संघर्षाची हार - भाग - 8
( मागच्या भागात आपण बघितले - अर्चनाची सासू मरण पावते आणि मग हॉटेलची जबाबदारी अर्चनावर येते - आता पुढे...)
सासू वारल्यानंतर पंधरा दिवसांनी अर्चना हॉटेलमध्ये जायला लागते. अर्चना जमेल तशी सकाळी हॉटेलमध्ये लागणाऱ्या सामानाची, वाटपाची, तयारी लवकर उठून करत असें, सुमितला पाचवं वर्ष चालू असल्याने त्याला शाळेत - बालवाडीत घातलेलं असतं. त्यामुळे तो शाळेत गेल्यावर अर्चनाला तीन तास निवांत वेळ मिळत असें त्यामुळे ती तेवढ्या वेळात हॉटेलच्या जेवणाची तयारी करत असें.
दोन, तीन दिवसातच अर्चनाच्या लक्षात आलं की अजित तीला हॉटेलच्या किचन मधून बाहेर येऊन देत नसे. कोणी गिऱ्हाईक हॉटेल मध्ये आलं की अर्चनाला तो आत जा असं खूणवत असें. अर्चनाला ह्या गोष्टीचा खूप राग येत असें पण ती काहीच बोलत नसे.
अर्चना हॉटेल मध्ये जायला लागल्याला तीन महिने होतं आले होते आणि एके दिवशी अजितचे लांबचे चुलत काका मरण पावतात त्यामुळे त्याला तिकडे जाणे गरजेचे असते, आणि त्यात त्या दिवशी बुधवार असतो, त्यामुळे मांसाहारी खाणाऱ्याची हॉटेल मध्ये खूप गर्दी असें. अजित नाइलाजाने पूर्ण हॉटेल अर्चनावर सोपवून तिकडे जायला निघतो. अर्चना तिच्या मदतीला तिच्या एका बाजूच्या बाईला बोलावून घेते.
अजित दुपारी एक वाजायच्या दरम्यान तिकडे जायला निघतो. आणि त्याला तिकडून यायला निदान रात्री चे आठ वाजणार असतात. तो अर्चनाला जाताना काळजी घे, हॉटेल आज लवकरच बंद कर नेहमीसारखं नऊ वाजेपर्यंत चालू ठेवू नकोसं....असं सगळं सांगून निघतो. अजित निघून जातो, अर्चना दिवसभर सगळं छान सांभाळते.
आणि नेमकं तिचं घड्याळाकडे लक्ष नसतं, रात्रीचे पावणे नऊ वाजून जातात आणि एक गृहस्थ हॉटेल मध्ये जेवत असतात म्हणून ती म्हणते हे साहेब जेवले की मग सर्व आवरून हॉटेल बंद करेन, आणि तेवढ्यात अजित येतो, हॉटेल अजून चालू आहे बघून हॉटेल मध्ये कोण आहे की नाही तें न पाहता अर्चनावर जोरात ओरडतो, तुला सांगितलं होतं ना आज हॉटेल लवकर बंद कर मग अजून काय करते आहेस इथे अजून...आणि सुमित कुठे आहे असं विचारतो अर्चना बोलतें सुमित शेजारी आहे...
अजित अतिशय चिडला असतो पण हॉटेल मध्ये गोंधळ घालत नाही, पण घरी गेल्यावर अर्चनाबरोबर खूप भांडतो आणि रागाच्या भरात तिच्यावर हात सुद्धा उचलतो. ती फक्त दोनचं वाक्य बोलते, अहो - मी चांगल्या घरातली मुलगी आहे, माझ्यावर तुम्ही संशय कसला घेता - तिच्या ह्या वाक्यावर अजित अजून चिडला आणि त्याने तिच्या दोन कानाखाली मारल्या.
अर्चना रोजच हॉटेल मध्ये जातं असल्यामुळे आता रोजचं घरात अजितच्या ह्या संशयी स्वभावावरून त्या दोघात भांडण होऊ लागली. सुमित पाच वर्षाचा झाल्यावर अर्चना पुन्हा गरोदर राहिली. पण ह्यावेळी हॉटेल मध्ये तिच्यामुळे अडू नये म्हणून अजितने तीला गरोदरपणात माहेरी पाठवलं नाही.
हॉटेल मध्ये तात्पुरता एक कामगार ठेवण्यात आला. पण त्याच्या हातचे जेवण लोकांना जास्त न आवडल्यामुळे धंदा कमी होऊ लागला. अर्चना हॉटेल वर पुन्हा जाऊ लागली, पण अजितच्या संशयी डोक्यात रोज काही ना काही येऊ लागले. अजित त्याचा राग घरी येऊन अर्चनावर काढू लागला. रोजचं घरात भांडण होऊ लागली.
अर्चनाने नऊ महिन्याने मुलाला जन्म दिला ह्यावेळी पण मुलगा झाला. मुलाचं नाव - अशोक ठेवण्यात आलं. डिलिव्हरी झाल्यावर अर्चनाची आई तीला एक महिन्यासाठी माहेरी घेऊन गेली. इकडे अजितने स्वयंपाक करण्यासाठी एक बाई ठेवली. अर्चना एक महिना माहेरी राहुन पुन्हा सासरी आली.
छोटा मुलगा एक वर्षाचा होईपर्यंत अर्चना हॉटेल वर गेली नाही, पण अजित दिवसेंदिवस तिच्याशी भांडू लागला. धंदा नीट होतं नाही, तू हॉटेलवर येत जा असं बोलू लागला. आणि शेवटी छोटा तीन वर्षाचा झाल्यावर ती पुन्हा हॉटेलवर जाऊ लागली.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - असं काय घडलं की ज्यामुळे अजितच्या संशयी वृत्तीने त्याला अक्षरशः वेड केलं..)
