संघर्षाची हार - भाग - 16
( मागच्या भागात आपण बघितले - अर्चना बचतगटातून थोडं कर्ज काढून आणि सुमितबरोबर बोलून घर बांधायला घेते आता पुढे - )
चार दिवसांनी चांगला मुहूर्त बघून भूमिपूजन केले जाते. आणि तिथे घर बांधायला सुरवात केली जाते. सहा महिन्यात घर बांधून पूर्ण होतं. अर्चना तिची सगळी जमा - पुंजी बांधकामासाठी वापरते. बचत गटातून थोडे पैसे काढते सुमित थोडे बँकेतून कर्ज काढून देतो. असं सर्व पैसे वापरून एकदाच अर्चनाचं घरकुल उभं राहत. अर्चना खूप खुश होते.
घरात गृहप्रवेश केला जातो. संध्या पण सुरवातीला बरी वागत असते, पण कोण घर बघायला आलं की सुमितच चं कौतुक सांगत असे, कसं त्याने कर्ज काढून पण घर बांधलं चं असं सांगत असे, खरंतर अर्चनाने घर बांधायचा निर्णय घेतला होता. आणि तिच्या जिद्दीमुळेच हे घर उभं राहिलं होतं.
घर बांधल्यानंतर चार महिन्यांनीच संध्या पुन्हा गरोदर राहते. ह्यावेळी दुसरी डिलिव्हरी असल्यामुळे ती सासरीच करायची असते. अर्चना बोलते आताच एवढा खर्च झाला आहे त्यात हा खर्च, पण ती म्हणते, चला असूदेत, कदाचित देवाच्या मनात हेच असेल. नऊ महिन्यांनी संध्या मुलीला जन्म देते. अर्चना बारसं तिच्या नवीन घरी करते.
संध्याच्या माहेरची परिस्थिती तशी गरीबच असते. त्यामुळे अर्चना तीला म्हणते तुझ्या घरी वडील एकटेच कमावणारे आहेत, आई आणि छोटी बहीण थोडीफार शेती करतात. त्यामुळे तू माहेरी रहायला जाऊ नकोसं, आपण करू बाळाचं सगळं. मी माझ्या कामावरून जरा पटकन आवरून लवकर येत जाईन आणि बाळाला अंघोळ, मालिश मी करेन. सुमित आई हो चालेल असं चं करू असं बोलतो.
संध्या जराशी बरी वागत असते कारण ती ओली बाळणतीन असल्यामुळे अर्चना सगळं काम करत असे. संध्याला काहीच काम नसे, संध्या फक्त आराम करत असे. बाळ सहा महिन्याचं झाल्यावर संध्या घरातली कामं करू लागली. संध्या हळू हळू दिवसेंदिवस अर्चनाच्या अंगावर ओरडून बोलू लागली. अर्चनाचा स्वभाव शांत होता त्यामुळे तीला कोणी ओरडलेलं, भांडलेलं सहन होतं नसे. तिच्या डोळ्यात पटकन पाणी येत असे.
संध्या मी तुमचे आणि भाओजींचे कपडे धुणार नाही, तुमची भांडी तुम्हीच घासा, माझ्यावर कामं पडतात, मी एकटीच घरी असते म्हणून तुम्ही मला राबवून घेता असं बोलत असे. मी चं का करायची कामं, असं काही बाही कारण काढून ती अर्चनाला रोज उलटं - सुलट बोलत असे. बरं अर्चना सुमितला काही सांगायला गेली की तो संध्याची चं बाजू घेऊन बोलत राही.
भाओजीं दारू पियायचं सोडत नाहीत त्यात, माझी मुलं मोठी होतायत त्यांना काय वाटत असेल आपला काका सतत नशेत घरी येतो. असं बोलून संध्या अर्चनाला हैराण करत असे. अर्चना म्हणत असे अगं तुझा दीर दारू पितो त्यात माझी काय चूक, मी काय करू आता, ह्या वयात त्याला मारू की ओरडू, की तो बाहेर जाऊन दारू पिऊ नये म्हणून कोंडून ठेवू का.
अर्चना देवाला बोलत असे, का असे दिवस दाखवतो आहेस तू, नवरा दारू पिऊन मेला आता मुलगा पण त्याचं लाईनवर जातो आहे. काय करावं अर्चनाला कळतं नसे. अशोक जास्तच दारूच्या आहारी जात होता, पण त्याला कसं रोकु आणि कसं त्याचं व्यसन थांबवू असा अर्चना रोजचं विचार करत असे. त्यात संध्याची घरात रोजचीच किरकिर असे.
अर्चनाची एक मैत्रीण एके दिवशी तीला बोलते अगं दारू सोडण्याच्या गोळ्या मिळतात त्या अशोकला देऊन बघ ना, अर्चना बोलते हो, चालेल.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - त्या गोळ्यांनी अशोक सुधारतो की त्याचे काय परिणाम होतात. )
