संघर्ष एक कथा - भाग २०

In this part mangesh wants to take one big decision in his life but shalini is not with him

                                                           संघर्ष एक कथा 

भाग २०

क्रमश: भाग १९

दीक्षित गुरुजींचे यथासांग उत्तरकार्य करून मंगेश आणि शालिनी पुन्हा त्यांच्या घरी आले .. अचानक बाबा गेल्यामुळे शालिनी अजून दुःखातून बाहेर आली नव्हती . तिला खर तर अजून आई बरोबर राहायचे होते पण मंगेश ने तिचे काही ऐकले नाही आणि तिला पण घेऊन आला ..त्याचे म्हणणे हेच होते कि इकडे राहिलीस कि अजून दुखी राहशील . तिकडचे रूटीन  सुरु झाले कि माणूस थोडे दुःख विसरून जातो .. आणि एक महिन्यांनी तो तिच्या आई ला तिकडेच आणणार होता हवापालट म्हणून .

शालिनी ची पण तिच्या क्लास ला सुट्टी झाली होती .. आल्यावर पण तिने अजून दोन दिवस सुट्टी घेतली आणि मग पुन्हा क्लास ला जाऊ लागली ..

वडील गेल्यावर शालिनीला पण थोडी विरक्ती जाणवायला लागली आणि ती पण थोडी ज्ञानाकडे ओढली गेली . आणि ती पण मंगेश बरोबर सकाळी  योग् करू लागली . मंगेश वाचायचा आणि शालिनी ऐकायची असा एक अध्यात्मिक अभ्यास दोघांचा सुरु झाला .

मुले पण शाळेत हुशार होती . वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घ्यायची , चित्रकला स्पर्धा , निबंध स्पर्धा सगळ्यात बक्षिसे मिळवायची . आणि शाळेत पण अभ्यासात हुशार होती . सध्या मराठी मिडीयम मध्ये होती मग चौथी पासून इंग्लिश मिडीयम ला टाकणार होते .. शालिनीचा पण अभ्यास जोरात चालू होता . बोल बोलता तिचा पण कोर्स पूर्ण झाला.. चांगल्या मार्कांनी ती त्या कोर्स मध्ये पास झाली .. आणि ठरल्या प्रमाणे तिला बालवाडी टीचर म्हणून जॉब पण मिळाला .

शालिनी सकाळी पोळी भाजी करून सकाळी शाळेत जायची आणि मुले पण  त्यांचे त्यांचे आवरून शाळेत जायची ..

मंगेश चा अध्यात्मिक अभ्यास जोरात चालू होता . त्याने त्याच्या बऱ्याच मित्रांना ओळखीच्या लोकांना , किंबहुना जे जे त्याला भेटतील त्यांना हे ज्ञान सांगायचं . आता जवळ जवळ २५ एक लोक त्या ज्ञानामध्ये मंगेश ने आणि शालिनीने तयार केले. मग सर्विंनी मिळून पैसे काढून एक खोली घेतली रोज सकाळ संध्याकाळ तिथे आध्यत्मिक वाचन मंगेश करायचा .. काय वाचायचे हे त्याला सत्संगाच्या हेड ऑफिस कडून यायचे आणि त्याचा अर्थ मंगेश समजावून सांगायचा .. आता मंगेश च्या आयुष्यातील एकमेव ध्येय होते ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करायचा शिवाय आपला स्वतःचा अध्यात्मिक अभ्यास चालू ठेवायचा . शालिनी पण त्याच्या या मार्गावर पाऊलावर  पाऊल टाकत होती .

नुसती शालिनीच  नाही तर मंगेशची आई आणि त्याची  लहान मुले पण सकाळी उठून अंघोळ केली कि वाचन ऐकायला जायची .. मंगेश  ची फॅमिली अध्यात्मिक फॅमिली झाली . लहान मुले पण धारणा करायची ...नातेवाईकांकडे गेल्यावर पण त्यांच्यासाठी व्हेज जेवण बनवले जायचे .वास्तविक पाहता मुलावर कोणतीही बंधने नव्हती तरी पण ज्या मार्गावर आपले आई बाबा चालतात तेच ती पण पाळायची ..

मग जेवढ्या फॅमिली जमल्या त्यांची सर्वांची मुले पण होती मग खास मुलांसाठी आध्यत्मिक क्लास घेऊ लागले .. त्यात मुलांना छन गोष्टी सांगून कसे वागावे , काय करू नये अश्या गोष्ठी तुन ज्ञान सांगितले जायचे . " बदला नहीं लेना किसीसे बदल के हमको दिखाना हैं । अशी गाणि शिकवायची ..

मंगेश म्हणजे वाल्या चा वाल्मिकी व्हावा असाच काहीसा बदलला होता . ह्या ज्ञानाने त्याच्या आयुष्यात खूप फरक पडला . त्याचा कॉन्फिडन्स पण खूप वाढला .समोर कितीही लोक असू दे , किंवा कोणत्याही हुद्यावर काम करणारी लोक असू दे तो हे  ज्ञान सांगताना घाबरायचं नाही .. नंतर लोक त्याला हि माहिती जाणून घ्यायला त्याला बोलवायची . कशी शाळेत , कधी कोणत्या तरी ऑफिस मध्ये , कधी फॅक्टरी मध्ये तो आणि त्याचे सहकारी हे जाऊन जाऊन ज्ञान वाटायचे  ज्ञान दुसरल्या सांगणे हीच मुळात एक सेवा समजली जायची . त्यात ज्ञान समजल्यावर योग म्हणजे मेडिटेशन कसे करायचे हेही शिकवायचे .. हि अशी सेवा संसार सांभाळून करण्यात मंगेश ने त्याचे पुढील सर्व आयुष्य वेचले .  .

मंगेश चे कर्ज काही अजून संपली नव्हती . त्यांच्या गावात एक वाण्याचे दुकान होते . त्यांच्याकडे त्यांचे खाते होते . खाते असणे म्हणजे त्यांच्याकडून जिन्नस उधार आणायचे .. जे जे लागेल ते सामान आणायचे आणि या महिन्याचे पैसे पुढल्या  महिन्यात जेव्हा सामान घ्यायला याला तेव्हा द्यायचे . म्हणजे एक महिना तुम्हाला क्रेडिट पिरियड मिळतो .

तर हे दुकान असलेले सद् गृहस्थ मंगेश च्या घरातले एक मेंबर असल्या सारखेच झाले होते . १० वर्ष मंगेश त्यांच्या कडूनच सामान घरात भरायचा . आणि मंगेश पोस्टात आहे म्हणजे आज ना उद्या तो पैसे नक्की देणार याची खात्री तर होतीच . त्याचे इतके चांगले संबंध झाले कि शालिनी ला ते बहीण मानत . शालिनीला सख्खा भाऊ नव्हताच . दर वर्षी रक्षा बंधनाला राखी बांधून घ्यायचे. भाऊ बीजेला ओवाळून घ्यायचे .  येत जात कधी चहा प्यायला घरी  यायचे. कधी  मंगेश ची फॅमिली पण त्यान्च्याकडे जायची असा घरोबा झाला होता .. नंतर मग मंगेश कधी दोन महिन्यांनी एकदम पैसे द्यायचा , कधी लगेच द्यायचा .. कसे जमेल तसे ..शालिनी चा ऍक्सीडेन्ट झाल्यावर तर कित्येक महिने त्यांना पैसे द्यायला मिळाले नाही पण सामान मात्र भरपूर लागायचे .. खूप लोक यायचे तिला बघायला .राहायला .. त्याचा हिशोब करतोय अशातला भाग नाही पण नेहमी पेक्षा सामान जास्त लागायचे .. शिवाय आता मुले पण मोठी होऊ लागलीत .. वाढतं वयाच्या मुलांना  वेग वेगळं खाऊ लागतो .. मंगेश चो थोडी मोठी कर्ज आणि हे त्यांचे एक कर्ज हि देणी होती . त्याच्या साठी त्याला त्याकाळी २५०००/- ते ३००००/- देणे होते .

मंगेश ला सारखे वाटायचे हि देणी एकदा संपली कि मी मोकळा होईन . पण इतकी मोठी रक्कम अचानक कुठून मिळणार .. लॉटरी लागली तरच होईल .. कुठे तरी बॅक ऑफ द माईंड हा विचार त्याला सतावत होता.

शालिनी चा थोडा फार पगार आणि त्याचा पगार ह्याने घरखर्च भागत असे पण वेगळे काही करता येत नव्हते . आणि आहे ती जमीन विकून वैगरे सुद्धा हि कर्ज काही संपणारी नव्हती .

एकंदरीत संसार चालवण्यासाठीची ओढाताण काही कमी नव्हती झालेली .

ह्यावर काय मार्ग .

मंगेश ची नोकरी हि सरकारी नोकरी होती . २० वर्षे नोकरी झाली कि स्वेच्छा निवृत्ती घेता येते . आत्ताचा जो पगार चालू आहे तेवढी पेन्शन चालू राहते शिवाय

पी एफ,, ग्रॅजुटी  ची रक्कम पण एक हाती मिळू शकणार  होती . त्याच्या डोक्यात नोकरी सोडू का ? म्हणजे मला  खूप सारी रक्कम एक हाती मिळेल आणि माझी जी देणी आहेत त्यातून मी मुक्त होईन . शिवाय हि नोकरी सोडली तरी मी दुसरी कडे नोकरी तर करेनच , म्हणजे पेंशन + नोकरी केली तर तो पगार , आणि शालिनी चा पगार असा महिन्या चा  खर्च भागेल .

हा विचार दिवस रात्र त्याच्या डोक्यात घोळत होता .

शालिनी नको .. काहीतरी काय बोलता .. अहो सरकारी नोकऱ्या कोणाला मिळत नाहीत आणि तुम्ही सोडायची काय म्हणताय .. अजून आपली मुले किती लहान आहेत तृप्ती आता ५ वित गेलीय. मोठा माधव आता दहावी झालाय .. त्याला शिक्षणासाठी पैसे लागतील ..

मंगेश " अग  तेच तर नाहीयेत  माझ्याकडे .. जर मी हा निर्णय घेतला तरच आपल्याला देणी देऊन थोडे फार पैसे मिळतील . मी  काहि रिकामा बसणार नाहोये ,मी काहीतरी बिझनेस काढून म्हणतो .. मी माझ्या मर्जीचा मलिक होईन मग .

शालिनी " कसला बिझनेस ? आपल्या सारख्यांना जमतो का बिझनेस ?

मंगेश " अग  करून बघायला काय हरकत आहे ? आधीच नकार घंटा कशाला लावतेस ? मोठा विचार केला तरच माणसे मोठी बनतात . "

 शालिनी आणि मंगेश या दोघांचे या विषयावर एकमत काही होई ना

शालिनी च्या दृष्टीने पण व बरोबरच होती . ह्या निर्णयात खूप मोठी रिस्क होती . जर हा निर्णय चुकला तर .. पुन्हा काय सरकारी नोकरी मिळणार आहे का ? बरे बिझनेस करायचे म्हणजे किती कष्ट आहेत .. मंगेश आता ४० वर्षांचा आहे .. म्हणजे म्हातारा जरी झाला नसला तरी जसे वय वाढते तशी शारीरिक क्षमता कमी होत जाते .. बरं अजून मुले लहान आहेत , त्यांची शिक्षणे होयचीत .. तिला  वाटणारी काळजी रास्त होती .

त्याचा ऑफिस मध्ये बरेच सरकारी त्याला घरी येऊन येऊन सांगू लागले .. मंगेश आहे ती नोकरी  सोडू नकोस .. हा निर्णय चुकीचं वाटतोय . काही जणांना वाटायचे कि हा त्या अध्यात्मिक मार्ग मध्ये जाऊन त्याची मती भ्र्ष्ट झाली .

अजून तर मंगेश ने निर्णय घेतला नव्हता पण ऑफिस मधल्या मित्रांशी चर्चा करायचा . त्यामुळे सर्वांना माहित झाले होते .

अचानक मंगेश ची सासू म्हणजे शालिनीची आई राहायला आली . शालिनी ने पण आई ला सांगितले कि मंगेश पोस्टाची नोकरी सोडायच्या विचारात आहे .

शालिनीच्या आई ला आता खर तर मंगेश च  खूप राग येऊ लागलं होता .. आधी काय तर नॉन व्हेज बंद त्याच्या मुळे शालिनी पण व्हेज झाली . ती पण एक साधक झाली .. सारखे ज्ञान आणि धारणा या विषयी चर्चा चालू असायच्या .. आणि काही वेळा नातेवाईकां बरोबर वादावादी पण होयची , मंगेश त्याचा मुद्दा सोडायचा नाही आणि बाकीचे लोक तू कसा चुकतोय हे सांगायचे .. त्याला काही पण बोला पण ज्ञानाला काही कोण बोलले कि मंगेश ची सटकायची . तो त्याचा मुद्दा पटवून देता देता त्याचा आवाज चढायचा पण लोकांना वाटायचं कि हा भांडतोय .. असो हे सगळे शालिनीची आई बघून घेत  होती .. ज्ञान विषयी म्हणून काही बोलायची नाही .. पण आता मात्र हद्दच झाली .. आहे ती सरकारी नोकरी सोडायचा विचार म्हणजे अविचारच आहे असे तिला वाटले ..

शालिनी ची आई  मंगेश ला म्हणाली " आम्ही शालिनीला तुम्हाला सरकारी नोकरी आहे म्हणून दिली .. नाहीतर काय होते तुमच्याकडे ?"

मंगेश म्हणाला मी काय गाढव आहे का ? तुम्ही जो विचार करताय हे मला कळत नाही का ? पण माझ्या जवळ हाच  एक पर्याय  आहे . त्यामुळे च मी मुक्त होऊ शकेल .

आणि सरकारी नोकरी चा फायदा पेन्शन ती तर मला आता पण मिळणारच आहे .. आणि मी मेल्यानंतर पण शालिनी ला पण मिळणारच आहे .. त्यामुळे तुम्हाला काळजी नसावी .. तुमच्या मुलीचे कोणतेही नुकसान होणार नाहीये .. "

शेवटी शालिनी मध्ये पडली आणि वादावादी चे रूपांतर भांडणात न होऊ देता विषयाला फुल्स्टोप लावला .

अशा पद्धतीने मंगेश चा निर्णय एकंदरीत सगळ्यांना च चुकीचा वाटत होता आणि तो ऐकत नसल्यामुळे तो स्वतःचे नुकसान करून घेणार आहे असेच वाटत होते . शिवाय नोकरी सोडणे हा निर्णय घेण्यात खरोखरच एक रिस्क होतीच म्हणूनच तर त्याची   पण चीड चीड होयची .. त्याला हि हे दिसत होते कळत होते कि एक तर झेंडा अटकेपार जाईल किंवा आपल्या संसाराची नाव बुडालीच ..

🎭 Series Post

View all