Login

संघर्षाची हार - भाग - 6

sangharshachi haar
संघर्षाची हार - भाग - 6

( मागच्या भागात आपण बघितले - अजित भरबाजारात त्या माणसाला भरपूर मारतो - आता पुढे )

अर्चनाच्या माहेरी कायमचं हसतखेळत वातावरण असें त्यामुळे अजितचं हे असं रागवून ओरडणे, आकांडतांडव करणे अर्चनाच्या जीवाला खूप लागले होते. तीला सारखं तें अजितच बाजारातलं वागणं आठवून रडू येत होते, तीने दोन, तीन दिवस रडण्यात घालवले. खरंतर ती मनातून खूप घाबरली होती. तीला सारखं मनातून वाटतं होतं की हे असं अजितच वागणं आई - बाबांना सांगावं, पण तीने स्वतःला आवरले.

अजितला अर्चनाच्या रडण्याचं काहीच वाटतं नव्हतं त्याच्या मते त्याने केलं तेच बरोबर होतं. तीन दिवस तीने रडून घालवले आणि शेवटी स्वतः ला सावरले. अजितचा राग पाच दिवसांनी शांत झाला. आणि सहाव्या दिवशी अर्चनाच्या छोट्या नंदेचा फोन आला तिच्या मुलाचा पाचवा वाढदिवस होता म्हणून ह्या तिघांना पण बोलावले होते.

सासू बोलू लागली, मी येत नाही तुम्ही दोघे जाऊन या, आता मात्र अर्चना मनातून घाबरली तीला अजितचे त्या दिवशीचे वागणे आठवले. अजित हॊ आई आम्ही दोघे दुपारी जाऊन दुस्र्या दिवशी सकाळी लवकर येतो असं बोलला. अर्चनाला बोलला आपण दोघे जाऊ ती हॊ बोलली. उदया बाजारात जाऊन बाबुला वाढदिवसासाठी ड्रेस घेऊया असं तो म्हणाला आणि अर्चनाला बाजारात म्हंटल्यावर भीतीच वाटली.

सकाळी दोघे बाजारात गेले तेव्हा एका दुकानात अजित अर्चनाला घेऊन गेला, तिथे त्या दुकानातला एक मुलगा ड्रेस दाखवू लागला आणि ताई हा ड्रेस बघा, तो ड्रेस बघा असं करू लागल्यावर अजित त्या मुलावर खेकसला आणि बोलला ये ताई, ताई काय करतो आहेस मला बोल काय बोलायचं तें. तो मुलगा गप्पच झाला. आणि मग अजितने एक ड्रेस पसंत केला आणि तो घेऊन दोघे निघाले.
दुसऱ्या दिवशी दुपारच्या एस टी ने दोघे निघाले. आणि तीन तासांनी नंदेच्या घरी पोचले, नणंद दादा - वहिनीला बघून खूप खुश झाली. तिच्या मुलाच्या वाढदिवसाला जेवण, आणि बाकीची कामं करायला अर्चूने खूप मदत केली, नंदे ची सासू बोलली पण अर्चना तू सगळ्या कामात खुपचं हुशार आहेस.

वाढदिवस झाल्यावर रात्री पुरुष मंडळी बाहेर हॉल मध्ये झोपली आणि बायका आत रूम मध्ये झोपल्या. नणंद अर्चूला बोलू लागली वहिनी दादा तुला बंधनात तर ठेवत नाही ना आम्हा बहिणींना ठेवायचा तसा, अर्चनाला पटकन रडू आले. तें बघून नणंद बोलू लागली - वहिनी दादा असंच आम्हा दोघीं बहिणींना पण खूप त्रास द्यायचा, म्हणून आम्ही दोघींनी पण त्याच्या जाचातून सुटण्यासाठी जे पहिलं स्थळ आलं त्याला हॊ म्हंटल..देवाच्या कृपेनें आमचं सगळं चांगल आहे. पण दादा खुपचं हेकट आहे, त्याला समोरच्यांना त्याच्या मनाप्रमाणेच वागवायचं असतं.

अर्चनाला अजूनच रडू येऊ लागले तेव्हा नणंद बोलू लागली पण आई चा स्वभाव खूप सुंदर आहे ती तुला कधीच त्रास देणार नाही. ती तुला अगदी मुलीप्रमाणे वागवेल. हॊ आई छान वागतात अगदी असं अर्चू बोलली.

दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून अजित आणि अर्चना निघाले. अर्चना प्रवासात गप्प गप्प होती तें बघून अजितने विचारले काय झालं ती काही नाही असं बोलून गप्प झाली. अजित प्रवासात गर्दी होती तेव्हा अगदी अर्चनाच्या जवळ जाऊन तीला कोणाचा धक्का लागू नये म्हणून जपत होता. बारा वाजायच्या दरम्यान दोघे घरी आले.

असेच दिवस जातं होते, लग्नाला वर्ष होतं आले होते तरी अर्चना पून्हा कधीच हॉटेल मध्ये गेली नाही. सासूला त्याचं खूप वाईट वाटतं होतं, पण अजित पुढे दोघींचं पण काहीच चालेना. अर्चना घरात गप्प गप्प राहत असें. सासू बिचारी तीला अजिबात त्रास होऊ नये असं आवर्जून वागण्याचा प्रयत्न करत असें.

लग्नाला दीड वर्ष झाले आणि अर्चना गरोदर राहिली. सासू आणि अजित खूप खुश झाले.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - अर्चनाच्या आयुष्यात कोणते वादळ येणार आहे तें )