संघर्ष एक कथा - भाग २२

In this part mangesh left his city where he stayed for almost 25 years .

                                            संघर्ष एक कथा - भाग २२

 क्रमश : भाग २१

मंगेश ला राघव चे म्हणणे पटले . त्यालाही वाटले कि इट्स टाईम तो चेंज . राघव आला तेव्हा राघव ला ८ दिवसांची सुट्टी होती .पुण्यात काय काय आहे .. काय काय करू शकतो . माझा ट्रेनी पिरियड संपल्यावर मला त्याच कंपनीत जॉब मिळेल . आणि इन केस नाहीच मिळाला तर पुण्यात तश्या अनेक कंपन्या आहेत ..या ट्रेनिन्ग वर मला नक्कीच कुठे ना कुठे तरी मिळेल. मुलींच्या शिक्षणाचे बघाल तर पुणे शिक्षणाच्या दृष्टीने तर बेस्टच आहे .

मंगेश ला पण त्याच्या कामाच्या एक्सपेरिअन्स वर कुठे तरी चांगला जॉब मिळेलच .

याशिवाय प्रत्येकी माणसाला आपला समाज पण प्रिय असतो. तस गावातील त्यांच्या जातीच्या /समाजाच्या लोकांमध्ये मंगेश काम करायचा .. प्रत्यक्ष काम नाही करायला मिळाले तरी वर्षातुन एकदा देणगी द्यायचा . तसाच पुण्यामध्ये पण मोठा समाज  कार्यरत होता .

पुण्यासारख्या ठिकाणी माणूस सेट तर नक्कीच होऊ शकतो फक्त आलेल्या संधी समजून त्याचा उपयोग करता आला पाहिजे ते हि न घाबरता . मुले  तर मोठी झाली होती पण शालिनी मंगेश ची आई आणि दोघी मुली थोड्या घाबरल्या होत्या . घरा बाहेर आपल्याला जमेल का ? एवढ्या मोठ्या शहरात कॉलेज ला जायचे . तिकडे मॅनेज होईल का ?

शालिनी ला वेगळीच भीती वाटतं होती . तिकडे जाऊन मंगेश जॉब शोधणार कधी आणि  मिळणार कधी ? कारण राघव तसा अजून ट्रेनी च होता . त्याला पोटा  पाण्या इतकाच पगार होता . माधव पण आत्ताच तिकडे गेला होता त्यामुळे सर्वांना च पगार पाणी अजून कमीच होता. नोकरी शिवाय कसे मॅनेज होईल . मग आधी जॉब शोधावा का आधी शिफ्टिंग  करायची. अख्खा संसार तिकडे नेल्यावर जर असे वाटले कि इकडे आपल्याला जमत नाही तर पुन्हा कुठे जायचे ? मग तर गावालाच यायला लागेलं . या वयात एवढा मोठा चेन्ज जमेल का ?

 मंगेश आई तरी पुण्याचे नाव ऐकूनच घाबरली . ह्या शहरातून ती एकटी बस मध्ये बसवून दिले तर गावी जाऊ शकत होती . तेही तिच्या मानत येईल तेव्हा . एकदा का पुण्याला गेलो तर ती काय गावी येऊ शकणार नाही . त्यामुळे ती नकोच म्हणत होती . मला आपले गावाला ठेवा आणि तुम्ही जायचं तर जा असे म्हणत होती .

आदिती चा इकडे जॉब चालू होता . शिवाय ती क्लासेस घ्यायची . अचानक बदल झाला तर हे सगळेच सोडून द्यावे लागणार होते .

तृप्ती च तर मित्र मैत्रिणी आणि सोशल ऍक्टिव्हिटी खूप असायच्या .. कॉलेज मध्ये जॉब पण करत होती . जन्मापासून इकडेच राहिल्याने . त्या शहराची दोघी मुलींची एक वेगळीच नाळ जोडली होती . आणि कधी मनात पण आले नव्हते कि इथून कुठेतरी जाऊ म्हणून . आणि त्यात पुण्याचे नाव फक्त पुस्तकात ऐकलले .

राघव ची सुट्टी संपली आणि राघव पुन्हा कंपनीत गेला . मंगेश ने राघव ला सांगितले कि तू  एखादे घर रेंट वर मिळते का बघून ठेव .. तोपर्यंत मी पैशाचे बघतो .. शिफ्टिंग करायचे म्हणजे  ४००००/५०००० तरी हातात लागतीलच . मार्च मधे या पोरींचे हे  चालू वर्ष पण संपेल मग त्या नंतर बघू शिफ्टिंग चे .

आता एवढं एपिस आणायचा कुठून .

त्याचे झाले असे मध्यंतरी मंगेश ज्या  खोली मध्ये रेंट वर राहत होता ती चाळ त्या मालकाने बिल्डर ला बांधायला दिली आणि जे भाडेकरू २० वर्षांपेक्षा जास्त वर्ष राहिलेत त्यांना त्याच्या खोली इतकीच जागेचा फ्लॅट बांधून दिला . पण थोडे पैसे आणि रजिस्ट्रेशन वगैरे हा खर्च भाडेकरू ने दिला . मंगेश सारखेच अजून ५ भाडेकरू होते जे कि त्या च  चाळीत २० वर्षे राहिले  होती . सर्वांनाच  घरमालकांनी असा फ्लॅट दिला होता  

त्यामुळे मंगेश चा इकडे आपोआपच फ्लॅट झाला होता . जे काही पैसे भरायचे होते ते मंगेश ने हप्त्या हप्त्याने भरले होते .

पुण्याला जाण्यासाठी एवढी रक्कम उभी करण्यासाठीं मंगेश जवळ हे राहते घर विकण्या खेरीज पर्याय नव्हता .

शालिनी या गोष्टी ला तयार होई ना . इकडचे घर विकून पुण्याला भाड्याच्या घरात राहायचे . हे गणित काही तिला पटे ना . इतक्या वर्षांनी इकडे आत्ता दोन वर्षांपूर्वी आपले स्वतःचे घर झालेय ते पण विकायचे .?

पण मंगेश खरा कर्मयोगी होता . त्याचा  असल्या गोष्टीत कधीही जीव अडकला नाही .

साधारण मार्च एन्ड ला मंगेश पुण्याला राघव ला भेटायला म्हणून गेला .

 सर्वात पहिले त्याने  ह्या सत्संगात जाणाऱ्या लोकांची भेट घेतली   . राघव ला आता पुण्यात येऊन  ३ वर्षे झाली होती त्यामुळे त्याचे बरेच जण तसे ओळखीचे झाले होते .

ज्या ठिकाणी  सत्संगाचे रोज वाचन होते त्या ठिकाणचे बऱ्याच लोकांशी त्याची ओळख झाली होती . त्याने मंगेश ला सर्वांना भेटवले .

मंगेश ने पण त्यांना सांगितले कि असे असे माझा मुलगा सध्या ट्रेनी आहे पण जॉब इकडेच करणार आहे . तर आता आम्ही सर्व फॅमिलीला इकडे शिफ्ट करण्याचा विचार करतोय.

कुठे जागा रेन्टवर वगैरे मिळत असेल तर सांगा . त्याच रेफरन्स मधून मंगेश ला दोन तीन फ्लॅट बघायला मिळाले . पण पुण्याच्या फ्लॅट चे रेंट त्यावेळेला कमीत कमी १००००/- ते १२०००/- होते शिवाय डिपॉझिट वेगळे. पण मंगेश ला आता ह्या निर्णयावर लोवकारात लवकर निर्णय घ्यायचा होता . चार पाच फ्लॅट  पैकी  एक फ्लॅट मंगेश ने फिक्स करून टाकला . पुढल्या महिन्याचे ऍडव्हान्स भाडे आणि डिपॉझिट चा चेक देऊनच आला .

इकडे शालिनी ला वाटले कि जाणे झाले तरी इतके लवकर  काही होणार नाही . थोडे दिवस जातील . थोडा विचार करायला वेळ  मिळेल . पण छे . मंगेश आला ते भाड्याचे घर बुक करून पैसे भरूनच आला आणि नेक्स्ट १० दिवसात आपल्याला पुण्याला शिफ्ट होयचेय सांगू लागला .

मुलीच्या या वर्षीच्या नुकत्याच परीक्षा झाल्या होत्या. म्हणजे त्यांचे वर्ष पूर्ण झाले होते .

सर्वांना असे झाले होते कि काय काय करू ? कोणाला कोणाला सांगू ? कोणाला भेटू ? कुठल्या मंदिरात जाऊ ? कुठल्या मैत्रिणी कडे जाऊ ? आता जी भेट होईल ती शेवटची भेट . कोणी म्हणे पुणे वाह ! चांगले आहे ? कुणी म्हणे काय सांगतेस काय ? अग जमले का तिकडे ? केवढे मोठे शहर आहे ? तिकडे शहरात फिरायला बस ने जावे लागते .

कोणी घाबरवायचे .. कुणी चांगले आहे म्हणायचे .

काय वेगळेच मनात होत होते तेव्हा . इतके वर्षे इकडे राहिल्या नंतर अचानक हे घर , हि इथली लोक सोडून जायचे .. आणि तेही पुन्हा  परत  न येण्यासाठी . हे शहर कायमचं सोडून जायचं .

छातीत एक प्रकाची अनामिक धडधड . जसे कि आता परीक्षेला जातोय . सर्वांनी  आपले अश्रू लप वले होते .. शालिनी आणि मुली एकमेकींना कडे भेदरलेल्या नजरेने बघायच्या . पण मंगेश च्या पुढे काही कोणाचे चालायचे नाही . तिकडे आपल्याला कोणी चिट पाखरू सुद्धा ओळखत नाही . इकडे नाही म्हणायला गरजेला हाकेला हाक मिळायची . सेफ वाटायचं . घरात मुलींना सोडून जायला भीती नाही वाटायची .

आनंद या गोष्टीचा होता कि आता सगळी फॅमिली ची विस्कटली होती . ती २ एक  वर्षांनी सर्व पुन्हा एकत्र येणार होते . निदान एका शहरात तरी येणारच होते .

मंगेश ने २० वर्षे पोस्टाची नोकरी त्यांनंर ५ वर्षे छोटी मोठी नोकरी आणि त्याचा बिझनेस केला .. त्याला चार मुले इकडेच झाली. मुलांचे शिक्षण इकडेच झाले . शालिनीची  १५ वर्षे नोकरी इकडेच झाली . या शहराने त्याला काय काय दिले होते . त्याला सत्संग इकडेच मिळाला होता आज १०० एक लोक ह्या सत्संगात केवळ मंगेश आणि शालिनी मुळे  आली होती . शिवाय एका दुसऱ्या वाडीत त्याची छोटी ब्रँच पण काढली होती . मंगेश ने त्याचे अखंड आयुष्य हे ज्ञान लोकांना देण्यात घालवले होते . आज हा आध्यत्मिक परिवार एकदम अचानक त्याला हि सोडणे कठीण नव्हते . त्याला हि मनातून वाईट वाटच होते . पण नवीन आव्हान साकारण्यासाठी त्याने आता स्वतःला तयार केले होते .

शेजारी हे नुसते शेजारी नव्हते तर तर ते सख्खे शेजारी झाले होते. शेजारी म्हणजे एकमेकांचा आधार असतात . खरी मदत हि त्यांचीच होत असते. त्यात इतकी वर्ष  शेजारी राहिले ना कि शेजारची आजी ती आपलीच आजी वाटते आणि त्या आजीला पण  मुलं स्वतःचे नातवंड असल्या सारखे वाटते . तसेच सगळे काका , मावश्या , मामी , आजी आजोबा , ताई असे अनेक नातेवाईक म्हणजे सख्खे शेजारी असतात . या सर्वांना सोडून जायचे म्हणजे मंगेश च्य फॅमिलीला खूप कठीण झाले होते .

दोघी मुलींच्या जिवाभावाच्या मित्र मैत्रिणी परिवार वेगळा होता . आजूबाजूला खूप शाळेतली , कॉलेजमधली मुलं मुली होत्या. त्यांचे एक वेगळेच विश्व होते . अचानक हे अख्खे विश्व रिकामे होणार होते .. इथून पुढे ते आपल्या बरोबर नसणार याचे दुःख शब्दात नाही सांगू शकत .

छोटे शहर त्यामुळे बरेच वर्ष एका ठिकाणी राहिल्यावर अल्मोस्ट अख्खे शहर एकमेकांना ओळखत असते . त्या एरिया मध्ये आजू बाजूला शाळेतले कॉलेजमधले शिक्षक ज्यांनी मंगेश च्या मुलांना घडवले ते राहत होते .. त्या सर्वांना च मंगेश ची फॅमिली इथून जाणार याचे दुःख होत होते . दोघी मुली प्रत्येक ओळखीच्या सरांना जाऊन नमस्कार करून येत होत्या .. आशीर्वाद घेऊन येत होत्या .

आणि अखेर तो दिवस उजाडला आज मंगेश ने सकाळी एक ट्रक  बोलाव ला होता आणि सकाळ पासून एक एक करून सामान त्या ट्रक मध्ये टाकत होते. राघव खास शिफ्टिंग साठी इकडे आला होता  . सत्संगातील बरीच लोक मदतीला आली . तृप्तीच्या मैत्रिणी मदतीला आल्या , शेजारी मदतीला आले .. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते . दुःख होते ..

अगदी निघता निघता तृप्ती ची एक मैत्रीण आली ती मंगेश ला म्हणाली " काका तृप्ती शिवाय आम्ही राहू नाही शकत .. तृप्ती ला आमच्या घरी ठेवा .. निदान तिचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत . सांगायचा मुद्दा हा कि तिथल्या लोकांना पण मंगेश ची फॅमिली जाणार ह्याचे दुःख होत होते .

आणि त्याच ट्र्क मध्ये सर्वजण बसले आणि सामानाचा ट्रक गाव बाहेर निघाला आणि मंगेश चे २५ वर्ष राहिलेलं शहर कायमचे सुटले .

🎭 Series Post

View all