संघर्ष एक कथा - भाग ७

In this part mangesh got his second baby boy and they kept name as Raghav

संघर्ष एक कथा - भाग ७

क्रमश: भाग ६

मंगेश मोठ्या विचारात पडला. आता पैसे कुठून  उभे  करावे . वडील वारल्याचं दुःख तर आहेच ते दुःख बाजूला सारून लगेचच त्याला आर्थिक संकट उभे राहिले होते . भर दुपारी १२ वाजता मंगेश घरातून बाहेर पडला . आई सांगतच होती  अरे तू बाहेर जायचं नसतस . तू कशाला बाहेर पाडतोस ?. असे काय एव्हडं काम आलय? . या दुःखाच्या वेळी तो आई ला काय सांगणार होता . काही नाही आलोच जरा , आणि बाहेर पडला . शालिनीच्या लक्षात आले पण ती तरी काय करणार होती बिचारी .

मंगेश ने जिल्हात असताना त्याने   स्वतः साठी  एक छान घड्याळ घेतलं होतं . रूम वर पण किती वाजले ते बघायलाहोईल आणि ऑफिस मध्ये पण किती वाजले ते कळतील म्हणून . आता गहाण टाकण्यासाठी त्याच्या कडे त्या त्याच्या पहिल्या घड्याळ व्यतिरिक्त काही च नव्हतं . शेवटी ते विकण्याखेरीज त्याच्या समोर सध्या तरी काहीच पर्याय दिसत नव्हता . चांगल्या  कंपनीचे घडयाळ  असल्याने सावकाराने पण त्याला चांगले पैसे दिले . येताना त्याने काय आणलं असावं . तर वाण्याच्या दुकानातून घरातील जिन्नस आणले . काय वाईट वेळ होती ती . तीन दिवसांपूर्वी डोक्यावरचं  वडिलांचं छत्र हरपलंय आणि मुलगा वाण्याच्या दुकानात जाऊन सामान घेत होता . गावातील लोक त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते . काही जण तर त्याला नावं ठेवत होते . ह्या मुलाला काही कळतं  कि नाही . अशा वेळी कोणी स्वतः सामान आणायला येत का ? इतकं साधं पण कळत नाही  .

लोकांच्या डोळ्यातील ते भाव मंगेश ला पण दिसत होते आणि कळतही होते  होते . पण तो काय करू शकत होता ? काही वेळेस कर्म करताना मागचा  पुढचा विचार न करत  काळाची गरज काय आहे  ते ब घून वागावे लागते .लोक काय म्हणतील याच विचार करत बसलो त्तर काही सध्या होणार नाही . मंगेश च्या घरात आज जिन्नस नाहीये हे सत्य आहे आणि हे जे हसणारे आणि बोलणारे लोक त्याच्या घरात सामान आणून देणार होते का ? तर उत्तर मिळते नाही ?

पुढील दहा दिवसात वडिलांचे सर्व विधी उरकून झाल्यावर मंगेश ला परत ऑफिस ला जायलाच पाहिजे होते १५ दिवसं पेक्षा रजा मिळणे कठीण होते . आता आई च काय ?

मंगेश आई ला म्हणाला “आई आता  तू पण आमच्या बरोबर शहरात  चल . आपण सगळे तिकडे एकत्र राहू .”

 पण मंगेश ची आई ची नाळ या गावाशी चांगलीच जुळली होती . शिवाय राहतं  घर अचानक बंद करून शहरात कायमसाठी जाणे हे काही त्याच्या आई ला पटेना . शालिनी , मंगेश त्याच्या आई ला सांगून सांगून थकले पण त्याची आई शहरात यायला तयार होई ना . कधी कधी म्हातारी माणसे पण खूप हट्टी  होतात . त्यांना समजून घेणे हे पण काही सोप्पे काम नाही . मंगेश ला जावेच लागणार होते .तो किती दिवस थांबणार होता .

शेवटी मंगेश जड पावलांनी आई ला एकटीला घरात माघारी ठेवून  शालिनी आणि माधव ला घेऊन शहरात यायला निघाले . 

जाता जाता दीक्षित गुरुजी ना आणि शालिनीच्या आईला भेटून तिघे गाडीत बसले .

दीक्षित गुरुजींचे डोळे आज पुन्हा पाणावले . त्यांना आता खूप एकटं वाटत  होते . मंगेश चे बाबा त्यांचे व्याही नंतर पण त्याच गावातले असल्याने त्यांचे परम मित्र  होते . अचानक मित्राच्या जाण्याने त्यांनाही धसका बसला होता. कारण तेही जवळपास त्यांच्याच वयाचे होते .

शालिनी " बाबा तुम्ही आणि आई दोघे सासूबाईंना भेटायला जात जा . काही वाटलं तर लगेच कळवा “.

गुरुजी " हो बाळा , मी आणि आई जात जाऊ , तुम्ही काळजी करू नका . येतील त्या थोड्या दिवसांनी तुमच्या बरोबर . होईल सगळं ठीक "

आणि तेवढ्यात गाडी सुटली . टाटा बाय, बाय करून आणि माधव चा चेहरा बघून घेत दीक्षित गुरुजी पण घरी आले .

मंगेश शहरात पोहचल्यावर तिकडे पण कोणी ना कोणी तरी त्यांना भेटायला येत असे  . बाबा पण एक दोनदा राहायला आले होते त्यामुळे शेजाऱ्यांना माहिती होते .

थोड्याच दिवसात शहरातील रुटीन सुरु झाले .  मंगेश दोन एक महिन्यातून गावी जाऊन आईला भेटून येत असे . दर वेळी आई च्या मागे लागायचा तिकडे चल तिकडे चल . तुला इकडे एकटीला ठेवून माझं लक्ष तिकडे लागत नाही . तेव्हा मंगेश ची आई म्हणाली येईन मी कधी कधी . पण आता नको .

नोकरी ला लागल्या  पासून दर महिन्याला न चुकता पगार मिळाल्या मिळाल्या मनी  ऑर्डर करत असे. त्यात त्याने कधी खंड पडून दिला नाही .

शेती करायला दिली . म्हणजे दुसऱ्या ला करायला द्यायची त्याने तिकडे शेती करायची आणि लागतील ते पैसे मंगेश देणार आणि धान्य आले कि अर्धे अर्धे वाटून  घ्यायचे . कारण आता शेती कडे कोण बघणार , नोकरी करता करता शेती बघणे मंगेश ला शक्य नव्हते . त्यात काही फायदा नाही होयचा पण आहे ते चालू ठेवायचं हेच आईच म्हणणं होते . तिच्या पुढे मंगेश च काही सध्या तरी चालत नव्हतं . शिवाय आई  गावी एकटीच असल्याने त्याच्या गावाला चकरा वाढल्या . कधी देव बसवायला कधी दशहरा , कधी दिवाळी  हे चालूच होते . अशा प्रकारे वर्ष दोन वर्ष उलटली शालिनी पुनः गरोदर राहिली . एकीकडे त्याचा संसार ,एकीकडे आई चा एकटीचा संसार मंगेश सांभाळत होता . शिवाय छोटी मोठी कर्ज घेणे चालूच होते .

तो आता शहरात सेट झाला म्हटल्यावर गावचं पण कोण ना कोण घरी येत राहायचं . कोणी नोकरी शोधायला , कोणी चांगला दवाखाना करायला , कोणाची  मूल शहरात शिकायचं असेल तर यायचे .

 एव्हाना शालिनी पण सुगरण झाली होती . खूप छान जेवण बनवायला लागली होती . मंगेश ला मदत म्हणून शालिनी ऑफिस मध्ये जर कोणी नवीन असेल , एकटा असेल तर त्यांना डबा करून द्यायची , आणि  घरी मेस चालू केली. एकंदरीत मंगेश च्या घरात रोज १० ते १५  माणसांचे जेवण बनायचे . कोणी पै पाहूणा वेगळाच .

जसा शालिनीला आठवा महिना लागला तसा मंगेश ने जाऊन आईला घेऊन आला . आणि आता कारण पण तसे होते तर मंगेश ची आई पण यायला तयार झाली . आणि अशा पद्धतीने बोल बोलता मंगेश ला दुसरा पण मुलगाच झाला . सर्वांना मुलीची अपेक्षा होती पण मुलगाच झाला .

दुसऱ्या मुलाच्या आगमननाने थोडे  नव चैतन्य आले आणि माधव ला  खेळायला त्याचा हक्काचा  भाउ मिळाला होता . त्याचे नाव सर्वानी राघव ठेवले .

मग बाळ झाल्यावर आई पण इकडे करमली . बोल बोलता बाळ सहा महिन्याचे होई पर्यंत आई शहरात राहिली . मग मंगेश ला म्हणाली

" मला आता घरी गेलं पाहिजे . माझ्या घराची काय अवस्था झाली असेल काय माहित ?. मला आता गावाला सोडून ये "

या वेळी मंगेश ला पण आई पुढे काही बोलता येई ना आणि तो तिला म्हणाला

" या महिन्याचा पगार आला कि सोडायला येतो . "

खर तर एका साठी का होई ना पण सगळ्या वस्तू तिकडे गावाला पण घ्याव्या लागत होत्या . तेच जर आई इकडे राहिली असती तर  एवढ्या माणसात एक माणूस जिरून जातो . वेगळे  असे काही करावे लागत नाही . पण स्वतःचे घर असताना इकडे भाड्याच्या घरत राहणे मंगेश च्या आई ला का ही पटत नव्हते .

शिवाय त्या घरात तिच्या आणि तिच्या नवर्याच्या खूप आठवणी होत्या . दोघांनी त्यांच्या हाताने ते घर उभे केले होते . आयुष्यातील बरीच वर्षे त्या घरात तिने काढली होती त्या मुळे ते घर तिला सोडावेसे वाटत नव्हते .

याची कल्पना मंगेश होतीच त्यामुळे तो हि आई ला काही बोलू शकत नव्हता .

🎭 Series Post

View all