संघर्ष एक कथा - भाग ११

In this part shalini had an accident. she burned in stove flame.

                                             संघर्ष एक कथा - भाग ११

क्रमश: भाग १०

आज  शालिनी आणि मंगेश दवाखान्यात जाणार होते . पण संध्याकाळी मंगेश ला यायला उशीर झाला. आणि शालिनी ला पण जरा कामाचा लोड होत होता . माधव आणि राघव ची शाळा , अदिती ५ महिन्यांची ती अजून अंगावर दूध पितेय आणि पाऊस पाण्याचे दिवस ह्या सगळ्या कारणांनी तिला अशक्त  पणा आलेला . शालिनी म्हणाली जरा खाणं वाढवून बघते . नाहीच बर वाटलं तर जाऊ दवाखान्यात असा विचार करून शालिनी ने पण दवाखान्यात जाण्याचा विषय सोडला .

पावसाळा असला कि मंगेश  आईला इकडेच ठेवायचा . कारण पाऊस पाण्याच जा ये करायला नको आणि सगळे एकत्र असलेले बरे. मग देव बसवायला त्या गावी जायच्या . या वेळी शालिनीला सासू बाईंची खूप मदत होत होती . आदिती ला तर त्याच सांभाळत होत्या . माधव आणि राघव पण आजी आजी करत आजी भोवती  गराडा घालून बसलेली असायचे . एकंदरीत आजीबाई नातवंडात रमल्या होत्या .

शालिनी ला वरचे वर चक्कर येत होत्या .. तिला मंगेश ला सांगायला पण नको वाटत होत . नवऱ्याला आधीच टेन्शन असते आणखीन आपलं  नको म्हणून ती दुपारीच तिच्या शेजारच्या  मैत्रिणी बरोबर दवाखान्यात जाऊन आली . तेव्हा तिला कळले  कि ती पुन्हा गरोदर आहे . या वेळी हि बातमी ऐकल्यावर मात्र शालिनी जरा नाराज झाली . तिने आधीच ठरवले होते आता बस यापुढे मूल होऊ द्यायचे नाही आणि आता काळेले कि ती तर  गरोदर राहिली .ती मंगेश ला म्हणाली पण होती कि लगेच ऑप्रेशन  करून टाकू . पण मंगेश ने तेव्हा तिला साथ दिली नाही .

आता हे काय होऊन बसले  अदितीचे अजून दूध सुटले नाही तर लगेच पुन्हा गरोदर .  

यावेळी शालिनी ला अजून एक बाळ नकोच होते . तिला ज्या चक्करा येत होत्या त्याचे कारण तिला चांगलेच कळले होते . तिने ठरवले होते कि मंगेश ला सांगून  ला हे सर्व इथेच थांबवू . एक स्त्री म्हणून ती एक चांगला डिसिजन घेत होती पण तरीही एक आई म्हणून तीला हे करावे लागणार म्हणून वाईट पण वाटत होते .

तिने हे सर्व थांबव ण्या सा ठी येताना घरगुती उपाय काय काय करता येतील ते सर्व जिन्नस आणले . मुद्दामून उष्ण वस्तू खायच्या ,जास्तीच्या गोधड्या धुवायच्या अशी जास्त अंग मेहनतीचे काम करायचे असा सपा टा  तिने लावला . या सगळ्यात तिने हि  गोष्ट मंगेश आणि सासू बाई पासून हि गोष्ट मुद्दामून लपवली . या दोघां चे  आणि माझे जर दुमत आले तर प्रश्न नको पडायला म्हणून . आणि तिने आपले घरगुती  उपाय चालू ठेवले . तरीही मध्ये मध्ये तिला चक्कर सारखं होताच पण ती आता कोणाला कळू नये म्हणून लपवण्याचा प्रयत्न करत असे . मंगेश पण म्हणाल कि "दवाखान्यात जायचंय ना चाल जाऊ " हि काहीतरी आढेवेढे  घेऊन ती गोष्ठ टाळायची .

त्या दिवशीची सकाळ एकदम नॉर्मल सकाळ होती . सकाळी मुलं शाळेत गेली , घरातील सर्वांचा नाश्ता झाला . आणि सासूबाई आदिती ला घेऊन बाहेर अंगणात बसल्या होत्या . जरा उन्हाचा कवडसा पडला कि त्या असे करायच्या . आदिती पण त्याच्या कडेवर अगदी छान रहायची .त्या तिला त्याच्या कडेवरून जग दाखवत बसायच्या . तिच्याशी गप्पा मारायच्या .

मंगेश ची ऑफिस ला जायची तयारी चालू होती. त्याची नुकतीच अंघोळ झाली होती आणि शालिनी त्याला चहा बनवायला आत गेली होती . शालिनी गरोदर असल्यापासून तीच चित्त थाऱ्यावर नव्हतं . मंगेश ला सांगू का नको ? बाळ राहू दिल तर काय होईल ? नको बाबा चार मुलं जमेल का आपल्याला . अश्या विचारत सारखी गर्क असायची .

त्याकाळी हल्ली सारखे मोबाइलला पण नव्हते . हल्ली मुलींना काही प्रॉब्लेम असला कि लगेच त्या त्यांच्या आई ला , बहिणीला', भावाला वहिनीला फोन करून विचारतात . जवळ जवळ राहत असले तर लगेच सर्व मदतीला धावून येतात . पण तो काळ त सा  नव्हता . शालिनी तिच्या आई बरोबर सुद्धा बोलू शकत नव्हती पत्र लिहायला सुद्धा वेळ नसायचा . चार पाच महिन्यांनी गावी जाईल तेव्हाच आई आणि बाबा भेटायचे .

शालिनी अशा विचारत गर्क असताना तिने स्टोव्ह पेटवला होता आणि ती साखरेचा डबा  घ्यायला उभी राहिली . खरं तर ह्या जागा काही तिला नवीन नव्हत्या . पण चित्तच थाऱ्यावर नव्हते  का तिला चक्कर आली तीच तिलाच माहित .?  . तिचा पदर स्टोव्ह ला लागला . तिला काही कळायच्या आत तिच्या साडीने पेट घेतला . साडी  पण सिंथेटिक ची साडी ती प्लास्टिक सारखी पटापट पेटली आणि तिच्या अंगाला चिकटू लागली. आगीच्या ज्वाळा तिच्या अंगाला घेरू लागल्या  आणि तिला जसे चटके बसायला लागले तशी ती ओरडायला लागली .

मंगेश बाहेरच्या खोलीत होता शालिनीचा आवाज आणि आत मध्ये आग लागल्याचा वास आणि ज्वाळा  दिसल्या आणि त्या ज्वालामध्ये ओरडणारी शालिनी त्याला दिसली

एक क्षण मंगेश घाबरला आणि त्याचा घसा सुकला .. शालिनी शालिनी असा आवाज सुद्धा  त्याच्या तोंडातून येईना . पण लगेचच तो भानावर आला समोरच एक घोंगडी होती ती घोंगडी घेऊन त्याने स्वतः शालिनी च्या अंगावर गुंडाळली . हे करताना त्याचा हि हात  भाजला पण त्या आग लपेटीत सापडता सापडता वाचला  . समोरच पाण्याच्या बदल्या , हांडे शालिनीनेच भरून ठेवले होते . एक एक करून मंगेश ने भरलेल्या बदल्या तिच्या अंगावर ओतल्या . हांडे ओतले . जेवढे होते तेवढे सर्व पाणी त्याने ओतले .

शालिनीच्या आवाजाने आणि मंगेश च्या आवाजाने आई घरात आली "बघते तर काय आपली सून आगीच्या लपेट्यात . ती मोठयाने ओरडायला लागली

" वाचवा वाचव ... शालिनी काय ग काय केलस ? काय ग झालं तुला ? अशी कशी पेटलीस ... ती पण घाबरली .. अदिती रडतेय .. आणि मंगेश जिवाच्या आकांताने  तिला वाचवल्यासाठी झटत होता .

तिला वाचवण्यासाठी त्याला जे जे योग्य वाटेल ते तो करता होता .

शालिनी नुसती ओरडत होती .. आग होतेय आग होतेय ... ती सिंथेटिक ची साडी तिच्या भाजलेली अंगाला चिकटून बसली होती .मंगेश ओढून काढण्याचा प्रयत्न करत होता पण तो काढूच शकत नव्हता .

 एका मिनिटात होत्याचे नव्हते झाले होते . शालिनी खूप भाजली होती . मंगेश ची आई  शालिनीला बघून घाबरूनच गेली होती . एका मिनिटापूर्वीच तीच रूप आणि आताची तिची अवस्था यात खूप फरक होता . मंगेश आणि त्याची आई रडायला च लागले होते . त दोघे रडत आहे त म्हटल्यावर अदिती पण रडत होती . शालिनी अजूनही प्रचंड वेदनेत होती . आता तर तिला रडायला पण  त्राण नव्हते

पोळ्या करताना एवढंसं भाजले तर त्याचा दाह २ तास राहतो . हात पाण्यात टाकला तरी झोबंत . इथे शालिनी चे संपूर्ण शरीर भाजले होते . तिच्या वेदनांची  आपण कल्पना पण सहन नाही करू शकत .

तरी बरं मंगेश घरी होता . त्याने राखलेल्या प्रसंगावधानाने आज शालिनी जिवंत तरी दिसत होती 

एकंदरीत तिची अवस्था फार बिकट होती . जगण्याचे चान्सेस फारच कमी दिसत होते . घरात लहान लहान तीन मुलांचा संसार फक्त  ५ ते सहा वर्षांचाच असेल . माणसू एका मागून एक स्वप्न बघत असतो पण नियती ला काहीतरी वेगळेच पाहिजे असते . आता मात्र मंगेश खूप खचला होता . या असल्या दुःखाला सामोरं जायला लागेल असे त्याला कधीच वाटले नव्हते . आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करत करत ती इथं पर्यंत आला होता .आता त्याचे ऑफिस मध्ये पण प्रमोशन होणार होते . पगार वाढवून मिळणार होता . हे सगळं कोणासाठी ?तर कुटूंबासाठी .. आणि खुद्द सहचारिणीला जी कि सुख दुःखाची साथीदार आहे तिच्या बाबतीत असा ऍक्सीडेन्ट  घडावा . काय करावे काहीच कळेना .

घराबाहेर कुजबुज सुरु झाली "अहो ऍक्सीडेन्ट नसेल हो .. आत्महत्या करायचा प्रयत्न केला असेल तिने .. कधी कधी भांडणाचा आवाज पण येतो त्यांच्या घरातून "

लोकांना काय बोलायला . तसे असते तर मंगेश ने तिला वाचवले नसते . मंगेश ने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिला आगीच्या लपेटी तुन बाहेर काढलें त्याने असे करताना त्याचे स्वतःचे दोन्ही हात भाजले होते हे कोणी बघितले नाहीत .

तरी नाही म्हणायला शेजारचे लोक मदतीला आले . कोणी कोणी हे करा म्हणजे आग कमी होईल असे सांगू लागले .

शालिनी सर्व काही उघड्या डोळ्यांनी पाहत होती . आता आपण जगतो का मरतो याची तिला हि गॅरेंटी नव्हती . तिचा जीव तिच्या मुलांमध्ये अडकला होता . आपण गेलो तर आपल्या मुलांचे काय ? हा प्रश्न तिला सतावत होता .

शेजारी पाजारी लोक मंगेश च्या घरी काय झालेय ते बघायला आलेय . घरात नुसता  धूर आणि धुराचं वास येत होता .

कोणीतरी मंगश ला म्हणाले " अहो लगेच दवाखान्यात न्या "

आणि मंगेश वीज संचार लया  सारखा रिक्षा बोलवायला पळाला . लगेच रिक्षा घेऊन आला . घोंगडी त गुंडाळलेल्या शालिनी ला उचलून रिक्षेत ठेवले . आणि हॉस्पिटल ला नेलं .

🎭 Series Post

View all