Login

संघर्षाची हार - भाग - 4

sangharshaachi haar
संघर्षाची हार - भाग - 4

( मागच्या भागात आपण बघितले - अजित अर्चना खाली हॉटेल मध्ये गेल्यावर तिच्याकडे रागाने बघू लागला - आता पुढे )


अर्चना हॉटेलमध्ये गेली म्हणून सासू खूप खुश झाली, कारण ह्या एक महिन्यात सासुसुद्धा अर्चनाला एका शब्दाने तू हॉटेल मध्ये कां येत नाहीस असं बोलली नव्हती. सासूला मनातून खूप वाटतं होतं की अर्चनाने हॉटेलमध्ये स्वतःहुन यावे, पण सासूला वाटतं होतं की अर्चनाला चं हॉटेल मध्ये गर्दी असते म्हणून यावेसे वाटतं नाही आहे. पण इथे खरं कारण चं वेगळं होतं अर्चना एकटी असताना अजितच तीला बोलत असें तू खाली येऊ नकोसं असं.


अर्चना खाली हॉटेल मध्ये गेल्यावर अजितने तिच्याकडे रागाने बघितल्यावर तीला खूप वाईट वाटले. आणि ती तिथे थोडा वेळ थांबून निघून आली. सासू तीला बोलत होती की अगं थांब थोडा वेळ पण अजितचा उतरलेला चेहरा बघून अर्चना मनोमन घरी जाण्याचे ठरवले. आणि ती निघून आली. सासू सुद्धा तीला थांबवत होती पण ती थांबली नाही याचे सासूला वाईट वाटले...


अर्चना घरी येऊन खूप रडली. तीला खूप वाईट वाटले. आज अजित घरी आल्यावर त्याला ह्याचे कारण विचारावे हे तीने ठरवले. अजित दुपारी हॉटेल मध्येच जेवत असें त्यामुळे तो वरती घरी येत नसे. डायरेक्ट रात्री नऊ वाजता सर्व आवरूनचं घरी येत असें. त्यामुळे अजित बरोबर आज ह्या विषयावर काहीही करून बोलायचंचं असं तीने ठरवलं.


ती विचार करत खिडकीत बसून राहिली. संध्याकाळ झाली तरी ती तिथेच विचार करत बसली होती. त्या दिवशी नेमकां अजित संध्याकाळी साडे - पाच वाजता चहा पिण्यासाठी घरी आला. आणि अर्चनाने त्याला चहा दिल्यावर विचारले..... ( अहो, तुम्हाला मी आज आपल्या हॉटेल मध्ये आलेली तें कां आवडलं नाही ) अजित ओरडून बोलला, तुला मी सांगितलं आहे ना मला तू तिथे आलेलं चालणार नाही असं, मग कां आलीस., अहो पण काय झालं मी आली तर आपलंच तर हॉटेल आहे ना...


अजित पुन्हा चिडून बोलला - हॉटेल मध्ये तू यायचं नाहीस म्हणजे नाहीस. मला तू तिथे आलेलं चालणार नाही. तिथे खूप पुरुष असतात आणि तू तिथे येण्याची गरज नाही. तू कशाला आलीस खाली मी नको सांगितलं होतं ना.....


अर्चना म्हणू लागली - अहो पण पुरुष असले म्हणून काय झालं, माझा तिथे येण्याचा आणि पुरुष असण्याचा काय संबंध, अजित अजून जोरजोरात ओरडू लागला, तुला एकदा सांगितलेलं कळतं नाही कां गं., तो एवढया जोरात ओरडला की अर्चनाच्या सासूबाई हॉटेलमधून वरती काय झाले तें बघायला आल्या...


सासूबाई म्हणू लागल्या की काय झालं.... कां अर्चूवर एवढा चिडला आहेस, अजित म्हणू लागला मी नको सांगितलं आहे तरी ही हॉटेल मध्ये कां आली....


सासू बोलू लागली - अरे पण काय झालं त्यात एवढं, आपलं हॉटेल आहे तें तीने येणं गरजेचेच आहे. अजित बोलला तरीपण मला ती खाली आलेली चालणार नाही समजलं तुम्हा दोघींना... एवढं बोलून अजित चिडून खाली निघून गेला...


( एव्हाना अर्चनाच्या लक्षात आले की अजितचा स्वभाव संशयी असावा, तीने डोळयांतले पाणी पुसले आणि सासूला बोलली - आई तुम्ही काळजी करू नका मी बोलते रात्री त्यांच्याशी, सासू पण डोळे पुसत खाली गेली. )
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - अजितच्या ह्या संशयी स्वभावामुळे अर्चनाला भविष्यात अजून काय काय भोगावे लागते तें )

0

🎭 Series Post

View all