी भिंत बांधतो आहे , चिखलगाळ काढतो आहे

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा  ..

या तील शब्द ना शब्द मंगेश आणि शालिनी सोसत होते .

जणू हि कविता त्यांच्या संसारा कडे पाहूनच लिहिली असावी .

असे एक एक क्षण मंगेश च्या आयुष्यात येत होते . त्याला अनुभव संपन्न बनवत  होते . आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करावा  लागत होता. त्या दिवशी संध्याकाळ पर्यंत मंगेश ने खोलीचं घर बनवून टाकले . खूप अंग मेहनती नंतर खोलीचं रूपांतर घरात झाले होते . मंगेश ने अंघोळ केली आणि आई ला म्हणाला मी  चिकन  घेऊन येतो आज चिकन बनवा म्हणजे थकवा निघून जाईल . गेला चिकन आणायला पण येता येता थोडी लावून पण आला . थकला  होता दमला होता . त्याचा थकवा जाण्यासाठी त्याला हा एकाच मार्ग बहुदा दिसला असावा .

मंगेश च्या आई ने पण लेकाची फर्माइश पूर्ण करण्यासाठी पाट्या वर वाटण तयार केले आणि  मस्त तर्री आलेला रस्सा बनवला . मंगेश पण त्या रात्री शांतपणे झोपला .

हल्ली वरचे वर सिगारेट , दारू च्या पार्ट्या होयच्या , नॉन वेज तर रोजच घरात शिजायचे . राग आले कि भांडायचं , मूड असला कि फिरायला जायच , कधी शालिनीला घेऊन , कधी मुलाना सायकल वरून फिरवून आणायचे , असे चालू होते .

वाईट सवयी एकदा घरात शिरल्या कि लवकर घराबाहेर जात नाहीत .

एक दिवस अचानक शालिनीची  ची तब्बेत बिघडली . तिला चक्कर येऊ लागली . अचानक पडते कि काय असे वाटले . तिने स्वतः ला कसे बसे थांबवले .मंगेश म्हणाल संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर दवाखान्यात जाऊ .

🎭 Series Post

View all