Login

सून नाही ती - लेक आहे आमची ( भाग - 1 )

Sanika


         सुमतीताई सकाळ सकाळ सानिका वर ओरडत होत्या, काय ग अशी काय करते आहेस हल्ली - आज टिफिन विसरणार होतीस बघ, नशिब ह्यांनी बघितला  किचन मध्ये डब्बा आणी पटकन बाहेर तुला बघायला गेले, तर तू गाडी स्टार्ट करत होतीस म्हणून बरं झालं, अजून पाच मिनिटांनी बघितला असतं तर गाडी चालू करून गेली पण असतीस.

         सानिका आत आली आणि जरा चिडूनच बोलली... आई जरा मूड बरोबर नव्हता माझा...म्हणून विसरली..... तरीही सुमतीताई अगदी प्रेमाने बोलल्या तिच्याशी.....आत आलीच आहेस तर खाऊन जा काहीतरी - आई नको अहो मला उशीर होतोय.. अग बाळा हा उपमा खा - धर डिश - सानिका म्हणाली आई आता आणलाय म्हणून दोन - तीन चमचे  खाते आणि निघते हा....  सानिका दोन च चमचे उपमा खाऊन निघाली लगेचच, आई - बाबा चला बाय - बाय बोलून बाहेर पण पडली.

          सुमतीताई - सखारामरावांना बोलू लागल्या बरं झालं तुम्ही बघितलात टिफिन....नाहीतर पोर आज उपाशी च राहिली असती, ती कधी बाहेर च खात नाही, तीला ते खर्चिक  वाटत ना... होय अग सानिका पण ना उपाशी राहिलं पण बाहेर च खाणार नाही..... कधीतरी वेळ पडली तर खावं ना बाहेर....सखारामराव बोलले....

         सुमतीताई म्हणू लागल्या - अहो आपल्यासाठी च करते ना ती सगळं, आपल्या औषधांचा खर्च, आपली दुखणी - राघव च शिक्षण - त्याच्या क्लास ची फी, शाळेची फी,  स्कूल बस फी, घरचं सगळं - वाण सामान, लाईट बिल, फोन बिल, टीव्ही रिचार्ज, हे सर्व बिचारी एकटीच म्यानेज करते ना, त्यामुळे तीला उगाचच नाहक खर्च करणं नको वाटत अहो...तुम्ही एका प्रायव्हेट शाळेत शिक्षक होतात, त्यामुळे तशी आपली खास अशी काहीच सेविंग पण नाही - आपण होता नव्हता तेवढा सर्व पैसा  पारस च्या शिक्षणा वर खर्च  केला.. आता आपण पण हतबल आहोत अहो, आपली तीला कसलीच मदत  नाही आहे... याचंच वाईट वाटत....

          इकडे सानिका ऑफिस ला पोचली, आणि स्वतः च्या डेस्क वर बसून विचार करू लागली, आईवर उगाचच चिडली मी आज त्या बिचाऱ्या माझ्या काळजीने च बोलत होत्या ना... मी पण ना.. त्यांना सांगू का शकली नाही..... कि ..मोनोपॉज मुळे माझी चिडचिड होते हल्ली...त्यांना पण वाईट वाटल असणार, पण त्या मला बोलणार नाहीत.... बाबांना पण वाईट वाटल असणार ते एवढे बाहेर डब्बा घेऊन आले आणि मी आत जावून आईंवर चिडले...

          आणि विचार करता करता सानिका च्या डोळ्यात पाणी आलं.... तेवढ्यात ऑफिस बॉय - चहा  घेऊन आला, आणि मॅडम तुमचा चहा  असं बोलल्यावर ती पटकन भानावर आली...आणि पुन्हा काम करू लागली.. दुपारी लंच टाइम ला सानिका ची मैत्रीण तीला म्हणाली आज अपसेट दिसते आहेस, काही झाले आहे का घरी - तेव्हा मात्र सानिका ला राहवलं नाही आणि ती तिच्या मैत्रिणीला - स्वाती ला बोलली, अग आज आईंवर चिडले पटकन मी... आता मला च वाईट वाटतंय. 

          सानिका बोलू लागली - पारस सोडून गेल्यावर आई - बाबांनी च सावरले आहे अग मला, नाहीतर मी कोलमडून पडली होती.. हे माझ्या च नशिबात का... असं सारखं देवाला म्हणत होती... पण आई - बाबा होते म्हणून पुन्हा उभी राहिली आहे.... नाहीतर आत्महत्या करावी का इथपर्यंत विचार येत होते मनात.... पण छोट्या राघव कडे बघून गप्प राहीले, राघव साठी आणि आई - बाबांसाठी मी जगावं ह्या पुढे....... असं ठरवून पुन्हा धीर करून सर्व गोष्टींना सामोरी गेले...

          पारस का असा वागला ग, काय चुक होती माझी.....आई - बाबांची कि तो असा आम्हाला सोडून निघून गेला... मी एक चांगली पत्नी, एक चांगली सून, चांगली आई - ह्या सर्व भूमिका अगदी प्रेमाने निभावत होते ना गं.....पण का मग मी त्याला अशी अचानक आवडेनाशी झाले, काय चुकत होत माझं... ह्याच उत्तर तर आजपर्यंत मला मिळालं नाही आहे....

          मी सून म्हणून आले तेव्हा मी परजातीची  (पंजाबी ) - त्यात मराठी बोलायला पण नीट येत नव्हते, कारण आमच्या घरी आम्ही हिंदी च बोलत असू..... पारस बोलला होता कि आई - बाबांना हे माझं प्रेमप्रकरण पटणार नाही.... ते आपल्या लग्नाला संमती देणार नाहीत- त्यापेक्षा पळून  जावून लग्न करू  म्हणजे तुला डायरेक्ट घरी नेले कि ते तुला स्वीकारतील.... पण तसं झाले नाही -आम्ही घरी गेल्यावर आई - बाबा काहीच बोलले नाहीत माझ्याशी.... माझा गृहप्रवेश पण न करता रागाने आत निघून गेले...

        जवळ जवळ एक महिना गेला त्यांचा राग निवळायला.. पण मी धीर सोडला नाही, मी रोज काही ना काही कारण काढून आई - बाबांशी बोलायला जायची... आणि मग एक महिन्याने माझ्या पहिल्या संक्रातीला आई - बाबा...दोघं जावून दुकानातुन मला साडी घेऊन आले... आणि मग माझं पाहिलं हळदी - कुंकू अगदी थाटात केलं त्यांनी..पूर्ण बिल्डिंग ला आमंत्रण दिल होत आईनी....पारस पण खुश झाला...आणि मग खऱ्या अर्थाने आमचा  संसार सुरु झाला.. आम्ही सगळे छान बोलू लागलो...मस्त चहा, डिनर एकत्र घेऊ लागलो गप्पा मारत  मारत... घरं  अगदी आनंदी होत आमचं... मला पण हळू हळू मराठी बोलायला येऊ लागलं.. पण बघ ना हे आता काय होऊन बसलंय अग... सानिका रडू लागली...

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - सगळं छान  असताना अस काय घडलं  कि ज्यामुळे आज सानिका दुःखी आहे.....)

( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )

( राहणार - देवरुख - रत्नागिरी )

( कथा आवडल्यास जरूर लाईक करा...)

0

🎭 Series Post

View all