संघर्ष एक कथा भाग -१4

in this part mangesh solds his land for the sake of money.. and shalinis health is improving and mangesh is happy at the end

संघर्ष एक कथा भाग -१4

संघर्ष सर्वांच्याच आयुष्यात येतो पण मंगेश च्या आयुष्यातला संघर्ष कधी संपणार होता  काय माहित . त्याला आता हे सगळं असह्य होत होते .त्यात आर्थिक परिस्थिती पण सुधारत नव्हती . मनशांती मिळत नव्हती . एक संपला एक प्रॉब्लेम त्याच्या समोर उभा ठाकलेला असायचा . आता शालिनी ला तर सती सावित्रीने यमा कडून तिचे प्राण परत आणले होते. मंगेश ने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शालिनीला मृत्यूच्या दारातून परत आणले होते .

लांब लांब चे नातेवाईक शालीनीना बघायला यायचे . आलेल्या  लोकांचा पाहुणचार , त्यांना हॉस्पिटल ला न्यायाचे शालिनी ला भेटवयाचे .. आणि मग स्टॅन्ड वर सोडायचे . असा दिनक्रम चालू असायचा . कोण कोण कुठून कुठून ओळखीचे आणि नातेवाईक लोक त्यांना भेटून जायचे . त्यावेळी त्यांचा शाब्दिक आधार देत असत . काही काही जण राहून जायचे .. कोणी कोणी लगेच भेटून जायचे .

कोणी मंगेश ला आधार द्यायचे , पैसे द्यायचे, कोणी ओरडायचे इकडे कशाला ठेवलीत , मुंबईत हलवायचे नाही का ? असे करायला पाहिजे होते ? तसे कार्यकला पाहिजे होते ? काही काही जीव वाचवलास रे बाबा ? तू ग्रेट आहेस वगैरे वगैरे .. शेजारी पाजारी पण शालिनीला ला बघायला हॉस्पिटल मध्ये जायचे, यायचे . कोणी कोणी डबा द्यायचे असे चालू होते .

मंगेश एक दिवस गावी जाऊन त्यांची  एक जमीन जी पूर्वी गोठ्यासाठी वापरायचे ती विकून आला . कारण अजून खूप सारे पैसे लागणार होते .. आत्तासे फक्त १५ च दिवस झाले होते .. अजून २ तीन महिने तरी शालिनीची काळजी घ्यावी लागणार होती .

मंगेश ज्या मार्गाने पैसे उभे करता येतील ते सर्व मार्ग वापरून पैसे उभे करत होता . त्याच्या बरोबरचे लोक त्याच्या एवढा पगार असलेले मुले आयुष्यात चांगली प्रगती करत होते . कोणी घर घ्यायचे , कोणी स्कूटर घ्यायचे .. पण बिचारा मंगेश मात्र आहे त्यापेक्षा १० वर्ष मागे गेला होता .. अगणित लोकांकडून त्याने उसने पैसे घेतले होते .. छोटो मोठी कर्ज , आणि आता आहे ती वाड  वडिलांची जमीन विकायला लागला होता .. त्यामुळे भविष्य काळ कसा येणार होता ह्याचा विचार करायला सध्या त्याला वेळही नव्हता .. आजची हि वेळ निघून पुढे जाणे गरजेचे होते .. त्यासाठीच तो जीवाचे रान करत होता . ना सपोर्ट, ना गायडन्स ,संसाराचा गाडा ओढत होता . शालिनी हि त्याची ताकद होती .. निदान ती पूर्ण  बरी होई पर्यंत तो बाकी कसलाहि विचार करत नव्हता .

त्याच्या लक्षात आले कि आता रोज ड्रेसिंग हेच काम महत्वाचे आहे.. त्यासाठी  हॉस्पिटल मध्ये राहून हॉस्पिटल ची फी भरून  पैसे नको घालवायला . डॉक्टरांना मंगेश म्हणाला " मी हिला घरी घेऊन जाऊ शकतो का ? ड्रेसिंग च्या वेळी मी रिक्षेने आणतो .

डॉक्टर " अजून थोडे दिवस थांबा .. त्यांच्या दिवसातून दोनदा ड्रेसिंग असते ..ते व्यवस्थित नाही झाले तर पस होऊ शकतो .."

मंगेश म्हणाला " नाही  माझी खर्च करायची कॅपॅसिटी नाहीये .. मला तुम्ही ड्रेसिंग कसे करायचे ते शिकवा मी स्वतः तिचे ड्रेसिंग करेन "

डॉक्टर म्हणाले "तुम्ही त्या स्पेशल डॉक्टरांना विचारा आणि ठरवा "

दुसऱ्या दिवशी  स्पेशल डॉक्टरचा राऊड होता .. डॉक्टरांनी शालिनी ला चेक केले .. तिला विचारले .. कसे वाटतेय .. तो बोलली पण हो आता बर आहे .. थोडे थोडे दुखतंय पण बर आहे .

मंगेश लगेच त्यांना भेटायला गेला आणि त्याने डॉक्टरांना सांगितले कि तिला लवकरात लवकर डिस्चार्ज देता येईल का ? मला हॉस्पिटल चा खर्च नाही परवडत आहे.

डॉक्टर म्हणाले " हा आठवडा थांबा .. मग न्या . तरी पण घरी नेलत तरी तिची खूप काळजी घायवी लागणार आहे ..ड्रेसिंग व्यवस्थित करावे लागेल .. लोशन , मलम पट्टी जखमांची काळजी घ्यावी लागते .. हे  सर्व करायची तयारी आहे का तुमची ?

मंगेश " हो मला एकदा ड्रेसिंग च दाखवा ते पण मी शिकून घेईन .. पण घरी नेतो ...

डॉक्टर " घरी कॉट आहे का ? पेशंटला काय जमिनीवर ठेवणार .. ?"बरं  अजून एखादा आठवडा थांबा मी  बघतो काय करता येतेय ते "

डॉक्टर खरोखरच  चांगला माणूस होता . मंगेश ची व्यथा त्यांना डोळ्यांना दिसत होती आणि कळत होती..

तुम्ही कितीही देवावर विश्वास ठेवा किंवा किंवा नका ठेवू त्याचे अस्तित्व तो आपल्याला वेळो वेळी दाखवून देत असतो . विश्वासावर  दुनिया कायम आहे . मंगेश तसा देवभोळा नावातच पूर्वीपासून तरी पण नास्तिक नव्हता .घराच्या देवांचे जे जे त्याला करता येईल ते ते तो वेळो वेळी करत होता .खर तर लहान पण बघतोय त्याचा संघर्ष संपताच नव्हता . आजू बाजूची मुले ज्यांना ज्या वस्तू लगेच मिळत होत्या त्याच सध्या साध्या गोष्टींसाठी त्याला संघर्ष करावा लागला होता . ते करायला तो थकत पण नव्हता पण हे असे प्रॉब्लेम कि त्या पुढे त्याने आता मात्र हात टेकले होते . त्याला आयुष्यात आता काहीतरी चेंज मिळने गरजेचे होते .

हळू हळू शालिनी ला नॉर्मल जेवण द्यायला सांगितले .. फक्त जखम चिघळणार नाही असा वस्तू टाळायच्या ..

इकडे घरात पण खर्च वाढत होता .. आदिती चा दूध पावडरचा खर्च पण जास्त वाटू लागला. मग मंगेश च्या आई  ने  पावडर दुधाच्या ऐवजी तांदळाच्या पिठात पाणी घालून त्यात थोडी साखर घालून ते  तिला प्यायला द्यायची . पहिल्यादा अदिती ने नाही पिले पण नंतर नंतर तेच दूध म्हणून प्यायची .. त्यामुळॆ खर्च हि वाचला आणि तिची तब्बेत पण चांगली होत होती .

आपले आपल्या बायको वर किती प्रेम आहे  हे सिद्ध करण्यासाठी हल्ली कॅण्डल लाइट डिनर, पार्ट्या , लॉन्ग ड्राईव्ह अशा गोष्टी करतात . त्या चुकीच्या आहेत असे नाही वेळे नुसार सर्वच गोष्टी बदलतात . मंगेश ने मात्र हि सत्व परीक्षा देऊन त्याचे प्रेम सिद्ध केले होते .

शालिनी पण मंगेश ला विचारायची  " माधव कसा आहे ? राघव काय करतोय ? कशी आहे .. जेवते का ? तिचे बिचारीची लवकर दूध सुटले . ५  महिने कसे बसे दूध प्यायली. असे बोलता बोलता शालिनीच्या डोळ्यातून अश्रू वहायला लागले . शालिनीची आई तिला समजवायची " आग आता कशाला रडतेस .. एवढ्या मोठ्या एक्सीडेंट मधून तुला देवाने वाचवले ते बघ .. आता लवकर बरी हो पोरं घरी वाट बघत आहेत .. जावई बापूनी खूप केलय तुझ्यासाठी .. त्यांचा विचार करा आता .. होऊन गेले त्यावर पाणी सोड आता.. आणि मनने जरा कठीण हो .. काम करताना लक्ष कुठे होते काय माहित .. त्यामुळे केवढा अनर्थ घडला ... "

आई ती आईच तिला वेळोवेळो मुलांना खडे बोल बोलावेच लागतात  तसेच शालिनीच्या आई ने तिला सुनावले .. शालिनीला मन घट्ट करायला लावत होती .

शालिनी ला आपल्या मुलांना तिघांना कधी एकदा पाहतेय असे तिला झाले होते . अजून तिच्या अंगावरच्या जखमा ओल्या होत्या म्हणून मुद्दामून मुलांना आई ला भेटवले नव्हते .

पुढच्या आठवड्यात मंगेश ने शालिनी ला घरी आणायची तयारी केली . डॉक्टरांकडून त्याने सर्व सूचना ऐकून घेतल्या . काय काय करायचे .. काय नाही करायचे , ड्रेसिंग कसे करायचे , मलम पट्टी कशी आणि कितीवेळा करायची . तिचे खाणे पिणे सर्व विचारून घेतले . आता एक प्रॉब्लेम होता त्याच्या कडे रूम मध्ये कॉट  नव्हती आणि शालिनीच्या पाठीला पण जखमा असल्याने तिला कॉट वर झोपणे गरजेचे होते . नवीन कॉट घेण्याची मंगेश ची तयारी नव्हती . पण देव जसा प्रॉब्लेम्स देतो तसे त्या प्रॉब्लेम्स ला उत्तरे पण देतो तसेच स्पेशल डॉक्टरांचा दवाखाना होता . त्या डॉक्टरांनी मंगेश ला पुढील चेक अप साठी तिकडेच यायला सांगितले होते .. आज मंगेश त्यांना भेटायला गेला होता औषधे लिहीन आणण्यासाठी तर त्या डॉक्टरांनी मंगेश त्यांच्या प्रायव्हेट हॉस्पिटल मधली एक कॉट गादि सकट मंगेश ला दिली .

डॉक्टर " तुमची बायको आता आऊट ऑफ डेंजर आहे . भाजल्याचे डाग मात्र कायम राहतील .तरी पण चेहरा चांगला आहे त्यामुळे तसा  मोठा प्रश्न नाही . तरी पण पुढे मागे तुम्हाला वाटले तर तुम्ही प्लास्टिक सर्जरी करू शकता . मी त्या बद्दल पण तुम्हाला तेव्हा सांगेन सध्या ५ /६ महिने  जाऊ दे आहेत त्या जखमा सुखू देत .. आणि मध्ये मध्ये चेक अप ला आणा .त्यांचे धन्यवाद मानून तो निघालाच होता तेव्हा डॉक्टर म्हणाले " मंगेश तुमचं बाळ आई च्या पोटात सुरक्षित आहे .

साधारण २२ ते २५ दिवासनांतर मंगेश हलकासा हसला होता आज .

🎭 Series Post

View all