संघर्षाची हार - भाग - 7
( मागच्या भागात आपण बघितले - अर्चना ची नणंद तीला अजितच्या पूर्वीच्या वागणुकीबद्दल सांगते - आता पुढे )
अर्चना गरोदर असल्याचे कळल्यावर अजित खुश होतो. तिची सारखी काळजी घेत असतो. सातव्या महिन्यात अर्चना डिलिव्हरी साठी माहेरी जाते. माहेरी अर्चना चे खूप लाड होतात. नवव्या महिन्यात अर्चना एका मुलाला जन्म देते. अजित आणि त्याची आई खूप खुश होतात.
बाळाचं बारसं केलं जातं ( मुलाचं नाव - सुमित ) ठेवलं जातं. अर्चना चार महिने माहेरी राहुन बाळाला घेऊन पुन्हा सासरी येते. सासू बाळाला सकाळी मालिश, अंघोळ घालून मगचं हॉटेलमध्ये जातं असें. अजित मला लहान बाळांना घ्यायला भीती वाटते असं बोलून जास्त बाळाला घेत नसे.
सासूला हॉटेल मध्ये रोज जावं लागत असल्यामुळे अर्चनाला एकटीलाचं दिवसभर सर्व बाळाचं करावं लागत असें. सासू अधून मधून वरती येऊन बाळाला बघून जातं असे. अर्चनाला सासूचा खूप आधार वाटत असें.
अर्चनाने अजितबरोबर बाहेर जाणे पूर्णपणे बंद केले होते. सासू अर्चनाला तीला लागणाऱ्या वस्तू बाजारात जाऊन घेऊन येत असें. अर्चना महिनोमहीने घराबाहेर चं पडत नसे. तीला घरात कंटाळा येत असें पण तीला आता अजीतबरोबर कुठे जायलाचं भीती वाटतं असें.
सुमित हळूहळू मोठा होतं होता. सासू सुद्धा त्याचे खूप लाड करत असें, अजितबरोबर कुठेच जातं नसल्यामुळे अजित आणि अर्चनाचं भांडण होतं नसे. आणि सासू तीला अगदी मुलीसारखी जपत असें.
पण म्हणतात ना, सगळं चांगल होतं असलं की काहीतरी विपरीतचं घडतं तसं अर्चनाची सासू एके दिवशी रात्री जेवत असताना अचानक तिच्या छातीत दुखायला लागत, अजित रिक्षा बोलावतो आणि त्यांना हॉस्पिटलला न्यायला धावपळ करतो, पण रिक्षा हॉस्पिटल च्या दारात पोचेपर्यंत त्यांचा जीव गेलेला असतो. त्यांना मेजर हार्ट अटॅक आलेला असतो, त्यात त्या वारतात.
अर्चना तर घरी डायरेक्ट प्रेत आलेलं बघून खूप रडते, आई तुम्ही अशा कशा आम्हाला सोडून गेलात, देवा तू आईना कां नेलंस, माझा आधार गेला असं ओरडून बोलत ती रडतं असते. अर्चनाच्या माहेरचे येतात. तीला धीर देतात.
अर्चना तर घरी डायरेक्ट प्रेत आलेलं बघून खूप रडते, आई तुम्ही अशा कशा आम्हाला सोडून गेलात, देवा तू आईना कां नेलंस, माझा आधार गेला असं ओरडून बोलत ती रडतं असते. अर्चनाच्या माहेरचे येतात. तीला धीर देतात.
बारा दिवस हॉटेल बंद ठेवण्यात येत, पण बारा दिवसांनंतर आईची जागा कोण घेणार म्हणजे हॉटेल मध्ये जेवण कोण करणार हा प्रशन येतो, आणि मग नाईलाजाने अजित अर्चनाला तू हॉटेल मध्ये ये असं लग्नानंतर चार वर्षांनी बोलतो.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - अर्चना हॉटेलमध्ये जाऊ लागल्यावर अर्चना आणि अजित मध्ये सतत वाद होऊन त्याचे परिणाम काय होतात )
