संघर्ष एक कथा भाग २४ अंतिम भाग

In this part aslo mangesh has taken a diffrent decison and proved that he is not a common person

संघर्ष एक कथा भाग २४  (अंतिम भाग)

क्रमश: भाग २३

मंगेश ला नोकरी लागल्यावर शालिनीला सर्वांचे जास्त आनंद झाला . खरे तर मंगेश च्या फॅमिली चा हा सर्वात मोठा टूर्निन्ग  पॉईंट होता. हळू हळू दिवस बदलले. मंगेश त्या ऑफिस मध्ये चांगलाच सेट झाला . राघव चे ट्रेनिंग पूर्ण झाले आणि त्याला त्या मोठ्या कंपनीत जॉब  लागला . आदिती ने आणि तृप्ती ने त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि दोघींना चांगला जॉब लागला . फक्त मध्यंतरी शालिनी ची आई आणि मंगेश ची आई थोड्या फरकाने त्यांना सोडून देवाघरी गेल्या . जशी मंगेश  ची आई गेली आणि शालिनीची आई गेली तशी त्यांचे गावाकडे जाणे बंदच झाले . शालिनी चे पण माहेर संपले होते . माधव पण येऊन जाऊन असायचा . त्याचे घर  पुण्यातच होते पण लांब होते मग तो महिन्यातून एकदा वगैरे येऊन जायचा कधी हे लोक तिकडे जायचे .

थोड्याच दिवसात अदितीचे लग्न झाले . तिने पण  तिच्या पसंतीने तिचा जीवन साथी सिलेक्ट केला होता . मंगेश आधी थोडा नाराज होता पण तरीही नंतर त्याने स्वतःहून लग्न लावून दिले . आदिती पण रहायला पुण्यातच होती . आणि मंगेश च्या  घरी अधे मध्ये येणे असायचे .

राघव कंपनीमध्ये परमनंट झाल्यावर राघव आणि मंगेश ने पुण्यात मध्ये स्वतःचा फ्लॅट खरेदी केला . या नंतर मंगेश च्या फॅमिलीने कधीही  मागे बघितलेच नाही . दिवसेन दिवस प्रगती होऊ लागली . लोकांना पण आस्चर्यच वाटायचे कि पुण्यात येऊन अवघ्या ३ वर्षात हे लोक इकडे छान  सेट झाले . एका  मुलीचे लग्न पण झाले'.

मंगेश ची सांसारिक प्रगती तर होतच होती पण अध्यात्मिक प्रगती पण छान चालू होती . मंगेश ची फॅमिली इकडे पण सत्संग मध्ये  चालणारे म्हणून नावा रूपास आले  होते . राघव ला पण सत्संगामध्ये खूप इंटरेस्ट होता . तृप्ती पण रोज सकाळी किंवा संध्याकाळी नोकरी वरून आल्यावर प्रवचन ऐकण्यास जायची . .

आता घरामध्ये शालिनी , मंगेश राघव आणि तृप्ती राहायचे . माधव येऊन जाऊन असायचा . त्याची स्वप्ने  तो आणि त्याची बायको पूर्ण करत होता. संसार छान चालू होता . त्याने  त्याचा फ्लॅट घेतला . आदिती च्या नवऱ्याचा पण फ्लॅट होता . त्यामुळे तिचा संसार व्यवस्थित चालू झाला होता . तिला एक मुलगा झाला.

पुढे राघव ने पण सत्संग मध्ये येणाऱ्या मुली बरोबर लग्न केले . मंगेश च्या सांसारिक जवाबदाऱ्या एक एक करून

तो  पूर्ण करत होता . मुले व्यवस्थित संसारात रमली  आणि नोकरी ला लागली कि सर्वात जात आनंद आई वडिलांना होत असतो .

मंगेश चा बोल बोलता ५ वर्षे नोकरीला लागून झाली होती . मंगेश जी नोकरी लागली तिकडे तो चांगलाच सेट झाला . पाच वर्षात मंगेश आता ऑफिस मध्ये मंगेश    साहेब झाला होता . मंगेश ला  सांगितलेले कोणतेही अशक्य काम त्याने शक्य करून दाखवले होते त्यामुळे मालकाच्या चांगलाच मर्जीतला आणि विश्वासातील माणूस झाला होता . सुरुवातीला मंगेश ने ऑफिस च्या कामासाठी त्याला फिरावे लागायचे त्यासाठी त्याने एक टू व्हीलर घेतली . अख्या पुण्यात तो त्या गाडी वरच फिरायचा . दिवस कसे बदलतात बघा एके काळी मंगेश सायकल वर फिरायचा . आज तो   गाडीवर फिरत होता आणि मुख्य म्हणजे वयाच्या चाळीशी नंतर त्याने स्वतःला खूप चेन्ज केले , अपग्रेड केले , गाडी शिकला , कोणत्याही परिस्थीतिला घाबरला नाही आणि त्यातून मार्ग काढत गेला .

तृप्ती पण तिच्या ऑफिस मध्ये टीम लीडर झाली . पगार वाढल्यावर तिने पण तिला एक टू व्हील र घेतली तिला ऑफिस ला जायला . एक काळ असा होता कि घरापुढे ४ सायकल  लागलेल्या असायच्या आणि आता तिघांच्या तीन गाड्या पार्क झाल्या होत्या .

मंगेश च्या घरात तसे पहिले तर त्याच्या तीन मुलांनी लव्ह मॅरेज केले होते . मंगेश एवढा सत्संग मध्ये जात होता किन्वा गावात लहानाचा मोठा झाला होता . तरी पण मुलांना त्याने त्यांच्या  लग्नाला सपोर्टच केला आणि तो अभिमानाने सांगायचा कि माझ्या मुलांनी लव मॅरेज केले . नातेवाईक  किंवा  ज्ञानातले लोकांना कधी कधी ते खटकायचे पण त्याने त्याची फिकीर कधीच केली नाही . व्यक्ती स्वातंत्र हे प्रत्येकाला  असलेच पाहिजे  हेच त्याचे म्हणणे असायचे .

कधी कोणाचा बर्थ डे असला कि मंगेश चे घर गजबजलेले असल्याचे माधव त्याची बायको , माधवच मुलगा , आदिती , आदितीच्या नवरा आणि मुलगा , राघव , राघव ची बायको आणि मुलगा आणि तृप्ती हे एवढे जण तर असायचेच . घराचे नंदनवन  होऊन जायचे .

तृप्ती चे शिक्षण होऊन २ वर्षे जॉब झाला पण तृप्तीने काही तिचा साथीदार शोधला नाही . तृप्ती तशी त्यांच्या समाजाला अटॅच होती . त्यांच्या समाजाचा ग्रुप होता त्यामध्ये पण काम करायची . पण अजुनही  तिला तिचा साथीदार सापडला नव्हता . आता तृप्तीच्या लग्नाची जवाबदारी राहिली होती .

मंगेश ने तृप्ती ला विचारल्यावर ती म्हणाली माझ्या साठी नवरा आपल्या समाजातला तुम्ही शोधा . मी लव मॅरेज करणार नाहीये "

आणि मग मंगेश ला नवीन टार्गेट मिळाले . तृप्ती साठी वर शोध मोहीम सुरु झाली . या वेळी माधव, राघव, सर्वच जण होते तृप्तीसाठी वर शोधायला . आणि एक दिवस मंगेश ला तो हि सापडलाच .

मंगेश च्या घरातले तृप्ती चे लग्न  हे शेवटचे मंगल कार्य होते त्यामुळे सर्वानी मिळून तृप्तीचे लग्न धूम  धडाक्यात लावून दिले . आणि अशा पद्धतीने मंगेश ने त्याची हि पण जवाबदारी व्यवस्थित पार पडली . आणि मुख्य  म्हणजे काय अजब योगायोग होता कि तृप्तीच्या नवऱ्याचा जॉब आधी दुसऱ्या शहरात होता पण लग्नानंतर पुण्यामध्येच लागला आणि त्याने पण पुण्यात फ्लॅट घेतला .

चार मुले , दोन सुना , दोन जावई , माधव चा  १ मुलगा , राघव ची दोन मुले १ मुलगा एक मुलगी , आदितीची दोन मुले - दोघेही मुलगे आणि तृप्ती ची एक मुलगी आणि  मंगेश  आणि शालिनी असा हा मोठा परिवार सणा  सुदीला एकत्र येत असे आणि खूप धम्माल मस्ती करत असे .

पुण्यात आल्या वर मंगेश च्या संघर्षाला एक वेगळे वळण लागले होते . त्याच्या प्रयत्नांना यश येत होते . आणि नंतर मुले पण हाताशी आल्यामुळे परिस्थिती बदलली . या सगळ्यात मंगेश आणि शालिनी यांना सत्संगाने मिळालेली दिशा सुद्धा महत्वाची होती . सामन्यातील असामान्य होऊन त्याने बऱ्याच  गोष्टी केल्या होत्या . न थकता . न हरता , येईल  त्या परिस्थितीला रडत न बसता त्यातून मार्ग काढून मंगेश नेहमीच पुढे जाण्याचा  विचार करायचा . जे  गेले ते गेले त्यासाठी दुःख करायचे नाही आणि जे हवे ते मिळवले त्यासाठी थांबायचे नाही लगेच प्रयत्न करू लागायचे हेच एक सूत्र मंगेश ने  सांभाळले .

संसारात निर्णय घेणे हे हि महत्वाचे असते . बऱ्याचदा  लोक चुकेल या भीतीने निर्णय घेत नाहीत किंवा उशिरा घेतात . वेळ गेल्यावर योग्य निर्णय घेऊन सुद्धा काहि  उपयोग नसतो .. मंगेश ने घेतलेले सगळेच निर्णय बरोबर होते असे नाही . सगळ्याच घेतलेल्या निर्णयाचा त्याला फायदा झाला असेहि नाही . पण त्या वेळेला जो निर्णय घेणे आवश्यक होता तो निर्णय त्याने घेतला . आणि त्याचे झालेले बरे वाईट परिणाम पण त्याने भोगले .

मुले लहान असताना मंगेश म्हणायचा “ माझी मुले हीच माझी खरी संपत्ती आहे “ आज मंगेश म्हणतो “ माझी नातवंडे हीच माझी खरी संपत्ती आहे .”

मंगेश ने  पुण्यात एकाच बिल्डर कडे  तब्बल २०  वर्षे काम केले . नंतर नंतर त्याला वयो मानाने फिरता  येत नव्हते म्हणून त्या बिल्डर ने मंगेश ला गाडी , ड्राइवर दिला होता . त्या मध्ये बसून मंगेश पुण्यात फिरायचा आणि काम करायचा . आता  तो  ह्या कामातून  सुद्धा रीटायर्ड झाला . आता पुढे काय ? मुले त्यांच्या संसारात रमली . आता इकडे म्हणजे पुण्यात करण्यासारखे  काही नाही आणि काही करण्या इतके वय पण नाही . तरी पण मंगेश ने पुन्हा एक वेगळाच निर्णय घेतला होता . शालिनी आणि मुले सुरुवातीला त्याच्या या निर्णयाला खूप विरोध करत होती पण मंगेश ने एकदा निर्णय घेतला कि ती त्याच्यावर  अमल  केल्याशिवाय त्याच्या जीवाला शांती मिळत नाही .

मंगेश ला रिटायर्ड झाल्यावर थोडे पैसे मिळाले होते त्यामधून त्याने त्याच्या गावात एक नवीन घर बांधले . मुलांनी पण त्यांना जमेल तशी मदत केलीच . घर बांधून झाल्यावर मंगेश आणि शालिनी दोघे त्यांच्या गावी पुन्हा परतले  . आता मंगेश आणि शालिनी गावाला असतात . त्यांच्या सांसारिक जवाबदाऱ्या त्यांच्या परीने पूर्ण करून त्यातून मुक्त  होऊन ते दोघे आता त्यांची अध्यात्मिक प्रगती करत आहेत.

मुले आणि नातवंडे इकडेही सणा सुदीला येतात . आणि त्यांचे गावच्या घराचे नंदनवन होते .

अशी हि मंगेश च्या संघर्षाची कथा सफळ  संपूर्ण झाली .त्याच्या आयुष्यातील संघर्ष आता संपलाय आणि तो सुखाने समाधानाने त्याच्या गावी परत म्हणजे आपल्या मूळ स्थळी परत गेला .

हि कथा सत्य घटनांवर आधारित आहे  . आणि त्या कथेतील काही भाग हा मी माझ्या डोळ्याने पाहिला  आणि अनुभवाला आहे . तर मंडळी हा मंगेश आणि शालिनी हि दोन पात्र काल्पनिक नसून ती माझ्या  अयुष्यातील अविभाज्य घटक आहेत . मंगेश आणि शालिनी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून माझे आई वडील आहेत .

🎭 Series Post

View all