Login

संघर्षाची हार - भाग - 5

sangharshachi haar
संघर्षाची हार - भाग - 5

( मागच्या भागात आपण बघितले - अर्चनाला समजले की अजितचा स्वभाव संशयी आहे - आता पुढे... )

त्या रात्री अजित नऊ वाजता हॉटेल मधून आला, आल्या आल्या जेवायला वाढं असं अर्चूला ओरडून बोलला. तीने सुद्धा गप्पपणे त्याला जेवायला वाढले आणि तो जेवून रूम मध्ये निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावरूनच त्याचा राग दिसून येत होता. तो अजूनही खूप चिडलेलाच होता.

अर्चना आणि सासू जेवल्या आणि मग काम घरातली सर्व कामं आटपल्यावर अर्चनाने सासूला विचारले आई हे आज असें कां वागले, सासू बोलू लागली - अगं मला दोन मुलीं त्यांना ही अजित सतत बंधनात ठेवत असें, इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, त्या कुठे बाहेर गेल्या तर हा आल्यावर त्यांना खूप प्रशन विचारत असें, कोण होतं बरोबर, कुठे होतात एवढा वेळ वैगेरे असं खूप विचारत असें. पण तेव्हा मला वाटतं असें की तो मोठा भाऊ आहे त्यांचा वडील नाहीत म्हंटल्यावर तो मोठा ह्या नात्याने काळजीने त्यांना धाकात, बंधनात ठेवतोय..

सासू सांगू लागली - एकदा तुझ्या छोट्या नंदेला त्याने शाळा सुटल्यावर एका मुलाबरोबर बोलताना पहिलं आणि त्याने तिथे काहीच न बोलता ती घरी आल्यावर तीला खूप मारलं, ती सांगत होती, दादा तो मुलगा फक्त माझ्याकडे गणिताचा व्यवसाय मागत होता पण अजितने तिचं काहीच ऐकून न घेता तीला खूप मारले आणि तीला चार दिवस शाळेत देखील पाठवले नाही.

दोन्ही मुलीं खूप घाबरून राहायच्या दादाला, पण तेव्हा मला वाटायचं की - तो घरातला कर्ता पुरुष आहे, त्यात त्याच्यावर लहान बहिणींची जबाबदारी आहे त्या वाईट मार्गाला जाऊ नयेत म्हणून तो बहिणींना बंधनात ठेवतोय, त्याचं वागणं कधी कधी अति असायचं की मुलींनी टायमात चं घरी यायचं, उशीर झाला की अजित त्यांना कारण न विचारता आधीच ओरडायला सुरवात करत असें.

खरं सांगू पण मला तेव्हा हे कळलेच नाही की ह्याच्या मनात संशय भरलेला आहे, ह्याचा स्वभाव चं संशयी आहे हे मला वाटलं नाही. अर्चू बोलू लागली, आई पण आता मला काळजी वाटू लागलीय हे मला सतत ओरडणार नाहीत ना, सासू बोलली अगं मी आहे ना तू काळजी करू नकोसं.

दर मंगळवारी त्यांच्या एरियामधली सगळी दुकान बंद असण्याचा दिवस असायचा, पण हॉटेल असल्यामुळे अजित संध्याकाळच्या एका वेळेत चं तें बंद ठेवत असें, बाकी हॉटेल रोज चालू असें. एके मंगळवारी संध्याकाळी अजितला अर्चना बोलली अहो लग्नाला दीड महिना होवून गेला तरी तुम्ही अजून मला साधे इथले मार्केट पण दाखवले नाहीत, आई आणि तुम्ही दिवसभर हॉटेल च्या गडबडीत असता त्यामुळे मी पण कधी बोलली नाही.

अर्चना बोलली आज आपण जाऊया कां, अजित बरं चल असं बोलला. अर्चना खुश झाली आणि छान साडी निसून तयार होऊन अजित बरोबर निघाली. त्या दोघांना असं एकत्र बाहेर जाताना बघून सासू पण खुश झाली. लग्नानंतर दीड महिन्याने दोघे प्रथम चं असें बाहेर जातं होते.

अर्चना ने बाजारात भाजी, स्वतःला केसाचे क्लिप अशा दोन, तीन गोष्टी घेतल्या. आणि दोघे चालत येत होते आणि बाजारात गर्दी मध्ये चुकून एका माणसाचा अर्चनाला धक्का लागला. आणि अजितने तें बघितले आणि त्या माणसाच्या अक्षरशः अंगावर मारायला धावला.

सगळी बाजारातली लोक ओरडू लागली, पण अजित ने त्या माणसावर हात उगारला, अर्चना अहो शांत व्हा बोलत होती पण अजित ऐकेचना, शेवटी त्या माणसाने अजितचे पाय पकडून माफी मागितली तेव्हा अजितने त्याला सोडले.

अजितचे हे एवढ्याशा गोष्टी वरून एवढे चिडणे अर्चनाला अजिबात आवडले नाही. झाल्या प्रकाराने अर्चना खूप घाबरली होती, अजित रागारागात तिच्या पुढे पटापट चालत होता. ती बिचारी भरबाजारात त्याच्या पाठून धावत होती.

अर्चना घरी येऊन सासूला मिठी मारून खूप रडली आणि बोलू लागली आई मी पुन्हा ह्यांच्याबरोबर कुठेही जाणार नाही आपण दोघीं मार्केटला जातं जावू. सासू बरं तू रडू नकोसं शांत हॊ आधी असं तीला समजावू लागली. अजित तर त्याने काहीच चुकीचं केलं नाही अशा अविरभावात होता.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - अजितच्या ह्या अशा स्वभावामुळे अर्चना चं काय नुकसान होते तें...)