संघर्षाची हार - भाग - 13
( मागच्या भागात आपण बघितले - अशोकला अटक होते आता पुढे )
अर्चना पोलीस स्टेशनला जाते, अशोक आणि त्याच्या मित्राला अटक झालेली असते. ज्या माणसाला ह्या मुलांच्या गाडीने उडवलेलं असतं त्या माणसाच्या घरचे लोक चौकीत गोंधळ घालत असतात. ते बघून अर्चनाला रडू येत. त्या माणसाचे नातेवाईक जोरजोरात ओरडत असतात. अर्चना तिच्या मोठ्या मुलाला सांगते मामाला बोलावून घेऊन ये.
अशोक जेल मध्ये असतो, अर्चनाचा दादा पोलीस स्टेशनला येतो पण अशोकला सोडवण्यासाठी काहीच तयारी दाखवत नाही. अशोक ला ओरडून निघून जातो. दोन दिवस होतात अशोक लॉक अप मध्ये असतो, अर्चना आला दिवस रडून घालवत होती तीला काय करू सुचत नव्हते.
अर्चना ज्या ठिकाणी काम करत असतें त्या साहेबांना बोलते - साहेब जरा मला अशोकला सोडवायला पैसे द्याल का. ते साहेब म्हणाले आपण करू काहीतरी तू काळजी करू नकोसं, आणि मग अर्चना आणि अशोकच्या मित्राच्या घरच्यांनी कसे बसे पैसे जमवून दहा दिवसांनी त्या दोघांना सोडवले.
ज्या माणसाला ह्या दोन मुलांमुळे लागले होते त्याला ही तो पर्यंत हॉस्पिटल मधून सोडण्यात आले होते अर्चना माफी मागण्यासाठी अशोकला घेऊन त्यांच्या घरी जाते, सुदैवाने मोठी दुखापत झालेली नसते, त्या माणसाच्या हाताला फ्रेकचर झालेले असते, अर्चना रडून बोलते साहेब तुमचे औषध आणि हॉस्पिटल चे पैसे मी हळू हळू का होईना पण देते हा. तो माणूस चांगला असतो तो बोलतो अहो ताई तुम्ही लोकांच्या घरची काम करून तुमचं घर चालवताय मला नको पैसे.
अर्चना त्या भल्या माणसाचे आभार मानून भरल्या डोळ्यांनी बाहेर पडते. अर्चना अशोकला घेऊन घरी येतेय तो पर्यंत तिच्या शेजारचे सांगत येतात अगं अर्चना तुझ्या बाबांना ऍडमिट केलंय त्यांना हार्ट अटॅक आला आहे त्यांना सिव्हिल हॉस्पिटल ला नेलंय, अर्चना तशीच पुन्हा धावत हॉस्पिटलला निघते.
हॉस्पिटलच्या दारात पोचताच तिथे तीला खूप गर्दी दिसते, ती घाबरून आत जाते, बाबांनी जीव सोडलेला असतो. आई - वहिनी आत रडत असतात. अर्चना धाय मोकलून रडायला लागते. बाबांना थोड्या वेळात घरी आणण्यात येत. संध्याकाळ होतं आलेली असते आणि अर्चनाची एक आत्या लांबून येणार असते म्हणून मग प्रेत दुसऱ्या दिवशी सकाळी न्यायचं ठरतं.
अर्चू देवाला बोलते, माझा एकुलता एक आधार पण तू हिरावून नेलास. बाबांना सकाळी अग्नी दिला जातो. अर्चू त्या दिवशी संध्याकाळ पर्यंत राहुन पुन्हा आपल्या घरी येते. अर्चना घरी येऊन खूप रडते. माहेरी ती कधीतरीचं जात असें ते पण बाबांना भेटायला, वाहिनीने तर तिच्याशी बोलणं पण कमी केलेलं असतं. आई वहिनी च्या चं मताने वागत असें. त्यामुळे ती जास्त जात नसे.
अर्चना अशोकला बोलते अरे तुझ्या वडिलांनी दारू पिऊन संसाराची वाट लावली, अरे ही दारु तुझ्या आयुष्याची वाट लावेल. आणि तू पण त्या दिवशी मित्रांच्या संगतीने दारू पियाला होतास, अरे त्या मित्रांची संगत सोड बाबा आता तरी भानावर ये... अरे आईच्या कष्टाची जरा तरी जाणं ठेव रे. का मला असा त्रास देतो आहेस. अशोक काहीच बोलला नाही, गप्प बसून होता.
असेच दोन महिने मध्ये निघून जातात आणि अशोक पुन्हा एक दिवस रविवारी भरपूर दारू पिऊन घरी येतो, अर्चनाला काय करू असें होते त्याला त्याचे मित्र घरी आणून सोडतात. अशोक कामावर जात असें आणि येताना पुन्हा मित्रांबरोबर फिरत असें. मोठा मुलगा सुमित साधा असतो पण खुपच अबोल असतो. तो अर्चनाला बोलतो आई तू रडू नकोसं मी बघतो अशोकला.
असेच दिवस जात असतात आणि सहा महिन्यांनी मोठा मुलगा अर्चनाला बोलतो आई माझं कंपनी मधल्या एका मुलीवर प्रेम आहे तिच्या घरचे तिचं दुसरीकडे लग्न लावून देतायत म्हणून आम्ही दोघे पळून जाऊन लग्न करायचं असं म्हणतोय, अर्चना बोलते अरे असं अचानक सांगतो आहेस आपण भाड्याच्या ह्या एवढुश्या खोलीत राहतो. इथे तू लग्न करून त्या मुलीला घेऊन येणार आहेस का. त्यापेक्षा जराशी अजून एक रूम असलेली रूम आपण बघूया आठ दिवसात मग लग्न कर.
सुमित बोलतो आई बरं आपण चार दिवसांत दुसरीकडे शिफ्ट होऊ जास्त वेळ थांबलो तर तिच्या घरचे तिचं लग्न लावून देतील. अर्चना बोलते बरं रूम बघ लवकर दुसरी, दोनच दिवसांत अर्चना दुसरीकडे शिफ्ट होते. आणि मग सुमित देवळात लग्न करून संध्याला घरी घेऊन येतो. अर्चना देवाला बोलते मला मुलगी नाही मी सुनेला मुलीसारखी वागवेन.
( पुढच्या भागात आपण बघणात आहोत - अर्चनाची सून ( संध्या ) तिच्याशी कशी वागते ते )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा