संघर्ष एक कथा - भाग २३

In this part mangesh shifted to the big city called Pune .

                                                संघर्ष एक कथा - भाग २३

क्रमश: भाग २२

सामानाने भरलेला ट्र्क गावातून बाहेर जाऊ लागला तस तसा शालिनी आणि दोन्ही पोरींचा उर भरून आला . दोघी मुली  रस्त्याकडे पाहत होत्या . जाता जाता शाळा , कॉलेज, आवडते देऊळ , इकडे मत्रिणीचे घर , इकडे मित्राचे घर . इकडे क्लास अशी सगळी ठिकाणं डोळ्यात साठवत होत्या . आणि भरधाव वेगात राहतं गाव मागे टाकून जसा ट्रक त्या शहराला मागे टाकून गेला तसा मात्र भरलेला उर डोळ्यातून वाहू लागला . आता आपण इकडे परत येणार नाही आणि हि जीव भावाची जोडलेली माणसे आता आपल्याला परत दिसणार नाहीत ..आणि तिघींनी  मनसोक्त रडून घेतले.

मंगेश ला पण थोडे वाईट वाटतच असेल पण त्याच्या डोक्यात हि घेतलेली झेप योग्य वळणावर पोहचली पाहिजे . जे मी आता मनाने पाहतोय ये स्वप्न साकार करायचेय .

मंगेश ची आई १५ दिवसांपूर्वी गावाला आली होती . तीला पण थोडे दिवस गावी राहायला  मिळेल म्हणून तिला पुढे गावी पाठवले होते . जाता जाता ट्रक चा पहिला ब्रेक हा मंगेश च्या  गावी  झाला. मंगेश ने गावातील पण लागणारे सामान ट्रक  मध्ये चढवले तिथल्या "मशीन " पण गाडीत टाकून घेतल्या . काहीच नाही झाले तर हा बिझनेस करता येईल म्हंणून "

शालिनी आणि मुली गावी आल्यावर थोडा  मूड बदलला .त्या दोघी शालिनी च्या आई कडे आल्या . शालिनीच्या आई ने सगळ्यांसाठी जेवण केले होते . मंगेश चे सामान भरून झाल्यावर ते पण सासूबाईला  भेटायला आले. मंगेश ची आई पण तिकडेच येऊन थाबली होती . मंगेश ची आई आणि शालिनी ची आई आता  दोघी म्हाताऱ्या झाल्या होत्या . दोघी विहिणी विहिणी एकमेकींना शेवटच्या भेटल्या . कारण मंगेश च्या आई ला कदाचित माहित झाले होते इथून पुढे आपली भेट पण अशक्य आहे . गाव आता कायमच सुटतंय या विचाराने तिच्याही मनात काहूर माजला होता .

शालिनीची आई मंगेश ला म्हणाली " तुमचे स्वतःचे इकडे घर आहे . पुण्या सारख्या अनोळखी , मोठ्या शहरात जाण्यापेक्षा  इकडे संसार थाटायाचा होतात . "

मंगेश आणि सासू बाई  दोघांना एकमेकां बद्दल आदर नक्कीच होता पण एकमेकांचे विचार पटायचे नाहीत .

मंगेश " अहो , मी गावाला राहायला येणार म्हणजे मी मागे येणार आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाणार म्हणजे मी आयुष्यात पुढे जाणार म्हणजे मी प्रगतीच्या मार्गवर जात आहे "

जाता जाता काही वाद नको म्हणून हा विषय  इथेच थांबवण्यात आला . सगळे पोटभर जेवले. आजीला मनभरून भेटले आणि पुन्हा गाडीत बसले . यावेळेला गाडीत मंगेश आई पण मागे बसली होती . आता मंगेश च्या आई ला अश्रू आवरत  नव्हते.

हे अश्रू येण्याचे कारण काय तर मनाने पण प्रत्येक जण आपल्या कंफर्ट झोन मध्ये असतो आणि जेव्हा त्यातुन बाहेर पडायचे असते तेव्हा मन सुद्धा तयार नसते आणि मग दुःख होऊन हे अश्रू येतात . जरी ते मनाला पण माहितेय कि यात माझा उत्कर्ष आहे तरीही .

अजून दोन तासांनी मंगेश च्या एका बहिणीकडे गाडी थांबवली. बहिणी कडे सगळे फ्रेश झाले . हातपाय धावून चहा  पाणी केले . आणि मंगेश ने शालिनी ला सांगितले कि तुम्ही इकडेच पोळी भाजी बनवून घ्या . तिकडे गेल्यावर लगेच काहीच करता येणार नाही . झाले लगेच शालिनी , मंगेश ची बहीण कामाला  लागल्या . तोपर्यंत मुले खेळली , पुरुष मंडळीनि गप्पा मारल्या  . मंगेश च्या निर्णयाचे  सगळ्यांना आश्यर्य च वाटत होते . वयाच्या ४५ शी नंतर एवढा मोठा चेंज करणे योग्य आहे का ?  

मंगेश आपला त्याच्या निर्णयावर तो कसा ठाम आहे आणि कसा मी चांगला निर्णय घेतलाय हेच सांगायचा .

थोड्याच वेळात तिथून पण गाडी निघाली . मंगश ची बहीण आणि मुलगा पण गाडीत आले . थोडे सामान लावायला मदत होईल म्हणून .आणि गाडी  तिकडून पण निघाली पुण्याच्या दिशेने .आणि साधारण रात्री ११ वाजता गाडी मंगेश ने जो फ्लॅट बुक केला होता तिथे आली ..

राघव चे मित्र आणि शालिनीची एक बहीण तिकडेच जवळ राहत होती त्या बहिणीची मुले आधीच तिथे येऊन थांबले होते . सगळे एकमेकांना भेटले आणि कामाला  लागले . ट्रक मधून सामान एक एक करून   घरात आणत  होते. घरात एकही बल्प नव्हता आणि आता रात्रीचे ११ वाजलेत तर तो आणायला पण जाता  येत नव्हते . शेवटी मंगेश च्या आई ने दिवा पेटवला त्यामुळे अजून कोणालाच   घर कसे आहे माहित नव्हते .. अंधारात बघत होते सगळे . १२ वाजे पर्यंत सामान उतरवले आणि मग आणलेला पोळी भाजी डबा सगळ्यांनी खाल्ला . आणि मग राघव चे मित्र आणि शालिनीच्या बहिणीची मुले तिकडेच जवळ राहतात तर ते घरी गेले . उदया  सकाळी येतो सांगून .

मग काळोखात चटई टाकून सर्व जण ज्याला मिळेल तिकडे झोपून गेले . ते घर खूप मोठे होते अजून फॅन , लाईट्स लावायचे होते त्यामुळे खूप डास होते . पण सगळे इतके दमले होते कि सगळेच झोपून गेले . जशी पहाट  झाली तसा  खोलीतला अंधार कमी होऊ लागला आणि नक्की आपले सध्याचे घर कसे आहे हे सगळ्यांना दिसू लागले .

इतके सुंदर घर होते आणि आधीच्या घरापेक्षा खूप मोठे घर होते. केवढा तरी मोठा हॉल , दोन बेडरूम , दोन गॅलरी, आणि किचन असे भव्य घर होते . शालिनी , मुली दोघी घर बघून खूप खुश झाल्या . आणि तो फ्लॅट एका मोठ्या सोसायटी मध्ये होता त्यामुळे जे काही काही दृश्य होते ते कधीही पाहिलेले नव्हते . 

दुसऱ्या दिवशी जे सकाळी सगळे उठले ते नवीन जोश मधेच उठले . पोरी आणि बायकांनी सामान लावूं घेतले . शालिनी आणि मंगेश च्य बहिणीने , आजीने किचन स्वच्छ  करून डबे. भांडी लावून घेतली . मध्ये मध्ये मंगेश किंवा राघव होताच मदतीला . इकडे खिळा ठोकुणी  द्या , रॅक लावून द्या अशी कामे करायला आणि सकाळी दहा वाजता चहा नाश्ता रेडी . असे म्हणतात एकदा जेवण बनवले कि घर सेट होऊन जाते . मुलींनी कपडे, पुस्तके , इतर सामान लावून घेतले .

हि वस्तू इथे ठेवू , तिथे ठेवू असे करत त्यांनी बोल बोलता घर लावून  टाकले . राघव ने दुपार पर्यंत पंखे , ट्यूब लावल्या , आणि संध्याकाळ पर्यंत घर लक्ख प्रकाशित झाले .

मंगेश ची बहीण आल्यामुळे शालिनी ला पण थोडे बरें झाले . एकाचे दोन कुणी आवरायला कोण असले तर घर लावायला पण मज्जा येते . दुसऱ्या दिवशीच मंगेश ने घरात जिन्नस पण भरून दिले . घरात सामान भरलेले असले कि मग बायकांना पदार्थ करायला पण उत्साह येतो .

माधव चा जॉब फिरतीचा होता त्यामुळे त्याला लगेच येत नाही आले . तसे त्याचे घर पण खूप लांब होते . तेव्हा मोबाईल नव्हते त्यामुळे असा सर्रास कॉल पण करता येत नव्हते . तरी पण मंगेश च्या घर जवळ शेजारच्यां चा STD बूथ होता त्यावरून त्याच्या घर मालकानां कॉल करून  कळवले होते. तो येत्या वीकएंड ला येणार होता.

मंगेशचे  घर तो गावाला असो नाहीतर शहरात असो किंवा आता इकडे पुण्यात नवीन आलेला असो . त्याच्या घरात नुसती  माणसांची वर्दळ असायची . संत्सगा तले , शालिनी च्या बहिणी ची फॅमिली , राघव चे मित्र , त्यांच्या समाजातील लोक , कोण ना कोण तरी रोजच त्यांना भेटायला यायचे . त्यामुळे सगळे लवकर  रुळू लागले . शिवाय आताचे शेजारी पण खूप छान  होते. त्यांच्या घरी एक छोटी मुलगी होती . ती पोरींना ताई ताई करत यायची . तिची चिव चिव घरात चालू असायची शिवाय सकाळ संध्याकाळ त्यांचे सत्संगाचे वाचन ऐकायला सर्व जण जायचे . त्यामुळे रिकामा असा वेळच नसायचा.

मंगेश चा नोकरी शोध मोहीम चालू झाली . राघव कंपनीतील रूम सोडून घरी शिफ्ट झाला त्याचे ऑफिस चे रुटीन सुरु झाले .

शालिनी च्या बहिणी ची मुले साधारणत: मंगेश च्या मुलांच्या वयाची होती त्यामुळे सगळी भांवडे एकत्र असायची , कधी ते इकडे यायचे , कधी हि  तिकडे जायची . शालिनी च्या बहिणीचा मोठा मुलगा नोकरी करत होता तो साधारन राघव च्या वयाचा होता . तो म्हणाल आमच्या ऑफिस मध्ये अकॉऊंट्स डिपार्टमेंट मध्ये व्हेकन्सी आहे पण ती मुली साठी आहे .. आदिती पण सि ए च्या अंडर काम करायची तर ती म्हणाली मी काम करू शकते तिकडे . आणि ती interview ला गेली पण . राघव तिला घेऊन गेला आणि  आदितीला तो जॉब मिळाला पण . येऊन अजून १० दिवस पण झाले नव्हते तर आदितीला जॉब मिळाला . पगार कमी होता पण आधी च्या पेक्षा जास्त होता .घ रा पासून जास्त लांब नाही . बस अगदी ऑफिस च्या दारा पर्यंत जाऊ शकते असा जॉब म्हणजे आदिती खरोखरच लकी होती .

सगळ्यांनाच आश्चर्य वाटले . मंगेश ची मुलगी एवढी गाव सारख्या शहरात मोठी झालेली पुण्य सारख्या मोठ्या शहरात पहिल्याच interview मध्ये जॉब मिळाला. ग्रेट .

मंगेश आपला रोज पेपर मध्ये वाचायचा . कुठे तो करू शकेल अशी नोकरी मिळतेय का ? एक दोन ठिकाणी तो जाऊन पण आला पण काम झाले नाही . खरं तर वयाच्या ४५ शीत नोकरीच्या interview  जाणे सोपे नव्हते . पण मंगेश प्रयत्न करत राहिला . आणि साधारण १ महिन्यांनी त्याला एका बिल्डर कडे जॉब मिळाला . घरापासून थोडा लांब होता पण त्याने पगार बऱ्यापैकी मिळणार होता . दोन बस बदलून ऑफिस ला पोचायला लागायचे . तरी पण मंगेश पुण्यात कामाला रुजू झाला .

🎭 Series Post

View all