संघर्षाची हार - भाग - 14
( मागच्या भागात आपण बघितले - अर्चनाची सून संध्या लग्न करून घरी येते आता पुढे....)
अर्चना सून यायच्या दोन दिवस आधीपासूनच मनात म्हणत असते की मला मुलगी नाही मी संध्याला अगदी मुलीसारखी वागवेन. तीला सासू म्हणून माझा कसलाच त्रास होणार नाही याची काळजी घेईन. पण देवाच्या मनात काही वेगळेच होते, संध्या अर्चनाला वाटतं होती तशी नव्हती. ती अर्चनाशी जास्त बोलत सुद्धा नसे. तीला अर्चनाचं काम करणं ह्यात कमीपणा वाटतं असे. तीला अर्चना आवडत नव्हती. ती अर्चना बरोबर अगदी मोजकेच कामापुरते बोलत असे.
एकदा संध्या चार दिवसांसाठी माहेरी गेलेली असताना अर्चनाने सुमितला विचारले अरे तुझी बायको माझ्याशी घरात आल्याच्या पहिल्या दिवसापासून अगदी कमी बोलतेय म्हणजे जवळ जवळ मोजकेच बोलतेय, ती का अशी वागतेय, तिचं आणि माझं काही भांडण सुद्धा नाही किंवा मतभेद सुद्धा नाहीत पण ती माझ्याशी बोलत नाही. तिचा कसला राग आहे का माझ्यावर.....
सुमित बोलू लागला..आई असं काही नाही आहे ती जरा अबोल आहे, त्यावर अर्चना बोलली अरे ती तुमच्या रूममध्ये तुझ्याशी चांगली बोलत असते. आणि माझ्याशी आणि अशोकशी नावाला एखादा शब्द बोलली तर बोलली, तीला आम्ही दोघे घरात असलेले आवडत नाहीत बहुतेक. सुमित बोलला आई मी बोलतो तिच्याशी. सुमित रात्री संध्याला बोलला ती हॊ बोलून बोलून गप्प झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित कामावर गेल्यावर संध्या अर्चनाला ओरडून बोलू लागली सासूबाई तुम्ही काय कान भरलेत ह्यांचे हे मला ओरडत होते. अर्चना बोलली अगं मी जास्त काहीच बोलली नाही. मी तुमच्या लग्नाला चार महिने झाले तरी तू माझ्याशी पाहिजे तशी बोलत नाहीस किंवा मला आई असं बोलत नाहीस काही काम असेल तर ओ एवढं चिरून दया एवढंच बोलून निघून जातेस. बरं त्या दिराशी पण नीट बोलत नाहीस. तो संध्याकाळी कामावरून आला की कधीच निदान भाओजीं चहा देऊ का असं ही विचारत नाहीस. तू फक्त सुमित कामावरून आला की त्याच्याबरोबरच बोलतेस असं का वागतेस एवढंच मी सुमितला विचारले.
चार महिन्यात मी तुला एकदाही ओरडलेले नाही आहे. तू का अशी वागते आहेस तेच मला कळतं नव्हते तुला विचारले असते पण तू जास्त बोलतच नाहीस म्हणून मग सुमितला विचारलं मी. संध्या थोडा वेळ गप्प बसली आणि बोलू लागली - भाओजीं दारू पिऊन येतात ते मला आवडत नाही. अर्चना म्हणाली अगं पण तो काहीच त्रास देत नाही तो दारू पिऊन आला की जेवतो आणि झोपतो. संध्या बोलू लागली मला दारू पिणारी माणसं चं आवडत नाहीत.
अर्चना बोलली बरं मग मी काय केलंय माझ्याशी पण तू नीट बोलत नाहीस. तू सुमितला सुट्टी असली की संध्याकाळी त्याच्या बरोबर बाहेर जातेस तेव्हा सुद्धा कधी जाताना सांगून जात नाहीस. रूम मधून तयारी करून येतेस आणि सरळ निघून जातेस. तुला माझ्याशी बोलायला काय प्रॉब्लेम आहे. तुला नुसता नवरा हवा का, त्याच्या घरची माणसं तुझी कोणी लागत नाहीत का. आम्ही दोघे तुझे कोणी नाही का.
संध्या गप्प बसून होती. तेवढ्यात सुमित कामावरून आला आणि त्याला बघून संध्या ने जोरजोरात रडायला सुरवात केली, अर्चनाला समजेचना की हिला अचानक काय झाले, ती संध्याकडे बघतच राहिली. संध्या सुमितला बघून सांगू लागली आई मी तुमच्या बाहेर जाते त्या वरून मला ओरडत होत्या. अर्चना बोलली अगं संध्या काहीही काय सांगतेस मी कुठे काय बोलली, सुमित संध्याची बाजू घेऊन बोलू लागला आई काय बोललीस तू ही एवढी उगाचच रडतेय का मग.
संध्या सुमित बरोबर त्यांच्या रूममध्ये निघून गेली. आणि मग अजून रडून काय काय सांगू लागली. दुसऱ्या दिवसापासून सुमित अर्चनाशी कमी बोलू लागला. संध्या पक्की शहाणी आहे हे एव्हाना अर्चना च्या लक्षात आले. पण सुमित संध्याच्या बाजूने होता म्हणून अर्चना काही बोलू शकली नाही.
संध्या आणि सुमित च्या लग्नाला सहा महिने झाले आणि संध्या गरोदर राहिली. सुमितने ही बातमी सांगितल्यावर संध्याला खूप आनंद झाला. आणि तीने मनोमन ठरवले आता एक एक पैसा जमवून छोटंसं का होईना पण स्वतःच घर बांधायचं, माझ्या नातवंडांना मी भाड्याच्या खोलीत जास्त वेळ राहुन देणार नाही. संध्याच्या वागणुकीत काहीच फरक नव्हता. ती आणि तिचा रूम एवढंच तिचं असे.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - भविष्यात संध्या ची वागणूक कशी असते ते )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा