संघर्ष एक कथा भाग - २१

In this part mangesh is going to take one more big decision

संघर्ष एक कथा भाग - २१

क्रमश : २०

मंगेश सध्या एका वेगळ्याच विचारात होता .. ते म्हणजे नोकरी सोडू का नको या विषयावर अनेकदा अनेकांशी त्याचे डिसक्शन झाले . जो तो त्याला तेच सांगे कि नोकरी सोडू नयेस .. ह्या झाल्या सांसारिक गोष्टी याचा  परिणाम त्याने त्याच्या अध्यात्मिक जीवनावर प्रभाव पडू दिला नाही . उलट त्याला असेच वाटत असे कि खुद्द परमेश्वर हा निर्णय घ्यायला सांगतोय .. नाहीतर मला हि कल्पना सुचलीस नसती . अध्यात्मिक ज्ञाना चा एक त्याच्यावर झालेला  प्रभाव होता .. कारण परमार्थात किंवा भक्तीत हेच सांगितले आहे कि प्रत्येक काम करताना तुम्ही मनोमन देवाशी बोलून किंवा परमेश्वराशी बोलून करायचंय असता . त्याच्या आठवणीत केलेल्या कोणत्याही गोष्टीत तुमचे नुकसान होऊच शकत नाही .

एक दिवस अचानक त्या सत्संगाच्या मुख्य संचालिका हेड ऑफिस मधून त्या शहरात आल्या .. त्या संचालिका  अश्या वर्षातून एक दोनदा विझिट करायच्या .. लोकांना काही शंका असतील , किंवा किती लोक झालेत , नवीन कोण आलेत , जुने किती गेलेत हे असे सगळे बघून जायच्या .. नवीन लोकांनशी ओळख करायच्या ... चांगली प्रवचन करायच्या .. वाचन ,मनन , चिंतन. योग कसा करायचा असे त्या सांगायच्या .. त्या आल्या कि लोकांना साक्षात देवी चे दर्शन घेतो कि काय असेच वाटायचे .. त्यांच्या चेहऱ्यावरील तेजाने कित्येक लोकांच्या डोळ्यातून अश्रू यायचे ..

तर त्या संचालिका त्यांचे काम झाल्यावर जायच्या आधी त्यांनी मंगेश ला भेटायला बोलावले . कारण त्या शहरात पहिला साधक हा मंगेश होता आणि बोल बोलता मंगेश ने अनेक लोक त्या सत्संगात जोडली होती .  त्याच्या कडे बघून बरेच लोक येत होते आणि त्या शहरात त्या सत्संगाचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीने चालला होता . इतकया कमी वेळेत हे मंगेश ने करून दाखवले होते ...

संचालिका यांच्याशी बोलायला मिळणे सुद्धा एक गौरवास्पद घटना वाटत असे . या सगळ्या कर्मात शालिनी चा त्याला मिळालेला सपोर्ट पण फार महत्वचा  होता

कारण असे हि किती तरी जोडपी होती कि नवऱ्याला ज्ञान पटलंय पण बायकोला नाही , बायकोला पटलंय पण नवऱ्याला नाही ..त्यामुळे त्यांचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही अपूर्ण राहिला होता . दोघांना एकदम विरक्ती होऊन ज्ञान धारणा पाळणे हे काही सोपे काम नाही .

मंगेश आणि शालिनी दोघे त्या संचालिकानां भेटण्यासाठी गेले

संचालिका यांनी मंगेश आणि  शालिनीचे भरभरून कौतुक केले .. तुम्ही या शहरात सत्संगाचा खूप चांगली पद्धतीने प्रसार केला आहेत .. असच करत रहा .. शिवाय स्वतःच्या परमार्थाकडे पण लक्ष द्या .वगैरे वगैरे बोलून झाल्यावर त्या संचालिका सुद्धा मंगेश ला म्हणाल्या कि नोकरी मग ती सरकारी असो किंवा प्रायव्हेट संसार करण्यासाठी आपल्याला नोकरी  करावीच लागते कारण आपल्या  ज्ञानाचा सार हाच आहे कि संसारात राहून परमार्थ करायचा आहे . नाकी संसार सोडून . जसे कमळं हे नेहमी चिखलातच उगवते तसेच संसारात राहून आपल्याला हि  तपस्या करायची आहे .

मंगेश ने त्यांना पण सांगितले कि मी हा निर्णय माझ्या स्वतःच्या होश मधेच घेत आहे .माझ्या सांसारिक गरजा पूर्ण होण्यासाठी मी हे   करत आहे .. बाकी नाही ..

संचालिका " ठीक आहे .. कारण उद्या असे नको होयला कि लोक म्हणतील कि  सत्संग मध्ये गेला आणि नोकरी धंधा सोडून बसला .. यासाठी च मी एकदा विचारले . हा तुमचा  जर वैयक्तिक निर्णय असेल तर माझे काहीच म्हणणे  नाही .”

त्यांचे पण बरोबरच होते उगाच एखाद्याने जर चुकीचा अर्थ घेऊन स्वतःच्या संसार मोडला तर त्याचे खापर सत्संग वर पडू नये यासाठी त्यांनी विचारले  .

मंगेश चा मनातून अल्मोस्ट निर्णय झालाच होता .. त्याने २०वर्ष पूर्ण झाल्यावर सरकारी नोकरी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोडली . त्याने म्हटल्या प्रमाणे त्याला पी एफ , ग्रॅजुटी चे असे मोठी रक्कम मिळाली . त्याने त्याची सगळी देणी क्लिअर करून टाकली आणि ती कर्जमुक्त होऊन त्या रात्री खूप शांतपणे झोपला .

देणे दिल्यानंतर थोडी फार रक्कम त्याच्याकडे शिल्लक होती त्यात त्याने बरीच राहिलेली कामे केली .. ते म्हणजे त्याने गावचे घर दुरुस्त केले .. त्याला सिमेंटच्या भिंती बांधल्या .. गावाच्या घरात अजूनही लाईट नव्हते .. अजूनही मंगेश ची आई गावाला गेली कि दिव्यावर दिवस काढायची ..मंगेश ने घरात लाईट आणली . इकडे शहरात शालिनीची खूप गडबड होयची  स्टोव्ह वर आणि चुलीवर अजून जेवण करायची किंवा भुशाची शेगडी वापरायची .. इकडे घरात गॅस घेतला . आणि मग उरलेल्या पैशात त्याने एक बिझनेस सुरु केला .

एका सामान्य माणसाने एक वेगळाच निर्णय घेतला होता .. त्याने नोकरी सोडून बिझनेस सुरु केला होता . आणि त्या बिझनेस च्या मशीनरी त्याने गावातल्या घरात आणल्या आणि तिकडेच त्याचे उदघाटन केले . या मुळे  काय झाले तर त्याचे जे गावाशी कनेक्शन तुटले होते ते आता जोडले जाणार होते . शहरात मार्केटिंग करायचे , ऑर्डर्स मिळवायच्या आणि मुंबई मधून कच्चा माल आणायचा आणि त्यावर काम गावाला करून फायनल प्रॉडक्ट ची डिलिव्हरी करायची .. तर मंगेश चे प्रॉडक्ट होते " ऑफिस फाइल्स ". त्याचा ऑफिस फाईल्स चा कारखानाच होता . मशीन वरचे काम मंगेश , माधव आणि राघव करायचे आणि छोटी छोटी कामं आदिती आणि तृप्ती पण करायच्या .. तर असा मंगेश काहीतरी वेगळाच होता. पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचा. सर्व सामान्य माणसाला असा निर्णय घेऊन त्यावर तो अमलात आणणे  जमले नसते किंबहुना हा असा निर्णय त्याने घेतलाच नसता . पण मंगेश हा सामान्यातला असामान्य होता . त्याने हा निर्णय घेऊन हे सिद्ध केले होते . तरी पण तुम्ही त्याला विचारलेत तर तो म्हणतो मला माझ्या परमेश्वराने गाईड केले .

सत्संग मध्ये गेल्या पासून त्याच्या आयुष्यात ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी घडायच्या त्याचे श्रेय तो परमेश्वरालाच द्यायचा .

पुढे थोडे दिवस हा बिझनेस चालला . नंतर सगळ्यातच कॉम्पिटिशन असते , त्यात तरता  आले पाहिजे .. जे प्रॉडक्ट कमी किमतीत मिळतंय तेच लोक घेतात . ह्याचा काही खूप मोठा बिझनेस नव्हता मग म्हणावा तसा त्यात प्रॉफिट होईना . मशीन चे हप्ते जाईनात . मग शेवटी त्याने पुन्हा एक ठिकाणी अकॉउंटस ची नोकरी चालू केली .. पण आता त्याने ठरवले होते कि मोठी कर्ज होऊ द्यायची नाहीत .. दोघांच्या पगारात घरखर्च भागायचा .. एखादी ऑर्डर मिळालाय तर मुलांना घेऊन तो पूर्ण करायचा .. माधव आणि राघव ची त्या वेळी खूप मदत होयची .

मुले मोठी होत होती .. पण या कामासाठी त्याला मदत करायची . माधव छोटी मोठी नोकरी पण करायचा . कॉलेज ला पण जायचा . माधव फायनल वर्षाला गेला आणि त्याने लव्ह मॅरेज केले . मंगेश ने त्याला तेव्हा लग्न करण्यास सपोर्ट केला . आणि त्याचे लग्न लावून दिले .तोपर्यंत राघव १२ वि पास झाला आणि त्याला पुण्या सारख्या मोठ्या शहरात जॉब लागला तो पुण्याला गेला . माधव आणि त्याची बायको दोघांचे शिक्षण पूर्ण झाले मग माधव ला पण त्याच शहरात नोकरी लागली ज्या शहरात राघव गेला होता . मग काय दोन्ही मुले शहरात गेले इकडे  मंगेश त्याची बायको आणि दोन मुली राहायच्या .. आजी बाई जाऊन येऊन असायची . आणि आता गावाला मंगेश च्या वरच्या वर फेऱ्या होयच्या.

मुली पण मोठ्या होत होत्या .. तसा  दोघींच्या वया  मध्ये जास्त फरक नव्हता . एका मागे एक दहावी आणि बारावी ला चांगल्या मार्काने पास झाल्या . आदिती १२ वीला चांगल्या मार्कांनी पास झाली तशी ती लगेच एका सी ए च्या अंडर काम करू लागली . तृप्ती कॉलेज च्या लायब्ररी मध्ये पार्ट टाइम जॉब करू लागली . शालिनी ची १५ वर्षे नोकरी झाल्यावर तिने शाळेची  नोकरी सोडली . मंगेश पण एक  छोटा मोठा जॉब करत होता .. एखाद दुसरी फाइल्स ची ऑर्डर मिळाली  तर पूर्ण करायचा . पण हल्ली ऑर्डर्स मिळणे कठीण झाले होते .

तिकडे मोठ्या शहरात मुलांचा  त्यांचा त्यांचा संघर्ष सुरु झाला होता . माधव ला जॉब ला लागला होता .. त्याने एक फ्लॅट रेंट वर घेतला  होते . त्याला एक लहान मुलगा पण झाला होता .. त्याची बायको त्याला छान साथ देत होती ..एका मागे एक दोघे स्वप्न साकारत होते . जेव्हा माधव चे लग्न  झाले तेव्हा माधव शिकत होता .. ना जॉब , ना घर , ना मालमत्ता ..ह्याला म्हणतात खरे प्रेम ..त्यांचे भविष्य त्यांनीत्यांच्या प्रेमाने घडवले होते . आणि माधव ला चांगला जॉब लागला होता आणि मोठ्या शहरात तो हळू हळू सेटल होत होता .

राघव ला चांगल्या कंपनीतुन  कॉल आल्या मुळे त्याचे पण स्टार्स फिरले होते . त्याची  राहण्याची, खाण्याची सोय कंपनीने केली होती . पण राघव अजूनही ज्ञान मार्गावर चालत होता . कंपनीतले जेवण खात नसे .. फक्त दही भात किंवा दही चपाती खायचा .. म्हणजे उपासमार नको होयला म्हणून . त्याचे काम आणि ज्ञान धारणा त्याने चालू ठेवली .

एक वर्षाला राघव दिवाळीला घरी आला तर तो मंगेश ला म्हणाला " बाबा दादा आणि वाहिनी पण तिकडेच आहेत .. आणि माझा हि जॉब तिकडेच आहे . आई ची नोकरी पण तिने सोडलीय आणि तुम्ही पण रिटायर्ड आहात .. आदिती आणि तृप्ती चे राहिलेले शिक्षण तिकडे पण होऊ शकते . आपण सर्वच तिकडे शिफ्ट झालो तर सगळे एकत्र  राहू .. तुम्हाला पण तिकडे छोठी मोठी नोकरी करता येईल . इकडच्या पेक्षा तिकडे पगार पाणी पण भरपूर आहे ..

मंगेश चे एक वैशिष्टय एक होते कि परिवर्तनाला तो कधीच घाबरला नाही . आत्ता पर्यंत त्याने आयुष्यात इतके

चढउतार पहिले होते ..आता थोडे तसे वय पण झाले होते .. तरी पण एक नवीन विचाराने  त्याला पुन्हा काहीतरी करण्याची उर्मी आली होती .. कोकणाल्या  एका छोट्या शहरात आयुष्य गेल्यानंतर मंगेश

पुण्यासारख्या मोठ्या शहराकडे झेप घेणार होता .

🎭 Series Post

View all