संघर्ष एक कथा भाग -१३

In this part mangesh is dealing with worst situation in his life and struggling to save shalinis life

                                              संघर्ष एक कथा भाग -१३

क्रमश : भाग १२

शालिनी अजूनही झोपलीय  हे बघून मंगेश पुन्हा नर्सला ला सांगून बाहेर पडला . पुन्हा पोस्ट ऑफिस मध्ये गेला आणि तिकडून एक तार.  शालिनीच्या आई वडिलांना पाठवली . दीक्षित गुरुजी पण आता वयस्कर झाले होते . सहसा प्रवास टाळत असत.त्यांच्या भावाचा मुलगा त्यांच्या जवळ राहायला आला होता . तो तिकडे नोकरी पण करायचा आणि त्यांना मदत पण करायचा. दीक्षित गुरुजींना मुलगा झाला नव्हता पण त्यांच्या भाच्याने मुलग्याची कमी कधीच होऊन दिली नाही

मंगेश " ताबडतोब इकडे निघून या .. अशी तर पाठवली "

दीक्षित गुरुजी आणि शालिनीची आई तर मिळाल्यावर लगेचच निघाले .. काय प्रॉब्लेम झालाय या चा त्यांना हि अंदाज नव्हता . शालिनी ची आई ने लेकीला काय काय खायला आवडते केले , नातवंडांसाठी पण खाऊ तयार केला . छोट्या अदिती साठी खेळणी घेतली आणि शहरात यायला निघाले . भाचा बरोबर होताच .

इकडे दुपारी थोड्यावेळाने अदिती झोपली होती ती उठली . उठल्या उठल्या तिची नजर आई ला शोधू लागली ... अजून बोलता येत नव्हते पण अदिती सारखी म्म्म.... करत होती आजीने तिला साखर पाणी पाजले ते पण तिने धिड कारून लावले .. तिला आता भूख लागली होती पण त्याही पेक्षा आई च्या दुधाची हुकी आली होती . रडून रडून तिने अक्खे घर डोक्यावर घेतले होते . मंगेश ची आई नाना तर्हेने तिला शांत करण्याचा प्रयन्त करत होती . माधव राघव पण तिला कुकुक अदिती करून खेळवत होते . एक मिनिट थांबायची पण नंतर पुन्हा रडायची . तिला आता आई पाहिजे होती .. आजी ने कितीही केले ते आजी ती आजी आणि आई ती आई . खरतर आदिती ला आई पेक्षा आजीची सवय जास्त होती . पण झोपून उठल्यावर एक दुधाचा चुटका घेतला कि रिफ्रेश होयची मग दिवसभर आजीकडे असायची .. मग चपातीचे बारीक बारीक तुकडे चघळून खायची . वरण चं  पाणी प्यायची  तर डोलत डोलत प्यायची . आजीने कस बस तिला चिऊ काऊ दाखवत शांत केले आणि रडन रडून थकलेली आदिती पुन्हा तशीच उपाशी झोपली

बिचारी मंगेश ची आई तिची नुसती तारेवरची कसरत चालू होती . जेवणाचं बघा , मुलांचे बघा आणि मुळात म्हणजे मुलं लहान होती . माधव आणि राघव सुद्धा शाळेतून आल्यापासून आई नाही दिसली म्हणून हिरमुसले होते .

शालिनी ची इंजेकशन ची भूल उतरल्यावर  शालिनीला जाग आली  खरी पण तिला असह्य वेदना होत होत्या आणि त्या थांबत च नव्हत्या ती नुसती व्हीव्हळत होती . "आग होतेय आग होतेय .. हि आग थांबवा कोणीतरी ... अहो  बघा ना माझं अंग जळतंय , झोंबतंय ...तुम्ही करा ना काहीतरी .. तिचा आवाज ऐकून मंगेश नर्स  च्या मागे लागला अहो मॅडम काहीतरी करा .. तिची आग थांबवा ... मॅडम करा ना काहीतरी .. बिचारी तळमळतेय .

शालिनी ची अवस्था फार बिकट झाली होती .. हि आग झेलने कठीण काम नव्हते ... या त्रासापेक्षा मुक्त झालेलं बरं असेच वाटेल ... काय करणार डॉक्टरांनी मंगेश ला सांगितले होते तिला जाग आली कि परिस्थिती बिकट होणार आहे . याशिवाय शालिनीच्या पोटात एक गर्भ तयार  होत होता  त्यामुळे तिला जास्त पॉवर ची भूल पण देता येत नव्हती.

मंगेश ने शेवटी नाइलाजाने डॉक्टरांना सांगितले " तुम्ही बाळाची पर्वा नका करू .. सध्या माझ्या बायकोला वाचवा ... तीचा जीव महत्वाचा आहे आमच्यासाठी"

डॉक्टर म्हणाले " बाळाची हमी आपण देत च नाहीये . तुम्ही सध्या विसरूनच जा . आमचं लक्ष आहे पेशंट वर .. आता त्यांना सलाइन लावली कि होतील त्या शांत .

हा दिवस संपत संपत नव्हता . घरात मुलांचं काय ? मुले रस्त्याकडे डोळे लावून बसलेली .. आज बाबा पण अजून आले नाहीत .. आई तर सकाळ पासून नाहीये .

आजी पण शालिनीच्या काळजीत शालिनीचा संसार ओढत होती .. हे हि असे दिवस बघावे लागतील असे आजी पण पण वाटले नव्हते .

शालिनी शांत झाल्यावर मंगेश घरी आला " झालेलं जेवण मुलांना त्याने स्वतःच्या हाताने भरवले . मंगेश च्या आई ने आदितीला ला कशी बशी भाताची पेज भरवली .. आणि मग मंगेश आणि आई दोघे जेवले .. आणि मुलांना झोपवून मंगेश रात्री  हॉस्पिटल ला आला . रात्री  अदिती त्रास देणार होतीच पण काय करणार . नाही म्हटले तरी मंगेश ने आदिती साठी दूध पावडर आणि बाटली आणलीच . आणि ते खर तर बर झाले ..आदिती ते दूध हळू हळू प्यायला लागली आणि मग रडायचं पण कमी झालं . मंगेश ने मुलांना सांगितले कि आई ला बरं नाहीये डॉक्टरांनी मोठं इंजेकशन लावलाय म्हणून तिला तिकडेच ठेवलीय .. मी आता जातो आणि बघतो इंजेकशन संपले का तुम्ही आज त आजी बरोबर झोपा .. आजीला त्रास देऊ नका .. आणि एक एक चॉकलेट दिले त्यांना खायला . मग काय मुले पण झोपली .

रात्री मंगेश हॉस्पिटल ला आला आणि तिथल्या बाकावर झोपायचा प्रयत्न करू लागला .. जरा डोळे मिटायला गेला कि त्याला ती आगीच्या ज्वालात ओरडत असलेली शालिनी दिसायची .. डोळ्यासमोरून ते भयानक चित्र जातच नव्हते .

दुसऱ्या दिवशी शालिनीचे आई बाबा आणि भाचे आले . घडला प्रकार त्यांना समजाला आणि शालिनी ची आई आणि गरुजींना पण खूप वाईट वाटले . असे कसे झाले रे मंगेश ..माझी मुलगी वाचेल ना यातून असे बोलू लागले .

मंगेश तरी काय बोलणार होता .. गुरुजींनी पण थोडे फार पैसे आणले होते ते मंगेश ला दिले .. मंगेश नकोच म्हणत होता पण अत्ता त्याला सात्वंनापेक्षा पैशाची मदत जास्त पाहिजे होती . आणि जो एकट्यावर भर पडत होता तो आता जरा कमी होणार होता . घरात आजीला मदतीला आता शालिनीची आई पण आली होती .. गुरुजी थोडे फार नातवंडांकडे पाहतील आणि भाचा मंगेश बरोबर बाजारात जा ये ने आण अशी थोडीफार काम करण्यासारखा होता .

त्यांच्या येण्याने जरा मंगेश ला उभारी आली होती पण जितकी जास्त माणसे तेवढा घरखर्च पण वाढत जातो . पैशाचे गणित जमवताना मंगेश ची वाट लागत होती .

शालिनी पण औषधांना रेस्पॉन्ड करत होती ..हळू हळू ती जी जगते का मरते अशी होती ती आता बरी होत होती.तिची ओली कातडी सुकत होती .. रोज च्या रोज  ड्रेसिंग करायचे असल्याचे . ड्रेसिंग च्या वेळी मात्र भयानक ओरडायची . हे काम करणाऱ्या डॉक्टरांना पण खरोखर मनापासून सलाम !!

दोन दिवसातून एकदा स्पेशल डॉक्टर स्वतः येऊन चेक करायचे . औषधे बदलून द्यायचे .. तिला वयवस्थित चेक करायचे . आणि तिच्या तब्बेतीत प्रगती होती . शालिनी आता आई, बाबा  , नवरा यांच्याकडे बघत असे . जेव्हा कोणी समोर दिसले कि तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा गळायच्या . मग डॉक्टर पण ओरडायचे . पेशंट ला आराम करू द्यात ...

यावेळी डॉक्टरांनीं तिला आता घरच खाणे पण ते पेज वगैरे असे देऊ शकता असे सांगितले.

शालिनीच्या आई ने आणि मंगेश च्या आई ने चांगली कंबर कसली . रोज तिला वेगवेगळ्या पेज करून डबा पाठवत असत . कधी भाताची , कधी गावाची, कधी ज्वारीची, कधी नाचणीची  पेज ,कधी रव्याची खीर ती आणि आदिती दोघी खायच्या ..

औषध आणि काळजी याने शालिनी बरी होत होती . तिचे भाजलेले अंग बघून पटकन भीती वाटायची . देवाची कृपा म्हणून चेहऱ्या पर्यंत आग पोहचली नव्हती .. पाय, पाठ थोडी मान आणि हात भाजलेलं . आता शालिनी ला थोडं थोडं उठता येत होत . बसता येत होत .. स्वतःचे भाजलेले शरीर बघून शालिनी जोरात रडायला लागायची .

मंगेश आणि बाकीच्या घरातल्यांना ती वाचलीय यातच बरे वाटतं होते .

बोल बोलता १५ दिवस झाले हॉस्पिटल वाल्यांनी मंगेश ला बोलावून सांगितले तुम्ही आता थोडे तरी पैसे भरा ... मंगेश ने हॉस्पिटल च्या बिलाचा आकडा बघितला आणि तो चक्रावूनच गेला . एवढे पैसे मी कुठून आणणार या भीतीने त्याला घाम फुटला . त्याची पी एफ ची रक्कम सुध्या या पुढे काहीच नव्हती . मंगेश आता पुरता खचला होता . पूर्णतः कर्ज बाजरी झाला होता . शालिनी ला जीवाचे रान करून त्याने वाचवले तर होतेच पण इतका कर्जात डुबला होता कि आता बाहेर येणे शक्यच नव्हते . शिवाय ऑफिस मध्ये हि बऱ्याच सुट्ट्या होत होत्या . सरकारी असली तरी ती पण एक नोकरीच आहे .

शेवटी शालिनीचे मंगळसूत्र विकले , थोडे पी एफ चे पैसे असे  थोडे गुरुजीं कडून घेतलेले ते वापरून कसे बसे करून त्याने हॉस्पिटलचे पैसे भरले .

🎭 Series Post

View all