संघर्षाची हार - भाग - 9
( मागच्या भागात आपण बघितले - छोटा मुलगा तीन वर्षांचा झाल्यावर अर्चना पुन्हा हॉटेल वर जायला लागली. आता पुढे...)
अर्चना हॉटेलवर जायला लागली तर होती पण अजितच तीला सर्वांसमोर ओरडणे, सतत तीला घालून पाडून बोलणे सतत चालूच असें. अर्चना तिचं काम अगदी मन लावून करत असें. पण अजित तिच्यात खोट काढत असे. मोठा मुलगा सुमित आता दुसरीला होता आणि छोटा मुलगा अशोक चार वर्षाचा होतं आला होता.
रोज अजित अर्चनावर संशय घेत असें. एखादा हॉटेल मध्ये आलेला पुरुष जरा जास्त वेळ थांबला तरी अजित त्याचं अर्चनाबरोबर चं काहीतरी चालू आहे असं बोलू लागे, तो तीला नको नको ते प्रशन विचारत असें तीला रागाने बोलून हैराण करत असे.
त्याच्या मनात संशयाने घर केलं होतं, तो बाजारात गेला तरी घाईघाईने घरी येत असे. त्याला वाटत असें की अर्चना हॉटेल मध्ये कोणाबरोबर तरी गप्पा मारत बसली असेल तो पुरुष तिच्याशी जवळीक साधत असेल त्यामुळे तो लगेचच परतत असें.
अजित च्या ह्या स्वभावामुळे अर्चना आता सतत चं काळजीत राहू लागली. तीला अजितची एवढी भीती वाटू लागली की ती जेवण करताना सुद्धा चुकू लागली. तिच्या जेवणाच्या चवीत फरक पडू लागला. तिचं जेवण बिघडू लागलं. हॉटेल मध्ये कोणी पुरुष आला की ती घाबरून जात असें. तिच्या मनात येत असें आता अजित नको तो संशय घेईल, घरात तमाशा करेल.
आताशा मुलं सुद्धा अजितच्या स्वभावाला घाबरू लागली. अजित आणि अर्चना ची रोज भांडण होतं असतं. मुलं अजित चा तो रागीट स्वर बघून बिथरत असतं. रडतं असतं. अर्चना चांगल्या कुटुंबातून आलेली मुलगी होती तिच्या माहेरी हे असं कोणी कधीच भांडल नव्हतं.
अर्चनाने आता सहन न होऊन माहेरी हे सर्व सांगायचं ठरवलं. पण अजित हॉटेल ची गैरसोय होईल म्हणून अर्चनाला माहेरी पाठवत नसे. अर्चना आला दिवस रडून घालवत होती. कोणालाचं काही सांगता येईना बोलता येईना तिची कोंडी होऊ लागली.
अजित दिवसेंदिवस अतीच वेगळंचं वागू लागला होता. त्याच्यातला माणूस कुठे हरवून गेला होता. त्याला कशाचीच चिंता नसे, तो शून्यात नजर लावून बसत असें. मध्येच जोरजोरात अर्चना आणि मुलांवर ओरडत असें. हॉटेल मध्ये आलेल्या व्यक्तींवर ओरडत असे. त्यामुळे हॉटेल अगदी बंद पडायच्या मार्गांवर आलं होतं.
अजितचं वागणं काही बदलेना काय करावे असं अर्चनाला झालं होतं आणि एके दिवशी अजितने रागाच्या भरात तिच्यावर कोयता उगारला, आणि तीला मारायला धावू लागला. पण एक शेजारी मध्ये पडले आणि अर्चना वाचली. झाल्या प्रकाराने अर्चना खूप घाबरली होती. तीने त्या शेजार्यांना चं सांगितले की माझ्या बाबांना तार करून बोलावून घ्या. आणि दुसऱ्या दिवशी बाबा आले आणि अजितला बडबडू लागले.
अजित म्हणू लागला माझी चूक झाली मला माफ करा, अर्चनाचे बाबा बोलले अजित अरे तुझं काय हे वागणं असं सोन्यासारखा संसार आहे तुमचा त्याची कां वाट लावतो आहेस. कां अर्चूवर संशय घेत असतोस....
अजित बोलू लागला मला इथे राहायचं नाही आता मला तुम्ही इथून कुठेतरी घेऊन चला मला तुमच्या गावी न्या मी तिथे नोकरी करेन. अजित चं हे बोलणं ऐकून अर्चना अचंबित झाली. ती म्हणू लागली अहो, तुम्हाला समजावण्यासाठी मी बाबांना बोलावलं होतं. तुम्ही त्यांना तुम्हाला त्यांच्या बरोबर कुठे न्यायला सांगताय.
अर्चना बोलू लागली - अहो आपण आपलं घर असताना घर बाबांकडे कां जायचं, पण अजित ऐकेचना, शेवटी अर्चना चे बाबा म्हणू लागले अर्चू तुम्ही सगळे थोडे दिवस आपल्या गावी चला, आपण अजितवर उपचार करू मग थोडे दिवस राहुन तुम्ही या, अर्चू बोलू लागली अहो बाबा दादाची बायको काय बोलेल, बाबा बोलले ते घर माझं आहे चल तू....आपण डॉक्टरबरोबर बोलून उपाय करू.
अर्चना जड अंतकरणाने माहेरी जायला निघाली... मुलांची शाळा थोड्या दिवसांसाठी बुडणार होती, सगळं सोडून अचानक असं माहेरी जाणं तिच्या मनाला पटत नव्हते. तीला असं आपलं भरलेलं घर सोडून निघून जाणं खटकत होतं.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - अजितच्या वागण्यात सुधारणा न झाल्यामुळे त्याचे काय दुष्परिणाम होतात...)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा