संघर्ष एक कथा - भाग- ८

Mangesh discuss with his mother it will be good if she stays in the city with them .

संघर्ष एक कथा - भाग- ८

क्रमश: भाग ७

पगार झाल्यावर मंगेश स्वतः आई ला घेऊन गावी आला . सर्व घर छान साफ करून घेतले . सर्व घर बाई लावून सारवून घेतले . आणि एका शेजारच्या बाईला रोज एक हंडा आणि दोन बादल्या पाणी  नदीवरून आणून द्यायला सांगितलं . म्हणजे आई ला नदीवर जायला नको . शिवाय दोन महिने पुरेल इतके जिन्नस भरून दिले . थोडी लाकडे आणून दिली म्हणजे चुलीवर जेवण करून खाऊ शकेल . थोडे पैसे देऊन ठेवले खर्चायला . शिवाय पुढल्या महिन्यात मनि ऑर्डर पाठवणारच होता .

 आता मंगेश पुन्हा शहरात जायला निघणारच होता तर आई मंगेश ला म्हणाली

" मंगेश तू मला मनी ऑर्डर नाही पाठवलीस तरी चालेल . मला एकटीला कशाला लागतात पैसे . तुझा संसार पण वाढत चाललाय ."

मंगेश का ? पैशा शिवाय काही होत का आता ? आणि हे काय नवीन . “

बाबा गेल्यापासून आई जरा डिस्टर्ब च असायची . काहीतरी बोलायचं ? 

आई " मी एकटी बसून कंटाळेन तर मी आपल्या शेतात जाऊन काम करेन . मला सवय आहे त्याची . आणि  तो राम्या बाकीच्या मजुरांना रोजनिशी देतो तसा  तो मला पण देईल त्यात माझं आरामात भागेल "

मंगेश ला कळे  ना कि हि अशी का बोलतेय ?आणि नाराज असल्यासारखी का वाटतेय ते कळेना . त्याला वाटले  कि आता बऱ्याच दिवसांनी एकटी इकडे राहणार आहे म्हणून शांत असेल तर हे वेगळच . मंगेश मुलगा म्हणून सर्व काही करत होता तरीही त्याची आई त्याच्यावर नाराज होती .

त्याच झालं असे शालिनी जाता जाता बोलली " आई तुम्ही इकडे राहिलात तर तुम्हाला मनी ऑर्डर पाठवावी लागणार नाही . तसेही पैसे कमी  पडतात आणि  आता तुमचे हि वय झालय ,तिकडे एकट्या राहण्या पेक्षा इकडेच सर्व जण एकत्र राहू . यांचे पण सारखे तिकडे लक्ष लागून राहते .कारण तुम्ही  एकट्याच राहता . तुम्ही इकडे आमच्या बरोबर राहा . मुलांना पण तुमची गरज आहे "

आई ने हे सर्व ऐकून घेतले पण बाकीच्या गोष्टी न लक्षात राहता मनी ऑर्डर चेच लक्षात राहिले आणि मनात राग घालून बसली .

मंगेश ने आता जरा स्वर बदलूनच आई ला बोलला .” काही शेतावर वगैरे  जायचे नाही . मी इथे तुला नदीवर पण जायला नको म्हणून बघतोय तर तू  शेतावर जायच्या गोष्टी बोलतेस . आणि  जरी शालिनी काही बोलली तरी तुला आता  पर्यंत कधी मनी  ऑर्डर मिळाली नाही असे झालय का ?मला जमेल तसे मी करतोय तरीही तुमचं असे चालले तर मी काय करू ? तूच सांग .

मी तिची बाजू घेत नाहीये पण ती म्हणतेय तेच खरं  आहे . तिकडे माझं अजिबात लक्ष लागत नाही . पण तू ऐकायला तयार नाहीस . तिकडे राहायला तुला काय अडचण  आहे . पैसे तर पैसे पण मनःशांती पण जाते . गावातली लोक काय बोलत असतील माहितेय कि मंगेश ला आई  जड झालीय . म्हातारीला एकटीला ठेवून जातो . पण तुझ्या हट्ट पुढे माझं काही चालत नाही . उगाच नाराज नको म्हणून मी तुला इकडे ठेवायला तयार झालो . तर तुझं आपलं काही तरीच . "

“अग आई कधी तरी तरी माझ्या बाजूने विचार कर . कर्ज बाजरी झालोय मी . दर महिन्याला कोणाकडून तरी पैसे उसने घ्यायची वेळ येते माझ्यावर . “

“मला आता काहीतरी ठोस निर्णय घ्यावेच लागणार आहेत”

“ते शेती वगैरे सगळे बंद करणार आहे मी आता . गेले दोन वर्षे बघतोय एक  पोतं धान्य मिळतंय फक्त आणि त्यासाठी मी किती पैसे आणि वेळ वाया घालवतोय . राहू दे ना ती जमीन अशीच राहिली तर काय बिघडतंय . पुढे मागे माझी परिस्थिती जर सुधारली तर करेन पुन्हा  शेती . सध्या मला  ते जमणार नाही. निदान या वर्षी तरी नाहीच नाही .

आणि हो हे दोन एक महिन्यानि मला यायला पण जमेल असे मला वाटत नाही . मला जमेल तेव्हा मी येईल पण माझी दर महिन्याला वाट बघत बसू नकोस .

अजूनही सांगतो चल परत आपण परत  जाऊ . तुला बघायचे होते ना घर , बघितलेस ना , आणि आता स्वच्छ पण केलय . चल आता बरोबर . दोन घास खाऊ आणि आनंदात जगू . आता नोकरी त नाही ना सोडू शकत ? हे कोड सोडवायचे फक्त तुझ्याच हातात आहे . केवळ तू  तिकडे आल्याने मला  मदतच होईल .

आई " छे ! मी आता इथून हलणारच नाही ते , निदान दिवाळी पर्यंत नाही . आज किती तरी दिवसांनी घरातल्या देवांना अंघोळ घातली . "

मंगेश " अग  देव घेऊन जाऊ कि ?"

आई " नको सध्या तरी नको. आता आपण आलोय ना इकडे पैसे खर्च करून मग मी आल्यासारखी २/४ महिने राहते . मला वाटलेच तर मी तुला पत्र लिहीन मग तू मला घ्यायला ये . किंवा गावातील कोणाला तरी गाडीत  बसून द्यायला सांगेन . त्याआधी तुला तसे पत्राने कळवेन . किंवा गुरुजी आणि त्यांची फॅमिली आहेच कि इथे . ते हि मला गाडीत बसवतील . मी त्यांच्या कडे  पण दोन चार दिवस राहायला जाउ शकते . तेही येतात दोघे मला भेटायला . तू माझी काळजी करू नकोस "

मंगेश " काय काळजी कशी करू नकोस ? "

मंगेश ने लाख मनवण्याचा प्रयत्न केला पण आई कायम स्वरूपी शहरात राहायला तयार होई ना . मंगेश मग आई ला गावाला ठेवून पुन्हा शहरात आला .

मंगेश चा ऑफिस मध्ये थाट वाढला होता .विशीत मुलं  एकदम काडी सारखी असतात . तिशीत आले कि मग थोडी पुरुषांना पण गोलाई येते . तसे मंगेश ला ऑफिस आणि लग्न मानवत होत . आता तो पूर्वी सारखा बारकुड्या दिसत नव्हता . हँडसम' दिसायला लागला होता . ऑफिस मध्ये सायकल वर बसून मोठ्या ऐटीत ऑफिस ला जायचा , घर जवळ च असल्याने दुपारी घरी जेवायला यायचा . आल्यावर पुन्हा वेगळे शर्ट घालून जायचा . त्याच्या एका मित्राने त्याला एक गॉगल पण गिफ्ट दिला होता त्यामुळे एकदम रुबाबात ऑफिस ला जायचा . ऑफिस मध्ये खूप छान मित्र झाले होते . कधी संध्याकाळी ऑफिस मध्ये कॅरम खेळत बसायचा. संध्याकाळी घरी आल्यावर बायकोच्या  बरोबर बाजारात एक फेरफटका होयचा . येता येता फ्रेश ताजी भाजी घेऊन यायची आणि मग जेवण करायची .

ऑफिस मध्ये कोणाची नवीन जॉइनिंग असेल तर त्यांना मात्र स्वतः जाऊन मदत करायचा . एक दोनदा घरी उगाच जेवायला पण न्यायाचा . असे नवीन आणि जुन्या लोकांना जोडून होता . काही वेळेला नवीन लेडीज स्टाफ पण जॉईन झाल्या तरी बायकोची ओळख करून दयायचा . शालिनि  ला पण नवी मैत्रीण मिळायची .

कोणी ऑफिस मध्ये काम करणारी स्त्री पहिली कि शालिनी ला पण वाटायचे कि मला पण जॉब करता आला असता तर किती बरं झालं असत . शालिनी च पण  एक रुटीन तयार झाल होत .

सकाळी नाश्ता करायचा , मग माधव ची शाळेची तयारी करून द्यायची , माधवला शाळेत मंगेश सायकल ने सोडायला जायचा आणि १२ वाजता आणायला मात्र हिला राघव ला घेऊन जावे लागायचे . माधव शाळेतून आला कि राघव आणि माधव खेळात बसायचे तोपर्यंत हीचं  जेवण आणि डबे होयचे .तोपर्यंत मंगेश दुपारी जेवायला यायचा . तो जेवून गेला कि  मग कपडे आणि भांडी एकदम उरकून हि आणि मुलं दुपारीं मस्त वामकुक्षी घ्यायचे . मंगेश संध्याकाळी येई पर्यंत हि लायब्ररीत जाऊन पुस्तके आणायची . मग दुपार झोप येई  पर्यंत वाचता यायची .

असे मस्त पण काटकसरीत पण आनंदात जीवन जगणं चालू होते .

शालिनी ने पण कधी तक्रार केली नाही किंवा कधी काही डिमांड्स केल्या नाहीत . हेच पाहिजे , तेच पाहिजे , आणि मंगेश पण त्याला जमेल तशी तीची हौस पूर्ण करायचा . संघर्ष जवळ जवळ सगळ्यांच्याचं आयुष्यात येतो . पण मोठ्या धीराने त्याच्या सामोरे जायचे असते . मुळात कर्तव्य करण्यापासून आणि जवाबदारी पासून लांब पळायचे नसते . आहे त्यात समाधान मानलं तर संसाराचा गाडा पण नीट चालत राहतो .नुसत्या पैशाच्या मागे पळून सुद्धा चालत नाही , आणि खूप कंजूष गिरी करून सुद्धा चालत नाही . जेव्हा जे पाहिजे ते मिळालेच पाहिजे . हेच सूत्र होते शालिनी आणि मंगेश च्या संसाराचे .

सध्या शालिनी एक कादंबरी वाचत होती . त्या कादंबरी मध्ये एक मुलगी जी कि एअर होस्टेस होती . त्या कादंबरीतल्या एअर होस्टेस वर शालिनी खूप प्रभावित झाली . शालिनीला आता आपल्याला एक मुलगी होयला हवी असे वाटू लागले . तिने मनोमन ठरवून टाकले होते हि जर मला मुलगी झाली तर मी या कादंबरीतल्या मुलीचे जे नाव आहे तेच मी माझ्या मुलीला देईन . आणि तिच्या सारखीच तिला बनवेन .

आणि बोल बोलता राघव पण २ वर्षांचा झाला होता . काळ नुसता पटपट पुढे चालला होता . आणि शालिनी ला पुन्हा दिवस राहिले . पूर्वी हे एक भारी होतं . दोन मूल झाली, तीन मूल झाली म्हणून कोणी कोणाला नांव ठेवत नसत उलट मुलं हीच खरी संपत्ती असे मानले जायचे . साधारण सर्वांनाच ४ ते ५ मूल असायची . म्हणजे त्यांच्या  काळात  पुन्हा  दिवस राहणे हे काही वावगे नव्हते .

दिवस राहिले म्हणून हल्ली सारखे बाई ला भरपूर जपा . सारखे दवाखान्यात न्या असे पण काही नसायचे . एकदा सातव्या महिन्यात नाव घालायला जायचे कि मग डायरेक्ट डेलिव्हरीला . शेजारी पाजारी सुद्धा अगदी घरातल्या सारखीच मदत पण करायचे . त्यामुळे आता हि कशी सांभाळणार वगैरे असे प्रश्न जेकी आत्ताच्या काळात खूप महत्वाचे असतात ते काही पडत नसत .

 मंगेश च्या घरी मुलगी येते का ते सर्वच जण वाट बघत होते .

🎭 Series Post

View all