संघर्षाची हार - भाग - 3
( मागच्या भागात आपण बघितले - अर्चना सासरी जाते आता पुढे...)
अर्चनाच्या सासरी दहा वाजता जोडपं पोचतं, माप ओलांडून अर्चना गृहप्रवेश करते. घर खूप मोठं असतं. दुस्र्या दिवशी लग्नाची पूजा असते, बाकीची मंडळी त्याची तयारी करत असतात. सर्व बायका स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत असतात. थोड्या वेळाने जेवणाच्या पंगती लावल्या जातात. सर्व पाहुणे मंडळी जेवतात.
अर्चना करवली बरोबर एका रूम मध्ये जाऊन शालू बदलून साडी निसून बाहेर येते. अर्चना, अजित जेवून घेतात. आणि मग एक एक करून सगळी पाहुणे मंडळी झोपण्यासाठी निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा लग्नघरात पूजेची गडबड चालू होते. पूजा सांग्रसांगित पार पडते. अर्चनाच्या माहेरून पूजेला वडील आणि भाऊ येतात.
सासू स्वभावाने खुपचं छान असते. सारखी अर्चनाला - अर्चू बाळा अशी हाक मारत असते. अजितबरोबर अर्चनाचं तसं अजून जास्त बोलणं झालेलं नसतं. पूजेच्या पाया पाडून बाबा आणि भाऊ निघतात, जाताना करवलीला सुद्धा घेऊन जातात. माहेरची माणसं निघाताना अर्चनाला रडू आलं, पटकन तिची सासू तीला जवळ घेऊन म्हणाली अगं तू आता आमच्या घरची लक्ष्मी आहेस आजपासून तुला मी कसलीच कमी पडू देणार नाही. अर्चनाच्या बाबांना सासू म्हणू लागली, अहो तुम्ही कसलीच काळजी करू नका. इथे अगदी सुखात राहिलं तुमची लेक.
तिसऱ्या दिवसापासून अर्चनाच्या संसाराला सुरवात होते. सासू आणि नवरा दोघेही हॉटेल चालवत असतात. घराच्या खालीच नाश्ता आणि जेवण मिळण्याचं त्यांचं एक छोटसं हॉटेल असतं. घरात लग्न असल्याने आठ दिवस हॉटेल बंद ठेवण्यात आलं होतं.
अर्चनाच्या लग्नाच्या सहाव्या दिवशी सकाळी हॉटेल पुन्हा चालू करण्यात येत. सासू हॉटेल साठी लागणारे मसाले, वाटप, चटण्या हे सर्व घरीच तयार करत असें. सासू सुरवातीला अर्चनाला तू बघ फक्त सध्या लगेचंचं हॉटेल ची कामं करू नकोसं असं सांगत असें. आणि अर्चना पण मनातल्या मनात म्हणत असें की एवढं वाटप आणि हे भरपूर जास्तीच करणं मला जमेल की नाही काय माहीती.
सासू सकाळी साडे पाच वाजल्यापासून सगळ्या तयारीला लागत असें. नाश्त्यासाठी लागणारे जिन्नस काढून ठेवत असें, हळू हळू अर्चना ही लवकर उठून त्यांना भाज्या, कांदा, टोमॅटो - चिरणे ह्यात मदत करू लागली.
अर्चनाने मी खाली हॉटेल मध्ये मदत करायला येऊ कां विचारले की अजित नको गं तू घरातली कामं कर, आम्ही दोघे आई आणि मी खाली दहा वर्षांपासून हॉटेल चालवत आहोत त्यामुळे आम्हाला सवय आहे, तू कशाला दगदग करतेस असं म्हणत असें.
अजित स्वभावाने शांत होता. त्याचं हॉटेल आणि तो असं त्याचं वागणं होतं. सासूला अर्चना सगळ्या कामात मदत करत असें, सासू - सुना सकाळी लवकर उठून हॉटेल साठी लागणारी सगळी तयारी करत असतं. सासू सुद्धा अर्चनाशी अगदी मुलीसारखी वागत असें. पण अजित अर्चनाने मी खाली हॉटेल मध्ये येऊ कां असं विचारलं की नकोच असं म्हणत असें.
लग्नाला एक महिना होतं आला होता एक दिवस दुपारी अर्चना स्वतः चं हॉटेल मध्ये गेली, दुपारी जेवणासाठी हॉटेल मध्ये बऱ्या पैकी गर्दी होती. पुरुष मंडळी जेवत होती. हॉटेल मध्ये जेवणाची थाळी मिळत असें त्यामुळे दुपारच्या वेळेत त्यासाठी दोन, तीन बायका आणि पाच - सहा पुरुष थांबले होते. अर्चना आलेली बघून सासू खूप खुश झाली. पण अजित तिच्याकडे रागाने बघू लागला. ती काहीच बोलली नाही..
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - अजितला अर्चनाने खाली हॉटेलमध्ये आलेलं कां आवडत नसे...)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा