Login

संघर्षाची हार - भाग - 17 ( अंतिम भाग )

sangharshachi haar
संघर्षाची हार - भाग - 17 ( अंतिम भाग )


( मागच्या भागात आपण बघितले - अर्चना जेवणातून अशोकला दारू सोडण्यासाठी गुपचूप गोळ्या देणार आहे - आता पुढे )


अर्चना गोळ्या आणते आणी त्या अशोक च्या जेवणात कुस्करून त्याला ते जेवणं देते. अशोक दारू पियालेला असतो त्यामुळे त्याला जेवणाच्या चवितला फरक फरसा तेव्हा जाणवत नाही. पण अशोक आधीच खूप बारीक असतो त्याचे जेवण फार कमी असते, त्यात तो दारू पीत असतो, जेवणं कमी त्यात गोळ्या जास्त पावरच्या होत्या, आणि त्यावर दारू पिणे ह्या सर्वामुळे अशोकला त्रास होऊ लागला. त्याच्या शरीराला ते झेपनासे झाले.


त्याला सारखी गुंगी येत असे. त्याला अशक्तपणा येऊ लागला. त्यामुळे त्याचे हात - पाय दुखू लागले. त्याला नोकरीवर जाणे सुद्धा जमेनाशे झाले. डॉक्टरकडे नेल्यावर अर्चना त्याला हे कशामुळे होतंय हे अशोक समोर सांगू शकली नाही कारण ती अशोकच्या नकळत त्याच्या जेवणात गोळ्या मिक्स करत होती. शेवटी दहा दिवसांनी अर्चनाने नाईलाजाने त्याच्या गोळ्या बंद केल्या. दारू सोडण्याचा हा प्रयत्न पण फेल गेल्यामुळे अर्चनाला खूप वाईट वाटले.


अशोक दहा दिवस आजारपणामुळे घरी होता. त्या नंतर अजून आठ दिवसांनी कामावर जाऊ लागला. ह्यावेळी मात्र त्याच्या मालकाने त्याला ओरडून सांगितलं की तुझं नेहमीच दारू पिऊन आजारी पडणं चालू असतं, त्यामुळे सुट्टी घेणं असतंच तुझं, दारू झेपत नाही तर पितोस कशाला, ह्यापुढे असं काही मला पुन्हा आढळून आलं तर तुला नोकरीवरून काढून टाकण्यात येईल.


अशोक चं दारू पिणं दिवसेंदिवस चालूच असतं, त्यामुळे सहा महिन्यांनी त्याचे शेठ त्याला कामावरून काढून टाकतात. अशोक आता घरात बसून राहू लागला, त्यामुळे घरात रोजची भांडण होऊ लागली. त्याला कामावरून काढून टाकल्यामुळे त्याच्याजवळ शेवटच्या महिन्याचा पगार हातात होता, तो पगार त्याने पूर्ण दारू साठी घालवला. घरी एकही रुपया दिला नाही.


आणि जसा त्याचा पगार संपला तसा तो घरात रोजचं दारुसाठी पैसे मागू लागला, सगळ्यांना शिव्या देऊ लागला. त्यामुळे अर्चना सुमित, संध्या सगळीच त्याला कंटाळली होती. संध्या सरळ सरळ बोलू लागली, भाओजीं असं रोज घरात तमाशे करण्यापेक्षा कुठेतरी जाऊन तुम्ही जीव दया म्हणजे हा आम्हाला होतं असलेला त्रास पण संपेल. अर्चनाला स्वतः च्या मुलाचे हे दारुमुळे झालेले हाल पाहवत नव्हते पण ती काय करणार होती.


अशोक दारूच्या पूर्ण आहारी गेला होता, रोज आजूबाजूवाल्यांकडे दारू साठी पैसे मागू लागला. कधीतरी कोण तरी पैसे देत असे तो लगेचं दारू पिऊन इकडे तिकडे फिरत राहत असे. त्यामुळे अक्षरशः जो भेटेल तो अर्चनाला अशोक बद्दल सांगू लागला, अशोक अगदी पाया पडून दारू साठी लोकांकडे पैसे मागत असे. त्याला आता दारू पियाल्याशिवाय कसं तरीच होतं असे.


नंतर नंतर तर अशोक वेड्यासारखा रात्र रात्र बडबडत राहत असे. आणि त्यामुळे संध्या, सुमित, त्याची दोन मुलं सगळी रात्र रात्र त्याच्या आवाजाने जागी राहत असतं. अर्चनाला काय करू सुचत नव्हते. अशातच एके दिवशी संध्या आणि सुमित तीला येऊन बोलले की आम्ही ह्या सगळ्याला कंटाळलो आहोत म्हणून चार दिवस जरा चेंज म्हणून बाहेर जाऊन येतो. अर्चना त्यांना नाही बोलू शकली नाही.


दुसऱ्या दिवशी सुमित, संध्या आणि त्यांची दोन मुलं निघून गेली. अर्चनाने अशोकला बसून खूप समजावलं, बाळा असा का करतो आहेस, सगळी कंटाळली आहेत तुला, सुधार ना जरा, अशोक हो बोलून गप्प बसला. आणि ती तिच्या कामाला निघून गेली.


संध्याकाळी ती आल्यावर बघते तर अशोक फुल्ल तराठ होऊन घरी आला होता. खूप दारू पियालेला होता तो, अर्चना अक्षरशः खूप चिडली, रडली आणि तीने त्याला काठीने मारलं. आणि आता तीने हार मानली. घरात संध्या आणि सुमित पण नव्हते अशी वेळ पुन्हा येणार नाही आजच ह्या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लावूया या विचाराने थोड्या वेळाने तीने जेवणं केलं आणि त्यात घरातलं उंदीर मारायचं विष मिसळलं आणि ती आणि अशोक दोघे पण ते जेवले.


अर्चनाने आत्महत्येचा पर्याय निवडला होता. अशोक आणि स्वतः ला तीने विष खाऊन संपवलं होतं. संघर्ष करून शेवटी तीने हार मानली. तिच्या एवढ्या वर्षांच्या संघर्षाची हार झाली होती.