संघर्षाची हार - भाग - 11
( मागच्या भागात आपण बघितले की अजित अक्षरशः वेडा झाला होता - आता पुढे )
अर्चनाला भाड्याच्या घरात राहुन तीन वर्ष होतं आलेली असतात. अजित काहीच काम करत नव्हता, तिच्या मिळणाऱ्या पैश्यातूनच घर चालत असतं, अजित नुसता दिवस दिवस वेड्यासारखं बडबडत असें. अजितच वागणं एवढं वाढलं होतं की गावातली मुलं त्याला वेडा बाबा बोलू लागली होती.
अजित काहीही बडबडत असें, दरवाजावरून एखादा फेरीवाला गेला तरी त्याला ये जा तू ती घरी नाही आहे असं ओरडून शिव्या घालून बोलत असें, त्याच व्यसन प्रचंड वाढलं होतं. कोणालाही काहीही वेड्यासारखं सांगत असें, दारू पिऊन अर्चनावर नको नको ते आरोप करत असें.
अर्चनाला काय करू असं झालं होतं, अजित दारू पिऊन गावात कुठे कुठे पडून राहू लागला, त्याला घरी येण्याची देखील बुद्धी होतं नसे, रोज कोण ना कोणतरी अजित इथे पडला आहे तिथे पडला आहे असं घरी येऊन सांगत असें आणि मग अर्चना आणि मुलं त्याला घरी घेऊन येत असतं.
अर्चनाच्या माहेरच्यांनी त्याला खूप वेळा समजावून सांगितले पण दोन दिवसांनी अजित पुन्हा तसंच वागे, आणि एकदा अजित एक पूर्ण दिवस घरीचं आला नाही आता मात्र अर्चनाला काळजी वाटू लागली. तीने माहेरी जाऊन दादाला सांगितलं आणि मग बाबा आणि दादा त्याला शोधायला निघाले.
आणि मग दुसऱ्या दिवशी अजित एका नदीच्या काठावर मरण पावलेला दिसला. दारूच्या नशेत तो नदीत पडून मेला होता, पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीला पाणी भरपूर होते त्यामुळे तो त्यात वाहवत जाऊन त्याचा जीव गेला होता.
बाबा आणि दादाला त्याचं प्रेत घेऊन आलेलं बघून अर्चनाने हंबरडा फोडला. अजित ची बॉडी पाण्यात राहुन फुगली होती त्यामुळे सर्व गावकर्यांनी त्याचं प्रेत जास्त वेळ न ठेवता त्याचे दोन तासात क्रिया कर्म केले. अजितचं प्रेत घरातून नेण्यात येत. अर्चनाची आई बारा दिवस तिच्याकडे राहुन मग आपल्या घरी जाते.
अर्चना पंधरा दिवसांनी कामावर जायला सुरवात करते. आणि मग आता अजित नसल्याने कामावर उशीर झाला तरी चालणार होते म्हणून ती अजून दोन - चार घरची धुणी - भांडी ची पण काम करायला घेते. मोठा मुलगा आता पाचवीला होता आणि छोटा मुलगा दुसरीला होता, अर्चना मुलांची तयारी करून त्यांना शाळेत सोडून कामाला जात असें.
मुलं शाळेत शिकत असतात. छोटा मुलगा अभ्यासात खूप ढ होता आणि त्याचे लक्ष अभ्यासात खूप कमी आहे हे अर्चनाच्या लक्षात आले, मोठा मुलगा अतिशय शांत असा होता. कधीच कोणाला उलटून बोलणं नाही की मोठ्या आवाजात बोलणं नाही असं त्याचं वागणं होतं.
मुलं शिकत होती मोठा मुलगा दहावी झाला. आणि त्याने आई मी तुला हातभार लागावा म्हणून कुठेतरी साधीशी नोकरी करतो असें अर्चनाला सांगितले आणि तो एका छोट्याशा कंपनीमध्ये हेल्पर म्हणून कामाला जाऊ लागला. पण छोटा मुलगा बाद निघाला मित्रांच्या संगतीने बिघडू लागला. शाळा बुडवू लागला.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - अर्चनाचा छोटा मुलगा संगतीने बिघडल्यामुळे त्याचे काय परिणाम होतात ते )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा