Login

संघर्ष अस्तित्वाचा १४ ( अंतिम )

--------

संघर्ष अस्तित्वाचा १४ ( अंतिम ) @ प्रेरणादायी कथा 

( मागच्या भागात आपण पाहिलं की कावेरी आणि केशव घरी येतात तेव्हा माधुरी घरी आलेली असते. तिला पाहून दोघेही खुश होतात. जेवणानंतर कावेरी आणि केशव सर्व घडलेली घटना माधुरीला सांगतात. माधुरी कोणती मदत लागली तर करायला तयार असल्याचं सांगते. कावेरी गेल्यावर माधुरी केशवाला कावेरीला तुझ्या मनातलं सांगितलं का?  असं विचारते. त्यावर केशव सांगितलं पण अजून तिच्यात मनाची तयारी नसल्याचे सांगतो. पण तिच्या आयुष्यात जे घडलं होत त्यामुळे तिला वेळ द्यावा लागणार होताच. कावेरीने उचलेल्या पावलांमुळे गावागावात आता प्रौढ शिक्षण वर्ग, महिला कौशल्य योजना यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. हॉस्पिटल मध्ये होणारे गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात रोखण्यास मदत झाली होती. यात एक दिवस पोलिसांचा फोन येतो. त्या माणसाला पकडलं गेलं आहे जो बाळाला पुरत होता. दुसऱ्या दिवशी कावेरी आणि केशव पोलीस स्टेशनला जातात. त्या माणसाला समोर आणल्यावर कावेरी स्तब्ध होते. कावेरी पोलिसांना सूचना देवून तिथून निघते. केशव तिला काय झालं असं विचारतो. त्यावर तो माणूस म्हणजे माझा नवरा मोहन असे ती केशवाला सांगते. केशव स्तब्ध होतो. त्यावर कावेरी म्हणते, म्हणून मी होकार सांगितला नाही तुला. भूतकाळ इतक्या सहजासहजी पाठ सोडत नाही. त्यावर केशव तिला समजावतो. तो कधीही, कोणत्याही परिस्थितीत तिची साथ सोडणार नाही. व आता ती त्याला घटस्फोट देवून एक मोकळ आयुष्य जगू शकते. जे कावेरीला पटत. आता पुढे......)

कावेरीला तिच्या ऑफिसला सोडून केशव हॉस्पिटलला निघून जातो. कावेरीच्या डोळ्यासमोर तिचा भूतकाळ पिंगा घालत असतो. मोहनने नक्की कोणाचं बाळ पुरण्याचा प्रयत्न केला होता ?  त्याचं स्वतःच ?  ती विचार करत असते. तेव्हा तिच्या लक्षात येत त्याच्यासाठी एक स्थळ आलं होत श्रीमंत घरातलं म्हणून तिला मारण्याचा कट रचला गेला होता ना. नक्की काय प्रकरण आहे याचा छडा लावायचा असं कावेरी ठरवते. शिवाय आता घटस्फोट घ्यायचा आणि मोकळ आयुष्य जगायचं असं ती ठरवते. 

कावेरी एक नामांकित वकील नेमते आणि सर्व कहाणी ती वकिलाला सांगते. आता चालू असलेलं प्रकरण नक्की काय आहे हे समजून घेऊन मग घटस्फोटसाठी अर्ज करायचा असं कावेरी ठरवते. संध्याकाळी घरी येवून ती माधुरीला सर्व गोष्ट सांगते. माधुरीला कुठेतरी असं वाटत की जे झालं ते चांगलं झालं. एकदा कावेरी जुन्या तकलादू लग्नाच्या बंधनातून मुक्त झाली की तिला दादा सोबत ऑड वाटणार नाही. शिवाय मनात किंतु परंतू सुद्धा उरणार नाही. 

कोर्टात केस उभी राहते आणि सुनावणीला कावेरी हजर असते. सुनावणीदरम्यान कावेरीला कळत की ५ वर्षांपूर्वीच मोहनच लग्न झालंय आणि त्यानंतर एकापाठोपाठ २ मुलीचं जन्मल्या. त्यांना घराण्याला कुलदीप हवा होता. पण मिळत नव्हता. दोन्ही वेळा सासरची लोकं गप्प बसले कारण तिने भरपूर हुंडा आणला होता. पण तिसऱ्यांदा जेव्हा मोहनची बायको गर्भवती राहिली तेव्हा मुलगा की मुलगी हे पहायला ते गेले. पण तोपर्यंत पाणी पुलावरून गेलं होत. डॉक्टरांनी सरळ सांगितलं की बाळाला आता पाडू शकत नाहीतर  आईच्या जीवाला धोका आहे. खरं तर तिच्या जीवाशी यांना काही देणंघेणं नव्हतं पण तिच्या वडिलांकडून मोठा हुंडा घेतला होता आणि तिला काही झालं तर आपलं काही खरं नाही म्हणून त्यांनी बाळाला पडायचा कट रद्द केला. पण बाळाच्या जन्मानंतर २ -३ दिवसाच्या बाळाला मोहन जिवंत पुरायला गेला होता आणि त्याच्या दुर्दैवाने आणि बाळाच्या सुदैवाने त्याला एका माणसाने पाहिलं आणि बाळाचा जीव वाचला. कोर्ट पुढच्या सुनावणीला ऑर्डर पास करणार होतं. 

कावेरीने दुसऱ्या दिवशी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. कावेरी घरी येवून ती केशव आणि माधुरीला हे सांगते. ते दोघेही तिच्या पाठी भक्कम उभे राहणार अशी गवाही देतात. अशी भक्कम साथ पाहून कावेरीला नवीन उभारी मिळते. आता घटस्फोट मिळवण्याच्या या लढाईसाठी ती पुन्हा नव्याने तयार झाली.

सुनावणी दरम्यान सरकारी वकिलाने हा मुदा देखील कोर्टात मांडला की एक बायको जिवंत असताना त्याने केलेलं दुसरं लग्न हा कायद्याने गुन्हा आहे. त्यावर समोरच्या वकिलाने पहिली बायको चोरी करून पळून गेली. त्यामुळे माझ्या अशिलाने दुसरं लग्न केलं. त्यासाठी गावातील लोकांना साक्षीला बोलावं. सरकारी वकिलाने गावकऱ्यांची साक्ष राखून ठेवून कावेरीला साक्ष देण्यासाठी बोलावलं. साक्षीला नक्की काय झालं ते विचारण्यात आलं. त्यावर कावेरीने पूर्वी झालेला सर्व प्रकार कोर्टासमोर मांडला., " शिवाय त्यावेळी माझ्याकडे शिक्षण नव्हतं, आणि हिंमतही नव्हती की पोलिसांकडे जाईन. शिवाय माझ्या बद्दल कळलं तर त्यालोकांनी केस होवू नये म्हणून पुन्हा माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला असता. " 

कावेरीच्या साक्षीनंतर सरकारी वकिलाने पुन्हा आरोपी मोहनला बोलावलं आणि प्रश्न केला, " चला आपण असं मानून चालूया की, कावेरी या तुमच्या पाहिल्या पत्नीने तुमच्या घरात चोरी केली आणि पळ काढला. पण एवढ्या रात्री तुमच्या कसं लक्षात आलं की कावेरी दागिने घेऊन गेली आहे?  बरं ते एक वेळ बाजूला ठेवूया, पण मला सांगा चोरीची तक्रार तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनला केली होती?  

यावर मोहन गप्प झाला. त्याकडे उत्तर नव्हतं. पुढे वकिलाने प्रश्न केला, " पहिली बायको पळून गेली असं मानलं तरी तुम्ही पोलीस तक्रार केली नाही आणि अगदी १५ दिवसातच दुसरं लग्न केलंत?  किमान आधी घटस्फोट साठी प्रयत्न करायचा.  असो,  कायद्याने पहिली बायको हरवली किंवा तिचा कोणताही संपर्क नसेल तर किमान ७ वर्ष दुसरं लग्न करता येत  नाही. त्यात तुम्ही १५ दिवसात लग्न केलंत. आधी काहीही न ठरवता १५ दिवसात मुलगी बघून, लग्नाची बोलणी करून, साखरपुडा, हळद, आणि लग्न केलं?  पहिली बायको जर वाईट निघाली तर दुसऱ्यांदा लग्न करण्यापूर्वी किमान ४ वेळा मुलीची विचारपूस आणि माहिती काढली जायला हवी होती. आणि तुम्ही १५ दिवसात लग्न केलं. कोणाला पटण्यासारखं आहे का ? "

मोहन खाली मान घालून उभा असतो. 

त्यानंतर सरकार वकील गावकर्यांना बोलवतात आणि प्रश्न करतात, " सरपंच, मला सांगा त्यादिवशी कावेरीला कोणी पैसे घेवून जाताना पाहिलं होतं का?  मोहन आणि त्याच्या घरच्याना सोडून? " सरपंचानी नकारार्थी मान हलवली. पुढे वकील विचारतात, " मग तुम्ही पोलिसात तक्रार का केली नाहीत?  " 

सरपंच, " कारण मोहन आणि त्याच्या घरच्यांनी जाऊ द्या. आपल्याच माणसा विरुद्ध काय तक्रार करायची असं म्हणाले. आणि जर त्यांनाच तक्रार करायची नव्हती तर आम्ही का करणार ?  " 

वकील, " बरं त्याआधी कावेरीला यांनी घराबाहेर काढलं होतं ही गोष्ट खरी आहे का ? " 

सरपंच, " हो,  खरं आहे. मी आणि बाकी पंचानी मध्यस्थी करून घरी परत पाठवलं होतं. "

वकील, " त्याशिवाय मोहनने अगदी १५ दिवसात लग्न केलं. ते तुम्हाला कोणालाच आश्चर्यकारक वाटलं नाही?  आणि कावेरीविरुद्ध त्यांनी सांगितलं त्यावर विश्वासही ठेवलात. तुम्हाला असं नाही वाटलं की त्या मुलीला आधीच ही लोकं घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर रात्री येवून तुम्हाला सांगतात की कावेरी चोरी करून पळून गेली. पोलिसात तक्रार करायला नकार देतात आणि १५ दिवसात लग्नही उरकतात. तरी तुम्ही येथे येऊन हे सांगताय की कावेरी चोरी करून पळून गेली ?  कोणी पाहिलं नाही पण कोणतरी सांगितलं म्हणून ?  बरोबर ना ?  " 

सरपंच, " साहेब,  ही गोष्ट खरंच लक्षात आली नाही आमच्या. आणि खरं तर आमच्यापैकी कोणीच तिला पळून जाताना किंवा दागिने चोरताना वगैरे पाहिलं नाहीये. मोहन आणि त्यांच्या घरच्यांनी जे आम्हाला सांगितलं आम्ही ते सांगितलं फक्त. " 

वकील पुढे बोलतात आता आपण येऊया मूळ मुद्यावर, " मिलॉर्ड, पोलिसांनी केलेल्या तपासात काही गोष्टी समोर आल्या आहेत त्या मी कोर्टासमोर सदर करतो,  मोहनने हुंड्याच्या मोहाची कावेरीला मारण्याचा प्रयत्न केला पण कावेरी त्याच्या हातातून निसटून गेली. त्यानंतर मोहनने गावासमोर बनाव केला की कावेरी घरातील दागिने घेवून पळून गेली. गावकर्यांनी त्यावर विश्वास ठेवला. आणि मोहनने आधीच पाहिलेल्या श्रीमंत स्थळी १५ दिवसात लग्न केलं. विचारांचं मागासलेपण असलेल्या घरात पाहिल्या दोन मुली झाल्या कारण भरपूर हुंडा मिळाला होता आणि काही करायचं म्हटलं तर मुलीचे वडील श्रीमंत असल्यामुळे आपल्याला नंतर त्रास होईल म्हणून फक्त गप्प बसले. पण तिसऱ्यांदा मात्र काहीही करून मुलगा हवा होता, कुलदीपक हवा होता. त्यासाठी गर्भनिदान ही करण्यात आले, मुलगीच होती. पण आईच्या जीवाला धोका असल्यामुळे पडलं नाही कारण पुन्हा तेच मुलीचे वडील श्रीमंत.  मुलीला काही झालं तर आपलं खरं नाही. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर बाळाला पुरण्याचा कट केला. पण बाळाच्या सुदैवाने तिथून जाणाऱ्या एका इसमाच्या ही बाब लक्षात आली. आणि यांचा कट उधळला गेला.  ही आहे त्या क्लिनिकची रिपोर्ट जिथे गर्भनिदान केलं गेलं होतं. कावेरी मॅडमच्या रचलेल्या सापळ्यात हे क्लिनिक ही सापडलं. त्यामुळे हा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला." 

समोरच्या वकिलाने प्रति प्रश्न केला, " पण बाळाला पुरणारा व्यक्ती माझा अशील आहे कश्यावरुन? " 

सरकारी वकील, " हायवे च्या CCTV फुटेज च्या सहाय्याने आरोपीला पकडण्यात आलं आहे. शिवाय त्यांची दुसरी पत्नी गरोदर होती. त्यांच्याकडे बाळ नाही. बाळाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. आणि तरीही काही शंका असेल तर आपण DNA  टेस्ट ही करू शकतो. " 

मोहन आणि त्याच्या घरच्या लोकांच्या लक्षात आलं की आपला खेळ आता संपला आहे. सर्व साक्षी - पुरावे मोहन आणि त्याच्या घरच्यांच्या विरोधात होते. त्याच्या पुढे पर्याय नव्हता. मोहनने त्याचा गुन्हा कोर्टात कबूल केला. मोहनला आणि त्याच्या घरच्या माणसांना न्यायालय शिक्षा सुनावतं. कावेरीला घटस्फोटही मिळतो. मोहनाकडे घटस्फोट देण्याशिवाय पर्यायही नसतो. मोहन, त्याचे आई - वडील यांना शिक्षा होते तर कावेरीच्या नणंदला ही तिच्या सासरहून घटस्फोटची नोटीस येते. ( घरातून मिळालेल्या संस्कारामुळे तिचा स्वतःचा संसार तुटला होता.) 

आज ती कोर्टात एकटी आली होती. केशवला emergency   मुळे येता आलं नव्हतं तर माधुरीलाही काम होतं. न्यायालयाने दिलेला निर्णय ऐकून कावेरी क्षणात स्वतःला मुक्त जाणवत होती. आज आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण होता. कावेरी स्वतःला नवी भासू लागते. तिला कधी जावून केशव आणि माधुरीला निर्णय सांगते असं होतं. 

कावेरी लगबगीने घरात येते, तिला घरातलं वातावरण पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. समोर माधुरी आरतीचं ताट घेवून  तर तिच्या मागे केशव गुलाबांच्या गुच्छ घेवून हसत मुखाने स्वागताला उभा असतो. माधुरी कावेरीला ओवाळून तिला शुभेच्छा देते म्हणते, " आज आयुष्यतील अजून एक महत्वाची लढाई तू जिंकलीस. " 

कावेरी, " पण तुम्हाला कसं कळलं निकाल आपल्या बाजूने लागला ते? " 

केशव, " मॅडम, एवढी मोठी बातमी पोहचणारच ना. "

केशवबद्दल नेहमीच एक प्रेमाचा हळवा कोपरा कावेरीच्या मनात होता, पण एक अनामिक भीती होती त्यामुळे ती त्याच्यासमोर आपल्या प्रेमाबद्दल बोलत नव्हती. पण केशवने तिला दिलेली साथ, ज्याचं प्रेम यामुळे कावेरी विरघळून गेली होती. आतापर्यंत तिने स्त्रियांना पुरुषांचं औक्षण करताना पाहिलं होतं पण आज माधुरी बरोबर केशवही तिचं औक्षण करतो आणि माधुरीला जाणीव होते की लग्न म्हणजे संसाराचे दोन चाक दोन्ही सामान असतात आणि हिच समानता मला केशवकडून मिळेल. कावेरीच्या डोळ्यातून आज पहिल्यांदा आनंदाश्रू असतात. 

रात्री जेवण झाल्यावर Ice-cream  चा बेत ठरतो. माधुरी Ice-cream आणायला म्हणून खाली जाते. कावेरी केशव जवळ जाते आणि म्हणते, " तुम्ही आणि माधुरी प्रत्येक वेळी  माझ्या मागे भक्कमपणे उभे राहिलात म्हणून मी आज इथे आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात रंग घेऊन आला आहात. तुम्हाला गमावणे म्हणजे माझा मूर्खपणा ठरेल. तुमच्याबद्दल नेहमीच माझ्या मनात प्रेम होतं पण एक धागा होता ज्यामुळे मी पुढे येऊ शकत नव्हते. आज तो तुटला. आज मी मुक्त आहे म्हणून तुम्हाला विचारते, " माझ्याशी लग्न कराल?  " " 

केशवच्या डोळ्यातही पाणी होतं. त्याने मानेनेच होकार दिला आणि कावेरी केशव एकमेकांच्या मिठीत विसावले. ती मिठी ज्यात विश्वास होता. प्रेम होतं, आपलेपणा होता आणि आजन्म साथ देण्याच वचनही आणि उबही. आणि हा मिलनसोहळा माधुरी दारातून पाहत असते. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात आणि एका नवीन उगवणाऱ्या पहाटेची स्वप्नही. 

समाप्त........

संघर्ष अस्तित्वाचा १ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-1_3347

संघर्ष अस्तित्वाचा २ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-2_3384

संघर्ष अस्तित्वाचा ३ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-3_3407

संघर्ष अस्तित्वाचा ४ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-4_3437

संघर्ष अस्तित्वाचा ५ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-5_3470

संघर्ष अस्तित्वाचा ६ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-6_3500

संघर्ष अस्तित्वाचा ७ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-7_3533

संघर्ष अस्तित्वाचा ८ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sanghrsh-astitvacha-8_3575

संघर्ष अस्तित्वाचा ९ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-9_3585

संघर्ष अस्तित्वाचा १० @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sanghrsh-astitvacha-10_3608

संघर्ष अस्तित्वाचा ११ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-11_3646

संघर्ष अस्तित्वाचा १२ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-12_3697

संघर्ष अस्तित्वाचा १३ @ प्रेरणादायी कथा