संघर्षाची हार - भाग - 15
( मागच्या भागात आपण बघितले - अर्चना मनातल्या मनात बोलते संध्याला मुल होणार आहे आता भविष्यासाठी काहीतरी तरतूद करायला हवी - आता पुढे )
संध्या सातव्या महिन्यात ओटभरण करून माहेरी गेली. इकडे अर्चनाने अजून दोन जास्तीची स्वयंपाकाची काम चालू केली. कारण तीला छोटंसं का होईना पण आपल्या नातवंडासाठी एक घरकुल उभरायचं होतं आणि त्यासाठी तीने प्रयत्न चालू केले. पण घर बांधण एवढं सोप्प नव्हतं. जागा घेऊन तिथे घर बांधण कठीण होतं.
संध्याने नऊ महिन्यांनी बाळाला जन्म दिला. मुलगा झाला, सगळे खूप खुश झाले. संध्या माहेरी तीन महिने राहुन पुन्हा सासरी आली. संध्याच्या वागणुकीत जरासा ही फरक पडला नव्हता. उलटं ती अजूनच वाईट वागू लागली होती. सकाळी तिच्या रूममधून नऊ वाजल्याशिवाय ती बाहेर येत नसे, सकाळी साधा चहा सुद्धा करत नसे.
सुमित कामावर उशिरा जात असे त्यामुळे ती सकाळी उशिरा उठत असे. बाळ झोपलेलं असलं तरी घरात ती काहीच काम करायला बघत नसे. अर्चना उगाच घरात क्लेश नको म्हणून तिच्याशी बोलणे टाळत असे. संध्या दिवसभर तिच्या रूममध्ये मोबाईल बघत बसत असे. अर्चना जेवण आणि काम स्वतः चं करत असे.
असेचं दिवस जात होते, संध्या तिचं बाळ आणि ती आणि तिचा नवरा असं वागत असे, तिच्या दृष्टीने सासू आणि दीर घरात असणारी अडचण होती. आताशा सुमित पण अर्चना बरोबर खूप कमी बोलत असे. संध्या आणि सुमित कुठे बाहेर निघाले की मात्र अर्चनाकडे बाळाला ठेवून दोघे फिरायला जात असतं. संध्या तर कुठे बाहेर जाताना आपल्या रूम मधून तयारी करून येत असे आणि अर्चना कडे न बघता सरळ बाहेर पडून जात असे.
असेच दिवस जात होते. अर्चना घर बांधण्यासाठी पै पै जमवत होती. पण जागा कोण देणार होतं तीला, तिच्या एका जोडीवालीने तीला सुचवलं की तुझ्या दादाला सांगून बघ की बाबांच्या जमिनी मधला एखादा तुकडा तुला दे त्या जागेवर तू घर बांध.. मुलीचा ही हिस्सा असतोच की बापाच्या घरात असं ती मैत्रीण बोलली आणि ते अर्चनाला सुद्धा पटले आणि तीने दोन दिवसांनी माहेरी जाऊन दादाला म्हंटल दादा मला आपली घराजवळ एवढी जमीन आहे तर त्यातली थोडीशी जमीन मला देशील का त्यात मी छोटंसं कौलारू घर बांधेन...
अर्चना ने हे वाक्य बोलताच वहिनी आतून ओरडतच आली काय बोलताय वन्स तुम्ही, घराजवळ कुठेही घर बांधायचं नाही. माझी परवानगी नाही, अर्चना म्हणाली अगं पण का... वहिनी म्हणाली तुमच्या अशोक चं वागणं बरोबर नाही आहे त्याच्यामुळे माझी मुलं बिघडायला नकोत. वहिनी चिडून चिडून नकोच असं खूप वेळ बोलत राहिली.
थोड्या वेळाने अर्चनाचे बाबा बोलले बरं असं करूया आपल्या शेताजवळ ची जमीन आहे ना तिथली तुला चालेल का अर्चू....अर्चना म्हणाली बाबा कुठलीही चालेल मला अजून माझ्या मुलांना भाड्याच्या घरात नाही ठेवायचं आहे. माझं स्वतःच घर छोटंसं का होईना पण बांधायचं आहे. वहिनी कुरकुरतचं होती. पण आई - बाबा दोघेही बोलले अर्चू तू तिथे काम चालू कर आम्ही आहोत तुझ्या पाठीशी.
अर्चनाने दुसऱ्या दिवशी हे घरी सुमित आणि संध्याला सांगितले आणि बोलली मी बचत गटातून थोडं कर्ज काढते आणि थोडे मी पैसे साठवलेत आणि सुमित तू थोडंसं बँकेतून कर्ज काढ आपण एक छोटंसं घर बांधू. सुमित हो चालेल बोलला. आणि मग दोन महिन्यांनी त्या जागेवर दोन रूम, हॉल, किचन असलेलं एक घर बांधायला अर्चनाने कॉन्ट्रॅक्ट दिलं.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - सुमित ने कर्ज काढून दिल्यामुळे संध्या सुमितच्याच नावाने सगळ्यांना मोठेपणा करून काय काय सांगते ते )
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा