संघर्ष एक कथा भाग १८

In this part Mangesh and shalini's life is going smoothly they are just following routine .. same time mangesh comes across one Satsang

                                                  संघर्ष एक कथा भाग १८

क्रमश :  भाग १७

घरात लहान मुले असली ना कि दिवस कसे पटापट जातात ..आणि मुले पण पटापट मोठी होत जातात .. लहान लहान म्हणता म्हणता तृप्ती आता ३  वर्षांची झाली. आदिती ला बालवाडीत घातली .. माधव राघव २ री त गेला आणि राघव १लिला गेला .. दोघं मुलांना सायकल ची स्वारी मिळायची मंगेश त्यांना जाताना सायकल ने  सोडायचा आणि येताना  दोघे यायचे चालत .. तशी शाळा जवळच होती .. तेव्हा सर्वच मुले चालत शाळेत जायचे आणि तेही त्यांचे त्यांचे .. कोणी सोडायला वगैरे यायचे नाही .. कधी तरी मज्जा म्हणून यायचे .. पण मंगेश दोघांना सोडायचा .. किंवा येताना वेळ झाला तर आणायचा पण .. पण तसे नॉर्मली दोघे हाताला हात धरून यायचे .. आजूबाजूची बरीच मुले पण असायची .

आदिती ला पण बालवाडीत घातले .. आदितीला मात्र शालिनी सोडायला जायची आणि तिच्या बरोबर चालत हाताला  हात धरून तृप्ती पण चालायची .. तृप्ती ला पण आदिती बरोबर शाळेत जायचे असायचे पण ती एक वर्षांनी लहान होती म्हणून तिला त्या वर्गात घ्य्याचे नाहीत पण तृप्ती रडायला लागायची मला पण शाळेत जायचंय मला  पण जायचंय ..शेवटी बाई म्हणायच्या बसू दे तिला पण आणि हि पट्टी आदितीच्या शाळेत जाऊन बसायची ..तेव्हा शांत होयची .

असे दिवस मागून दिवस जात होते .. मंगेश पण आता थोडा सेट होत होता .. थोडा पगार पाणी पण वाढला होता .. छोटी मोठी देणी त्याने परत  केली पण काही मोठी कर्ज जी त्याने घेतली होती त्या कर्जाचे हप्ते फेडताना अर्धा पगार संपून जायचा मग महिना अखेर आला कि थोडी तारे वरची कसरत करावी लागत असे .

एक दिवस मंगेश संध्याकाळी ऑफिस मधून सायकल वर बसून येत होता त्याच्या नेहमीच्या स्टाईल प्रमाणे त्याच्या हातात पेटती सिगारेट होती. सिगारेट ओढत ओढत तो नेहमी प्रमाणे सायकल चालवत घरी यायचा . एका  देवळाजवळ एक व्यक्तीने त्याला हात करून थांबवले .. तशी ती व्यक्ती त्या शहरात त्याने कधीच पहिली नव्हती .अत्यंत साधारण पण गोरी पण व्यक्ती होती ती . मंगेश ने साहजिकच सायकल थांबवली . खर तर घर एकदम जवळ आले होते ..

ती अज्ञात व्यक्ती " नमस्कार ! मी अमुक अमुक आहे .. आत मंदिरामध्ये  मध्ये एक सत्संग चालू आहे .. हा सत्संग एकदम फ्री आहे ..  वेळ काढून ऐकून घ्या .. "

मंगेश  कधीच देवभोळा नव्हता .. सत्संग वगैरे तर नाहीच नाही .. शक्यच नाही ..

मंगेश " मी इथेच राहतो .. मी घरी जाऊन येतो "असे बोलून तो वेळ निभावून निघून जाणार होता . पण ती व्यक्ती पाचच मिनिटे जाऊन तर बघा .. आवडले तर ऐका नाहीतर सोडून द्या .. पण एकदा  आत्ताच जावा .. घरी  गेलात  कि संसारातून वेळ मिळत नाही .."

मंगेश माहितेय आता शालिनी त्याची चहा साठी  वाट बघत असेल .. शालिनी नेहमी च्या वेळेत चहासाठी वाट बघायची आणि त्याला पण चहाची हुकी आली होती ..पण काय कुणास ठाऊक मंगेश ला त्या माणसाला  अव्हॉइड करून पुढे जाताच येईना ... ठरवलेच असते तर त्याच्या सारख्याला ते काम काही कठी न  नव्हते . तरी पण त्या  व्यक्ती ला तो डावलू शकला नाही आणि त्याच्या   सायकल चा मोर्चा कसा काय तो देवळाकडे वळला ..

आत मध्ये बरीच मंडळी होती आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक व्यक्ती  सत्संगा ची माहिती सांगत होते ..

मंगेश ला मनातून हे ऐकायचं खर तर खूप कंटाळा आला होता पण त्या व्यक्तीमुळे कसा काय तो आला .

आणि त्याला त्या सत्संग विषयी एक एक करून प्राथमिक माहिती मिळाली .. आत्मा , परमात्मा , जन्म , मृत्यू , मोक्ष , पुनर्जन्म असे अनेक वेगवेगळ्या विषयावर त्यांनी मंगेश ला प्राथमिक माहिती सांगितली . जो मंगेश पाच मिनिटात तिथून पळ काढणार होता तोच मंगेश १ तास झाला तिथेच होता .. त्याला त्यातील काही मुद्दे पटले , काही मुद्दे नवीन होते , काही मुद्दे अजून जाणून घ्यायचे होते .. आत्तापर्यंत जे जे काही ऐकले वाचले त्या पेक्षा हे काहीतरी वेगळे होते ..

एक तासांननंतर त्याच व्यक्तीने काय कसे वाटले " तुम्हला जर आवडले असेल हे ज्ञान तर उद्या पासून रोज फक्त एक तास आम्हाला द्या आम्ही तुम्हाला या सगळ्या विषयी सर्व माहिती देऊ .. मेडिटेशन कसे करायचे , त्याचा फायदा काय ?जीवन जगताना तो कसा करायचा हे सर्व तुम्हाला कळेल .. आमचा फ्री कोर्स आहे तो समजून घ्या .. पुढे नाही काही केलेत तरी चालेल पण एकदा नुसता हा कोर्स केलात तरी तुम्हला खूप फायदा होईल .

आणि मंगेश तिकडून घरी आला ..

शालिनी " काय हो .. आज उशीर झाला .. जास्त काम होते का ? "

मंगेश ने तिला झाले ते सर्व सांगितले .. शालिनी पण ऐकतच बसली .. या माणसाने कधी पूजा केली नाही घरी आणि आता डायरेक्ट सत्संग कसा का ऐकायला गेला काय माहित ?असा विचार करत होती ..

मंगेश पण राहून राहून त्या परमार्थाच्या गोष्टी मनात कुठे तरी सारखा आठवत होता .. काही गोष्टी त्याला पटल्या होत्या .. नक्कीच काही तरी तत्थ्य आहे असा विचार चालू होताच .. मग शालिनी आणि मंगेश बाजारात गेले भाजी आणायला गेले तर येताना फ्रेश मासे घेऊन आले आणि संध्याकाळचे जेवण  फिश करी  आणि  भाकरी  खाणार होते. शालिनी ने पण मनापासून जेवण बनवले पण आज मंगेश ला त्याच्या आवडीचे हे खाणे  घशाखाली उतरत नव्हते कारण सत्संगात सांगितले होते कि परमार्था साठी खान पान  शुद्धी असली पाहिजे .. अन्न हे सात्विक असले पाहिजे .. जसे अन्न तसे मन , म्हणजे तसेच विचार मनात जागृत होतात .

मांसाहार करू नये कारण एका सजीव जीवाला जिवंत मारून आपण खातो म्हणजे त्या बिचारी मुक प्राण्यावर आपण अत्याचार करून आपला पाप वाढवत असतो .. शाकाहार हेच उत्तम अन्न . हे विचार त्याला फिश करी खाताना येत होते.

शालिनी " काय झाले ? आज आवडले नाही का ? आज असे काय खाताय ? आज ताटातले पहिले वाढलेच संपले नाही अजून "

मंगेश " काहीच बोलला नाही .. ताटात वाढेलले खाल्ले आणि हात धुतला .. "

मंगेश चे झाल्यावर शालिनी आणि मुले आणि आजी आनंदाने पोटभरून जेवले ..

आज मंगेश च्या मनात वेगळेच विचार येत होते ..  त्यांचा हा कोर्स कारू का ? फ्री तर आहे .. आणि नाही पटले तर द्याचे सोडून .. शेवटी ज्ञान ते ज्ञान घेतले तर फुकट नक्कीच जाणार नाही .

रात्री झोपताना शालिनी नॉर्मल गप्पा मारता होती .. शालिनी च्या लक्षात आले मंगेश च्या डोक्यात वेगळेच विविचार चालू आहेत

शालिनी " मी काय म्हणते ? अजून आपली मुले पण लहान आहेत .. आपण लहान पण पासून हेच अन्न खात आलोय .. मासे तर तुमचे सर्वात आवडीचे अन्न आहे .. गावाला तुम्ही स्वतः नदीतून मासे मारून आणून खाल्ले आहेत .. तेच मासे आज तुमच्या घशाखाली उतरत नव्हते ."

मंगेश " हो ना .. "

शालिनी " मी काय म्हणते .. आज ऐकलेत ते ठीक आहे पण आता उद्या नका जाऊ तिकडे .. संसारात राहून अशा गोष्टी आपण नाही करू शकत .. "

मंगेश " हो .. ठीक आहे .. तू म्हणतेस ते पण खरं आहे .. उगाच नको त्या भानगडीत न पडलेले बरे "

आणि मंगेश ने ठरवून टाकले अजून परमार्थाच्या गोष्टी करायला आपण काही म्हातारे झालेलो नाही . अजून मुले पण लहान आहे त्याच्या सर्व जवाबदाऱ्या आहेत माझ्यावर .. मुलांना शिकवायचे , त्यांना मोठे करायचेय .. नकोच ती वाट .. ते काही नाही आपण हा कोर्स नकोच करायला ..  असे ठरवून तो झोपून गेला .

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नॉर्मल रुटीन सुरु झाले .. मुले शाळेत गेली . शालिनी चे नेहमीचे काम सुरु होते .. शालिनी च्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते .. मुले आता मोठी होत आहेत .. थोड्या दिवसांनी दोघी मुली पण त्यांच्या त्यांच्या जवळच्या शाळेत जाऊन शकतात . मग मी घरात बसून नुसते जेवणं बनवत  वेळ घालवण्या पेक्षा कुठे तरी छोटी मोठी नोकरी केली तर तेवढीच संसारात उपयोगी होईल. नाही म्हटले तरी शालिनी च्या पण आता तिकडे खूप ओळखी झाल्या होत्या , तिला जॉब करावे असे वाटू लागले पण लग्न च्या वेळी तिचे शिक्षण अर्धवट राहिले होते .. कमीत कमी दहावी झाली असती तर कुठे ना कुठे चांगला जॉब मिळाला असता .. शाळेत आदितीला सोडायला गेली तेव्हा तिला माहिती मिळाली  होती  टीचर ट्रेनिन्ग कोर्स केला कि बालवाडीतल्या मुलांना शिकवायची नोकरी मिळेल . कसे तरी करून मंगेश ला हा कोर्स तिला करायचा होता .. या साठी तिला मंगेश कडून परमिशन पाहिजे होती 

मंगेश  च्या डोक्यात परमार्थाचा कोर्स करायचा कि नाही? आणि शालिनीच्या डोक्यात  टीचर ट्रेनिन्ग चा कोर्स करायला मिळेल कि नाही ? असे दोघे आपापल्या विचारात गुंग होते . तसेही रामदास स्वामींनी सांगितले आहे कि प्रपंचा  पायी परमार्थाकडे दुर्लक्ष करू नये . मंगेश चे शिक्षण जरी गावात झाले असले त्याला संस्कृत सुभाषिते अजूनही तोंडपाठ होती .. भगवद्गीता वाचली होती ,रामायण महाभारत , पुराण कथा माहित होत्या .. त्यामुळेच तर  त्याला तो सत्संग आकर्षित करत होता ..

🎭 Series Post

View all