Login

संघर्षाची हार - भाग - 12

sangharshachi haar
संघर्षाची हार - भाग - 12


( मागच्या भागात आपण बघितले - अर्चनाचा छोटा मुलगा अशोक वाईट मुलांच्या संगतीला लागतो आणि बिघडतो - आता पुढे )


अशोक शाळेत न जाता मुलांबरोबर इकडे फिर, तिकडे फिर, कधी टेकडीवर जाऊन बस, कधी कुणाच्या शेतात मुलांबरोबर गप्पा मारत, क्रिकेट खेळत बस, असें त्याचे नको ते उदयोग चालू झाले होते. त्यात त्या मुलांच्या चार - पाच जणांच्या ग्रुप मधला एक मुलगा चांगलाच श्रीमंत होता तो ह्या सर्वांना खायला घरून पैसे आणत असें त्या पैश्यानी ही मुलं तंबाखू, गुटखा खात असतं. त्या मुलाच्या बाईक वरून गावभर ही सगळी मुलं फिरत राहत असतं.


अशोक दहावीला होता पण त्याला अभ्यासाची काहीच काळजी नव्हती. अर्चना खुपचं चिंतीत होती, तीला वाटतं होते की दादाला सांगून अशोकला ओरडायला सांगावे पण वाहिनीच्या दबावामुळे तिचा दादा अर्चूच्या घरात जास्त लक्ष घालत नसे. बाबा रिटायर झाले होते. वहिनी तर ही माहेरी येऊन राहणार नाही ना ह्या भीतीने अर्चूबरोबर जास्त बोलतचं नसे.


अशोक चे चाल - चलन नीट नाही बघून अचानक घरमालकांनी अर्चनाला रूम खाली करायला सांगितली, कारण काय तर ह्याच्या संगतीने माझा मुलगा पण बिघडेल असं घरमालकीण म्हणाली, अर्चनावर अजून एक मोठे संकट कोसळले, पण मोठा मुलगा म्हणाला आई तू काळजी करू नकोसं मी माझ्या कंपनीमध्ये कोणाला तरी विचारून बघतो, जवळपास कमी भाडं असलेली कुठे रूम मिळते का ते, आणि मग आठ दिवसांत एक छोटीशी सिंगल रूम भाड्याने मिळाली आणि मग अर्चना मुलांसह तिकडे रहायला गेली.


अशोक अभ्यासच करत नसे, दहावीची परीक्षा जवळ आली होती तरीही तो लक्ष देत नसे, एक महिन्यांनी दहावीची परीक्षा झाली. आणि मग निकाल लागला, अशोक तीन विषयात नापास झाला होता. अर्चूच्या माहेरचे सगळे बोलले हा अभ्यासच कुठे करत होता, पण अर्चूला घरी राहुन त्याच्यावर लक्ष देणे शक्य नव्हते.



अर्चना खूप रडली, नशिबाला दोष देत अजून रडू लागली. पण अशोकला त्याचे काय नव्हते तो त्याच्या मित्रांबरोबर फिरत होता. एवढ्या मोठ्या मुलाला मारू तरी कसं असं अर्चूला होतं असें, पण अशोक वाईट संगतीला गेला त्यात तिचा बिचारीचा तरी काय दोष होता. ती बिचारी चार घरची काम करून आपला संसार रेटत होती.


अशोक नापास झाल्यावर अर्चू त्याला बोलली आता सरळ नोकरी कर कुठेतरी नाहीतर आता अजून किती दिवस मित्रांबरोबर फिरणार आहेस. साधीशी केलीस तरी चालेल, हे मात्र तिचं अशोकने ऐकलं आणि तो एका दुकानात कामाला लागला. पण त्याची मित्रांची संगत काही सुटत नव्हती तो कामावरून सुटला की त्या मित्राबरोबर फिरून मग आरामात घरी येत असें.


आणि असेच एके दिवस अशोक एका मित्राबरोबर फिरायला गेला असताना त्याच्या मित्राने दारूच्या नशेत एका माणसाच्या बाईक ला ठोकलं, अशोक आणि मित्र दोघेही थोडी दारू पियालेले होते. दारूच्या नशेत रात्री आठ वाजता ह्या मुलांनी त्या माणसाला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो माणूस म्हणाला मी पोलीस केस करणार.


अशोक पाठी बसला होता म्हणून त्याला नुसतं खरचटलं होतं आणि त्याच्या मित्राला हाता - पायाला लागलं होतं आणि ह्या मुलांनी ज्या माणसाला ठोकलं होतं त्याला आणि त्याच्या पंधरा वर्षांच्या मुलाला जास्त लागलं होतं.


पोलिस केस झाली अशोक ला आणि त्याच्या मित्राला आठ दिवसासाठी अटक झाली. अर्चूच्या घरी जेव्हा पोलीस हे सांगायला आले तेव्हा ती खुपचं घाबरली. ती पटकन पोलीस स्टेशनला गेली.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - अर्चू - अशोकला ह्या सगळ्यातून कशी सोडवते ते )

0

🎭 Series Post

View all