संघर्षाची हार - भाग - 10
मागील भागात आपण बघितले - अर्चना चे वडील तिच्या सासरी अजितला समजावण्यासाठी आलेले असताना अजित त्यांना बोलतो मला इथून घेऊन चला तो ऐकत नाही बघून नाईलाजाने अर्चना मुलांना घेवून माहेरी जायला निघते - आता पुढे.
अर्चना अशी अचानक बाबांबरोबर माहेरी आलेली बघून आई घाबरते, वाहिनीचा तर चेहराच उतरतो, बाबा सर्वांना बोलतात अजितची त्यबेत जरा बरी नाही आहे म्हणून त्यांना चांगल्या डॉक्टरकडे दाखवण्यासाठी इथे घेऊन आलेलो आहे. थोडे दिवस हे सर्व इथेच राहतील, दहा - पंधरा दिवस इथे राहुन अर्चना पुन्हा सासरी जाईल. वहिनी बोलू लागली अहो बाबा पण मुलांची शाळा बुडेल ना, बाबा बोलले ते बघू आपण.
आणि मग अर्चना माहेरी राहू लागली अजित तिथे एकदम व्यवस्थित होता, दोन टाईम चांगला जेवत होता हे बघून अर्चनाने दहा दिवसांनी त्याच्या जवळ पुन्हा घरी जाण्याचा विषय काढला तर तो इथे मला बरं वाटतंय अजून राहूया इथे असं बोलू लागला अर्चनाने त्याला खूप समजावले पण तो ऐकेचना ती बोलू लागली अहो मुलांच्या शाळा बुडतायत पण अजित नको मी नाही येणार तिकडे असं करू लागला.
अर्चनाला आपण इकडे माहेरी येऊन खूप मोठी चूक केली हे समजले होते. पण आता काय निर्णय घ्यावा असें तीला झाले होते, हट्टाने अजितला सासरी घेऊन गेले आणि त्याने रागाच्या भारत त्या दिवशी सारखा तिच्यावर कोयता उगारला तर आपल्या पाठी मुलांचं काय होणार ह्या विचाराने ती त्रस्त होती.
अर्चनाने पंधरा दिवसांनी वहिनीला दादाजवळ बोलताना ऐकलं की अर्चू ताई सासरी का जात नाही आहेत इथे अजून किती दिवस राहणार आहेत. तिच्या जीवाला ते वाक्य लागलं ती बाबांना बोलली बाबा मला घरी जायचं आहे पण अजित ऐकत नाही आहेत काय करूया, बाबा पण बोलू लागले की आपले डॉक्टर पण हेच बोलतायत की ते बरे आहेत काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांचं संशयी मन त्यांना सतत खात असतं, त्यांची बायको बाहेर गेली की त्यांना वाटतं कोणाबरोबर तरी गप्पा मारत उभी असेल त्यांना मानसिक आजार झाला आहे.
अर्चनाने पंधरा दिवसांनी वहिनीला दादाजवळ बोलताना ऐकलं की अर्चू ताई सासरी का जात नाही आहेत इथे अजून किती दिवस राहणार आहेत. तिच्या जीवाला ते वाक्य लागलं ती बाबांना बोलली बाबा मला घरी जायचं आहे पण अजित ऐकत नाही आहेत काय करूया, बाबा पण बोलू लागले की आपले डॉक्टर पण हेच बोलतायत की ते बरे आहेत काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांचं संशयी मन त्यांना सतत खात असतं, त्यांची बायको बाहेर गेली की त्यांना वाटतं कोणाबरोबर तरी गप्पा मारत उभी असेल त्यांना मानसिक आजार झाला आहे.
एक महिना होतं आलेला असतो अजित घरी जायचं बोलत नाही बघून अर्चना बाबांना बोलते आपण असं केलं तर मुलांना इकडे शाळेत घालूया का हे वर्ष आणि मला कुठेतरी साधीशी भाडयाने तुम्ही रूम घेऊन दया म्हणजे मी अजित आणि मुलं तिथे शिफ्ट होऊ वहिनीला त्रास नको मग. आणि मला आमचं हॉटेल असल्यामुळे चांगला स्वयंपाक करता येतो तर मी एक, दोन घरी स्वयंपाक करण्याची काम करू का.
बाबा तिचं वाक्य ऐकून अवाक होऊन बोलले अगं अर्चू मी सांभाळेन तुम्हा सगळ्यांना तू लगेचं असं कामं करण्याची तयारी नको करुस बघ, अर्चू म्हणाली अजितला ही आपण इथे छोटी, मोठी नोकरी बघूया का, बाबा आधीच एक महिना झाला मुलांची शाळा बुडाली आहे अजून वेळ का घालवूया मग, बाबा नाराज होते पण अजितला आईच्या घरातून काढण्यासाठी अर्चनाला तेव्हा हा चं मार्ग दिसला.
आणि मग आठ दिवसांनी अर्चना अजित आणि मुलांसह जवळच एका भाड्याच्या घरात शिफ्ट झाली आई - बाबांना खूप वाईट वाटले पण वहिनीचं ही बरोबर होतं म्हणा अजित नुसते दिवसभर बसून असतात काही काम करत नाहीत निदान वेगळे राहिले तर जबाबदारी तरी घेतील.
अर्चना गावातल्याच दोन बंगल्यात स्वयंपाक करण्यासाठी जाऊ लागली, अजितला हे पसंत नव्हते पण अर्चनापुढे घर चालवण्यासाठी दुसरा पर्याय चं नव्हता. अजित तीला नको जाऊ अशी रोजचं गळ घालू लागला. तिच्यावर संशय घेऊ लागला, ती किती वाजता जाते किती वाजता येते ह्याकडे सतत लक्ष ठेवू लागला, एखाद्या ठिकाणी जरा जेवण करायला उशीर झाला तरी आता अर्चनाला अजितची भीती वाटू लागली.
अजित सुधारेल असं तीला वाटलं होतं, पण झालं उलटंच अजित तिच्या कामावर जायच्या वेळेला नाटकं करू लागला मला चक्कर येतेय, कसं तरीच होतंय असं बडबडू लागे. तरीही ती जात असें कारण अजित नाटकं करतोय हे तीला समजत होते. मुलांना शाळेत पोचवून ती स्वयंपाक करायला जात असें, तिच्या बाबांनी एका दुकानात अजितला कामासाठी ठेवलं पण अजित दोन दिवस गेला आणि पुन्हा मला बरं वाटतं नाही सांगून घरीच राहू लागला.
दिवसेंदिवस अजित तीला मारू लागला, तीला जरा उशीर झाला की गोंधळ घालू लागला. कोणाबरोबर फिरत होतीस सांग असं निसंध बडबड करू लागला. तिचे नोकरीतले उरलेले डब्यातले पैसे चोरून दारु पिऊ लागला. तिच्या नोकरीच्या ठिकाणी गुपचूप जाऊन तिच्यावर पाळत ठेवू लागला. मुलं अजितला अतिशय घाबरू लागली. अजितच व्यसन वाढू लागलं. अर्चनाला तो सतत मारहाण करू लागला, दारू पिऊन रोज इथे तिथे पडू लागला.
ह्या सगळ्या अशा अजितच्या वागण्याने अजितला शेवटी एवढं वेड केलं की तो अक्षरशः अंगावरचे कपडे काढून फेकू लागला.
पुढच्या भागात आपण बघणार आहोत की अजितच्या ह्या वेडानेच एक दिवस त्याचा जीव कसा घेतला ते..
