संघर्षाची हार - भाग - 2
अर्चना दहावी झाल्यावर घरात सर्वांना ती मोठी असल्यामुळे तिच्या लग्नाचे वेध लागले, आणि मग तिच्या बाबांच्या ओळखीतून एक सातारा चे स्थळ सांगून आले. मुलाचं घर खूप मोठं होत, घराच्या खालच्या भागात त्याचं एक नाश्ता आणि जेवण चं छोटंसं हॉटेल होत. तो आणि त्याची आई तें हॉटेल सांभाळत असतं.
हॉटेल च्या वरती त्यांचं घर होतं. आई आणि मुलगा एवढंच छोटं कुटुंब होतं, मुलाच्या दोन बहिणींची लग्न झालेली होती, त्याचे वडील लहानपणीच एका अपघातात वारले होते. सगळं व्यवस्थित वाटल्यावर अर्चनाच्या वडिलांनी लग्न ठरवलं.
पुढच्या महिन्यात साखरपुडा आणि तीन महिन्यांनी लग्न असा सगळा कार्यक्रम ठरला. साखरपुडा अर्चनाच्या घरी होणार होतं, आणि लग्न सुद्धा त्यांच्याच गावातल्या एका मंगल कार्यालयात करायचं असं ठरलं. आणि मुलाकडंच्यांनी ही त्याला हॊ म्हंटले. कारण अर्चनाचे वडील म्हणाले आमची पाहुणे मंडळी जास्त आहेत त्यामुळे आमच्या गावात कार्यालय असले तर सर्व नातेवाईकांना बरं पडेल त्यामुळे मग सर्व हॊ म्हणाले.
नवरा मुलगा ( अजित ) दिसायला सावळा असला तरी सुंदर आणि देखणा होता. त्याला अर्चना पसंत पडली होती. लग्नाचा बस्ता आणि सोने खरेदी साठी दोन्ही कडची मंडळी बाजारात गेली. साड्या खरेदी, नवऱ्या मुलाला सूट घेण्यात आला.
साखरपुडा छान पार पडला. आता सर्वांना लग्नाचे वेध लागले होते आणि बघता बघता लग्नाला आठ दिवस उरले, गावात असलेलं लग्नघर सजवण्यात आले, घराच्या अंगणात लाईट माळा लावून छोटासा मंडप सजवण्यात आला, लांबून लांबून आलेले नातेवाईक - काका, काकीं, आत्या, मावशी, चुलत बहिणीं, मामा - मामी ह्या सर्व पाहुण्यांनी लग्नघर अगदी खुललं होतं.
घरातली पुरुष मंडळी मंडपात बसून गप्पा मारू लागली. स्त्री वर्ग किचन मध्ये जेवण करण्यात व्यस्त राहू लागला, आलेले सर्व बाळ - गोपाळ अंगणात खेळू लागले. घरातलं पहिलंच लग्न त्यामुळे सर्व जण अतिशय उत्साही होते. नवऱ्याकडची मंडळी लग्नाच्या आदल्या दिवशी येऊन गावातल्याच एका घरी वस्तीसाठी राहणार होते. लग्नाचा मुहूर्त दुपारी बारा वाजताचा होता.
लग्नाचा दिवस उजाडला. करवल्या सजल्या, काकीं, आत्या, मामी, ताई सगळ्या छान सजल्या होत्या, केसात गजरे माळले होते, सर्वांनी हातात छान चुडा भरला होता. लहान लहान मुलींनी सुंदर परिसारखे फ्रॉक घातले होते. मंगल कार्यालयच्या दरवाजाबाहेर दोन स्त्रिया उभ्या राहुन सर्व लग्नाला येणाऱ्या स्त्रियांना हळद - कुंकू लावत होत्या. सर्व जण नवरा - नवरी च्या स्वागतासाठी सज्ज झाले होते.
लग्नाचा दिवस उजाडला. करवल्या सजल्या, काकीं, आत्या, मामी, ताई सगळ्या छान सजल्या होत्या, केसात गजरे माळले होते, सर्वांनी हातात छान चुडा भरला होता. लहान लहान मुलींनी सुंदर परिसारखे फ्रॉक घातले होते. मंगल कार्यालयच्या दरवाजाबाहेर दोन स्त्रिया उभ्या राहुन सर्व लग्नाला येणाऱ्या स्त्रियांना हळद - कुंकू लावत होत्या. सर्व जण नवरा - नवरी च्या स्वागतासाठी सज्ज झाले होते.
इकडे अर्चनाला सजवण्यात आले. नवरीच्या वैशात ती खूप सुंदर दिसत होती. हातात भरलेल्या हिरव्यागार बांगड्या, सौभाग्यअलंकार ह्या सर्वांमुळे ती अजूनच सुंदर दिसत होती. नवरीला घेऊन काका- मामा हॉलवर आले. त्या नंतर अर्ध्या तासाने नवरा मुलगा अजित हॉलवर आला. अंगावर पांढराशुभ्र सदरा आणि सोनेरी काठ असलेलं धोतर असा सुंदर पेहराव अजितने केला होता..
कार्यालय सजले होते, जिथे तिथे फुलांची आरास होती, केळीच्या पानांची सजावट केलेली होती. नवग्रह झाल्यावर बारा वाजताच्या मुहूर्तावर लग्न लागलं, डोक्यावर अक्षता पडल्या. अंतरपाट बाजूला झाला, नवदामत्याने एकमेकांना हार घातले. सप्तपदी झाली, अर्चना च्या गळ्यात अजितने मंगळसूत्र घातले. लग्न झालं. सगळ्या विधी झाल्या, थोड्या वेळाने नवरा - नवरी रीसेपशनला उभे राहिले, अर्चनाने मोरपीसी कलरचा शालू परिधान केला होता, आणि अजितने निळ्या रंगाचा सूट घातला होता, जोडपं खूप सुंदर दिसत होतं.
सर्व कार्यक्रम पार पडल्यावर अर्चनाच्या पाठवणीची वेळ झाली. तिचे बहीण, भाऊ सर्व तीला बिलगून रडू लागले. एक तासानंतर अर्चनाची पाठवणी झाली. अर्चना बरोबर तिची एक चुलत बहीण करवली म्हणून गेली होती, संध्याकाळी पाच वाजता च्या दरम्यान अर्चनाची सासरकडे जाणारी गाडी निघाली.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - अर्चनाच्या सासूचा स्वभाव आणि अजित ची वागणूक ).....
