संघर्ष एक कथा - भाग १५

In this part shalini is recovered from her accident and same she is pregnant with 7 months

संघर्ष एक कथा - भाग १५

क्रमश : भाग १४

आज शालिनी च डिस्चार्ज होता . मंगेश ने डॉक्टरांच्या मागे लागून शेवटी जरा लवकरच शालिनीचा डिस्चार्ज करवून घेतला . काय करणार होता बिचारा .. त्याने दोनदा तीनदा शालिनी चे ड्रेसिंग बघून घेतले . एकदा तर नर्स समोर करून पण बघितले . आणि जेव्हा तो हे सर्व करू शकतो हे बघितल्यावरच त्याला शालिनी चा डिस्चार्ज मिळाला . तशी शालिनी आता ८० % बरी झाली होती . आता ओल्या जखमांची काळजी घेणे इतकेच महत्वाचे होते .. तरी पण हे काम खूप क्रिटिकल होते .. तरीही पैसे वाचवण्यासाठी मंगेश ने हि रिस्क घेतली .. शिवाय मुलं पण आई विना सुकली होती . हॉस्पिटल ला असली कि डबा ने  आण . रात्री झोपायला जा हि कामे पण वाचली . त्यामुळे मंगेश चा हा निर्णय त्याला तरी बरा वाटत होता .

शालिनीला रिक्षेमध्ये बसून घरी आणली .. शालिनीच्या आई ने आरतीचे ताट तयार करून तिची आरती करून तिला घरात घेतले . मंगेश ने कॉट आधीच आणून लावून ठेवली होती .. तिला लगेच बेड वर झोपवले .. त्या दिवशी त्या भागातील सर्व लोक भेटायला , बघायला येत होती .. शालिनी ला बघून बघून जात होती .

" वाचलीस ग बाय .. आता घे जीवाची काळजी .. असे म्हणत लोक जायची . कोणी कोणी तिच्या जखमांकडे बघून घाबरायचे .. कोणी कोणी हात लावून बघायचा प्रयास करायचे .. कोणी कोणी गावठी औषध सांगायचे असा सिलसिला यांच्या घरी चालू होता .

माधव आणि राघव खोलीच्या एका कोपऱ्यात उभे होते .. लांबूनच आई ला बघत होते .. काय चाललंय त्याकडे दोघांचे लक्ष होते पण त्या दोघांकडे कोणाचे लक्ष नव्हते . आपली आईला अश्या अवस्थेत बघून बिचारे बावचळले होते . थोडेसे घाबरले होते ... आई जवळ जायला पण त्यांना भीती वाटत होती . होईल त्यांना  पण हळू हळू सवय आपल्या आई ला  बघायची ..

रोज सकाळी कधी मंगेश , कशी शालिनी ची आई तिला कोमट पाण्याने पुसून काढायच्या ..तिला गरम गरम चांगले तुपातले , ताजी फळे , चांगला आहार द्यायचे .. शिवाय गोळ्या औषधे , मलम पट्टी व्यवस्थित चालू ठेवले .. शालिनी ला पण घरी आल्यावर थोडे बरे वाटत होते .. ती  लवकर  रिकव्हर होत होती . ती जशी बरी आहे ह्याची खात्री पटल्यावर  गुरुजी भाच्याला घेऊन गावी गेले . शालिनी ची आई मात्र इथेच थांबली .. शालिनी च्या  मावस बहिणी , मंगेश च्या बहिणी पण थोडे दिवस मदत म्हणून राहायला आल्या.. पडेल ते काम करून सर्वच जण शालिनी ला बरी होण्यासाठी मदत करत होते .

दर आठवड्याला मंगेश रिक्षा करून शालिनीला डॉक्टरांना दाखवायला न्यायाचा .. डॉक्टर नेहमी एखादी गोळी बदलून , एखादी वाढवून द्यायचा .. काही वेळा त्यांच्या कडे असलेल्या गोळ्या पण फ्री  मध्ये द्यायचे . त्या डॉक्टरांचे जेवढे आभार मानावे तितके कमीच होते . योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट मिळाल्यामुळे शालिनी चा जीव वाचला आणि १ महिन्यातच ती स्वतःच्या  पायावर उभी राहू लागली होती .. आता घरात थोडी थोडी चालायची .. बसायची अशी प्रगती होती .. तिची तिचे केस विंचर , तोंड धुणे , किंवा हाताने जेवणे अशी कामे करू लागली .. आता माधव आणि राघव आई च्या जवळ बसू लागली

दोघे सारखे शालिनीच्या जखमांकडे बघायचे आणि म्हणायचे " आई हे काय ग , आई तुला दुखते का ? इथे दुखते का ? तिथे दुखते का ? असे बोट दाखवून दाखवून विचारायचे

शालीनि  सांगायची " बु झाला ..हात नको हा लावू तुला पण होईल "

तरी पण पोरं रोज विचारायचे आज बरा झाला का बु .. आदिती तर शालिनी कडे बघून नुसती रडायची .. तिला तिच्याकडे जायचे असायचे पण अजून शालिनी ला तिला घेता येत नव्हते .. मग दोन्ही आज्या तिला पण सांगायच्या "आई ला बु.. झाल्या .. तू जाऊ नको आई कडे "

एकंदरीत असे दिवस चालले होते .. शालिनीच्या पोटात पण एक बाळ होते .. दिवसां बरोबर तेही पोटात वाढत होते .. शालिनी आता पाचवा महिना लागला होता .. आता थोडे थोडे तिचे पोट  दिसू लागले  होते .

जसा तिला पाचवा महिना लागला शालिनी ची आई  म्हणाली मी आता जाते ग बाई .. तुझे बाबा त्या राजाच्या हातचे खाऊन कंटाळले असतील . आता तशी तू बरी आहेस .. सध्या मंगेश ने बाकी सगळ्या कमला बाई लावली होतो कारण या दोघी म्हाताऱ्या तरी किती किती करणार होत्या .. आता फक्त जेवणाचे आणि मुलानं बघायचंहे काम होत . मुलं काय दिवस भर खेळत राहायची .. भूक लागली कि खायला द्यायचे .. दोघे एकमेकांना होते त्यामुळे त्यांचे मन रामायाचे .. बाहेर खेळायचे .. आदिती पण आता बसयला , रांगायला लागली होती . ती खोलीत तिची तिची खेळायची .. जरा लक्ष ठेवायला लागायचे कारण माधव आणि राघव तिला मातीचे खडे शोधून आणून द्यायचे आणि हि माती खायला शिकली होती .

शेंगदाणे तर विचारूच नका .. आता आठ महिन्याची असेल .. त्यामुळे दात आले होते पुढचे .. बरोबर शेंगदाणा चवीनं खायची .

आता नको .. उद्या जा , थोड्या दिवसां नी जा असे बोल बोलता शालिनी ची आई ला मंगेश ने गाडीत बसऊन दिले ..

शालिनी पण भाज्या निवड , पीठ मळ अशी कामे करू लागली ... आदिती वर लक्ष ठेव चालूच असायचे .. दिसतात त्या जखमांना स्वतः मलम लावायचे .. स्वतःच्या गोळ्या खायच्या असे रुटीन पण चालू झाले आणि बोलबोलता शालिनी ९५% बरी झाली..

आता फक्त एक प्रॉब्लेम होता पटकन कोणी पहिले कि लोक घाबरायचे .. किंवा बाहेर गेलो कि लोक तिच्या जखमांकडे बघायचे .. त्यामुळे शालिनिला आणि मंगेश ला पण ऑकवर्ड होयचे . बरोबर आहे ना .. तसे शालिनी चे वय किती लहान .. त्याकाळी लग्न लवकर होयची आणि त्यामुळे मुले पण लवकर होयची  ..आता शालिनीचे वय अंदाजे २६ ते २७ असेल .. वयाच्या २७ साव्या वर्षी एवढा मोठा ऍसिडेन्ट आणि त्याचे डाग आत आयुष्यभर अंगावर राहणार होते .

शेवटी मंगेश ला वाटले त्या डॉक्टरनी सांगितले होते कि प्लास्टिक सर्जरी करून डाग थोड्या फार प्रमाणात घालवता येतील .

मंगेश आणि शालिनी  प्लास्टिक सर्जरी ची चौकशी करायला त्या ड़ॉक्टरांकडे गेले . डॉक्टरांनी त्या स्पेशल डॉक्टरांचा नंबर दिला .. पत्ता दिला आणि त्यांना विझिट  करायाला  सांगितले .

तरी पण डॉक्टरांनी सांसागितले " मंगेश आता जोपर्यंत तुमच्या बायकोची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत प्लास्टिक सर्जरी करता येणारच नाही .. प्लास्टिक सर्जरी ला खूप मोठ्या प्रमाणात भूल द्यावी लागते .. आणि आता त्या गरोदर आहेत तर हे डॉक्टर आता करू शकणार नाहीत . या शिवाय या सर्व ला खर्च पण खूप येईल . आता तुम्हाला वाटतंय पण या ज्या जखमा आहेत त्या कालांतराने आपोआप कमी होत जातील .. तसा त्यांचा चेहरा , मान जे पथम दर्शनी दिसणारे बॉडी पार्ट आहेत त्याला काहीच झालेले नाहीये .. हातावर थोडे  डाग आहेत ते दिसतात .. शेवटी तुमचा निर्णय आहे .. तुम्ही घेऊ शकता कधी पण फक्त डिलिव्हरी नंतर . “

मंगेश ने आणि शालिनी ने ठरवले .. सध्या डिलिव्हरी होऊन जाऊ दे मग मुबई च्या डॉक्टरांकडे जाऊ मग ठरवू

शालिनी आता भाजलेल्या जखमांपासून पूर्ण मुक्त झाली होती आणि आता ती घ रा बाहेर पूर्वी सारखी पडू लागली . कधी विहिरी वर पाणी आणायची .. कधी जेवण बनवायची हळू हळू गाडी बॅक  टू रुटीन होऊ लागली होती . मंगेश एक महिना पुनः ऑफिसाला व्यवस्थित जाऊ लागला होता आणि पुन्हा त्याने स्वतःला ऑफिस च्या कामात झोकून दिले होते .. मन लावून पुन्हा पूर्वी सारखे काम करू लागला होता .. डोक्यावर कर्ज असले तरी घरात परिस्थिती नॉर्मल होत असल्याने तो हो थोडा थोडा स्ट्रेस फ्री होत होता .

मंगेश ची आई ला सुद्धा गावीही जावेसे वाटत होते .. आता शालिनी बरी  झालीय .. मी पण बरेच दिवसात गावी गेले नाही तर आता मी गावी जाते .. डिलिव्हरी च्या वेळी परत येईल असे बोलू लागली . मंगेश ला काय आई ला पाठवायची मनाची तयारी होई ना ... तशी शालिनी बरी झालीय पण तीन तीन मुलांना सांभाळायचे आणि त्यात ७ महिन्याची गरोदर  त्यामुळे परिस्थिती नॉर्मल नाहीच आहे .

या वर विचार करून मंगेश ने एक निर्णय घेतला जो कि त्याच्या आई ला पण आवडला आणि शालिनी ला पण पटला .. त्या दोघी खुश तर मुले खुश आणि आई , बायको आणि मुले खुश म्हणजे मंगेश राव पण खुश ..

🎭 Series Post

View all