Login

संघर्षाचे दुसरे नाव रेश्मा बोडके

प्रेरणादायी दर्दभरी कहाणी
संघर्षाचे दुसरे नाव रेश्मा बोडके


संघर्ष आणि वेदना
नेहमीच स्री सोसते
जिद्द व चिकाटीने
ती जीवन फुलवते

स्रीला संघर्ष काय नवा नाही पण याच संघर्षात स्री जेंव्हा खचली जाते तेंव्हा ती आयुष्यात पुन्हा उभारी घेऊ शकत नाही पण कांही स्रीया मनाने इतक्या खंबीर असतात की त्या संघर्षमय परिस्थितीवर धीराने तोंड देतात आणि जीवनात यशस्वी होतात.यामध्ये त्यांची जिद्द , सयंम , सोशिकता , कणखरता व प्रचंड उत्साह त्यांंच्यात ठासून भरलेला दिसतो.अशा स्रीया समाजात वेगळा आदर्श निर्माण करतात, त्यांचे हे ध्येर्य अनुकरणप्रिय व प्रेरणादायक असते.अशाच अकस्मात आलेल्या संकटावर मात करुन जिद्दीने जीवन जगणाऱ्या लेखिका रेश्मा बोडके या आहेत.

लहाणपणापासून रेश्माजी यांचे शिक्षण गावात झाले.नंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईला यावे लागले.गावचे शिक्षण आणि मुंबईचे शिक्षण यामधील फरक जाणवल्यामुळे येथिल शिक्षणात त्यांचे मन रमणे अवघड झाले पण ही सारी भिती रेश्माजींच्या आईने दूर केली.शिक्षणाबद्दल गोडी निर्माण करून ' तु हुशार आहेस खूप शिकशील आणि मोठी होशील ' हा विश्वास आईवडिलांनी दिल्यामुळे पुढील शिक्षणाचा ध्यास घेतला.

लहाणपणापासून डॉक्टर होण्याचे त्यांचे स्वप्न होते पण ते पुरे झाले नाही.घराला आर्थिक मदत मिळावी या हेतूने बारावी नंतर खेळण्याच्या दुकानात काम केले.यामुळे जीवन जगण्याचा अर्थ कळाला.नोकरी करत पुढील पदवी व मास्टर्सचे शिक्षण पुर्ण केले.

कोरोनारासारख्या कठिण काळात एम.बी.ए.चा अभ्यास करण फार अवघड गेलं.मुंबईसारख्या ठिकाणी एकटीच असल्याने घरातील सर्वांची आठवत त्यांना येत असे.मानसिकता बिघडली होती.अभ्यास सोडून दिला होता अशावेळी अश्वासक मैत्री कामाला आली त्यांनी धीर दिला आणि सारी नकारात्मकता दूर झाली.

एम.बी.ए.पुर्ण झाले होते घरात आईवडिलांनी लग्नाचा विषय काढला.नात्यातील मुलगा शोधला होता तो रेश्माजींचा खास मित्र होता.दोघांची लग्नगाठ
बांधली होती. लग्नकार्य पार व्यवस्थित पार पडले.सगळेजण आनंदात होते.पण नियतीला कांही वेगळेच मंजूर होते.हातावरची मेंदी अजून ताजी होती.लग्नाला दहा दिवस झाले नव्हते अशावेळी रेश्माजींच्या पती देवाने हिरावून घेतला होता. जीवनात पहिले पाऊल ठेवताना रेश्माजींना हा जबर धक्का बसला होता.जीवन जगणं असह्य झाले होते.कोणत्या आशेने जीवन जगायचं हा यक्ष प्रश्न त्यांंच्यापुढे होता.शेवटी ज्या जन्मदात्यांनी जन्म दिला त्यांच्या आठवणी त्यांना जगण्याचं बळ देतात.एका कर्तबगारी मुलीवर काळाने केलेला हा आघात दुर्दैवी होता.सारी स्वप्ने बेचीराख झाली होती पण आईवडिलांचे संस्कार व जिद्द जगण्याला आधार देत होती.रेश्माजींची आयुष्याची ही दर्दभरी कहाणी काळजाचा ठोका चुकवते.त्यांचा हा जीवनप्रवास विचारमंथन करण्यास प्रवृत्त करतो.

आयुष्याची एक लढाई हरल्यानंतर रेश्माजींनी जिद्द सोडली नाही.आजही त्या चांगल्या नोकरीत रुजू आहेत.आयुष्याच्या कडवट आठवणींचे ते ओझे उराशी कवटाळून मोठ्या हिमतीने नव्या दमाने जीवन जगत आहेत.या जीवन जगण्यामध्ये त्यांनी लेखनकला जपली आहे त्यामुळे त्यांच्या खचलेल्या मनाला दिलासा मिळाला आहे.ईरा व्यासपीठावर लेखनाचे बंध जोडताना लेखकांच्याबरोबर सदृढतेने नाते जपले आहे.

या छोट्याशा व छानशा मुर्तीची भेट यावर्षी ईराच्या नाशिकमधील गेटटुगेदरला झाली.त्यांच्याशी खूप गप्पा वा संवाद झाला.आम्ही ईरावासिय तुमच्या पाठिशी आहोत निर्धास्त रहा असा आधार दिला. हसतमुख चेहरा , विनयशिलता , आदर व सन्मानाची भावना , सर्वात मिळूनमिसळून वागण्याची त्यांची कला मनाला खूप भावली.संघर्षमय परिस्थितितीवर मात करुन जीवन कसे जगावे हे त्यांच्याकडून शिकावे.रेश्माजी तुमच्या जिद्द , संयम व सोशिकतेला सलाम …!!

तुमचे पुढील आयुष्य आनंदी व भरभराटीचे जावे आणि लेखनाच्या छंदाने तुमचे आयुष्य बहरावे हिच सदिच्छा ..!

वाढदिवसाच्या आनंंदमय शुभेच्छा …!!