Login

सून नाही ती- लेक आहे आमची ( भाग - 4 )

Sanika


      (   मागच्या  भागात आपण पहिले - सानिका ला पारस चं वागणं खूप विचित्र वाटत असत - पण तो असा का वागतोय हे तीला काहीच समजत नसतं....... आता पुढे....)

         सानिका ला आता पारस वर संशय  येऊ लागतो. त्यामुळे ती आता मनातल्या मनात विचार करते कि आपण आता पारस च्या हालचालीनं वर लक्ष ठेवूया...पारस  घरी असल्यावर मोबाईल कुठे ही ठेवत नसे, तो मोबाईल त्याच्या बरोबर चं घेऊन फिरत असे, त्यामुळे सानिका ला त्याचा गुपचूप मोबाईल पण बघता येईना...

          सानिका आता पारस वर बारीक लक्ष ठेवून राहात असते. पारस कसल्या तरी टेन्शन मध्ये आहे हे मात्र नक्की असं तीला वाटत असत. म्हणून मग ती विचार करते ही हल्ली पारस सारखं नाव घेतो ती स्नेहल कोण आहे ते शोधून काढूया..

        पारस ला आता ऑफिस मध्ये मोठी पोस्ट आणि त्याला प्रमोशन मिळालं चं पाहिजे काहीही करून अशी त्याची वृत्ती बनत चालली होती...त्यामुळे तो हे मिळवण्यासाठी काहीतरी चुकीचं तर करत नाही आहे ना, अशी शंका  सानिका च्या मनात येते... आणि मग पुन्हा आठ दिवसांनी पारस  तीला बोलतो मला पुन्हा मागे गेलेलो ना पुण्याला तिथे मीटिंग ला जायचं आहे. पण ह्यावेळी चार दिवस जायचं आहे... सानिका ओरडून बोलते अरे हे दर महिन्यात कसली तुझी मीटिंग असते रे ती पण पुण्याला...

         सानिका चा चिडलेला स्वर पाहून पारस शांत होतो आणि बोलतो अग प्रमोशन जवळ आलंय  ना त्यासाठी तिकडच्या ब्रँच च्या ऑफिस मध्ये कामं असत हल्ली.....

           पारस च्या वागण्यात बदल होत नसतो.. सानिका ला काय करू हेच समजत नसते.. आणि असंच  एक दिवशी पारस वॉशरूम  ला गेलेला असतो तेव्हा त्याच्या मोबाईल वर व्हॉट्सअप वर पाठोपाठ मेसेज येत असतात तेव्हा पटकन सानिका जाऊन मेसेज बघते, तर स्नेहल चे मेसेज असतात... पैसे  पाठव, मी वाट बघतेय... प्लीज रिप्लाय.... पारस...

        सानिका विचार करू लागते ही काय भानगड  आहे पैश्याची... एकतर ही कलीग स्नेहल सरळ सरळ पारस ला अरे,- तू रे करतेय, तो बॉस आहे ना तिचा प्रोजेक्ट साठी..मग सर का बोलत नाही आहे...ही मुलगी पारस ला कशात अडकवून तर ब्लॅक मेल करून पैसे उकळत नाही आहे ना त्याच्याकडून... कि ही फसवतेय हिचे वडील आजारी आहेत असं... अशे नको नको ते विचार सानिका च्या मनात येऊ लागतात...

        पारस च्या ऑफिस मधलं  तसं सानिका च्या जास्त कोणीच ओळखीचं नसतं त्यामुळे चौकशी तरी कोणाकडे करावी, हा पारस पण नीट काहीच सांगत नाही आहे... सानिका ला ह्यातून कसं सोलुशन काढू असं होत...सानिका सासू ला बोलून बघते - आई हल्ली पारस गप्प गप्प असतो जास्त बोलत नाही ना घरात असं सानिका सासू ला बोलून बघते तर त्या बोलतात अग त्याला काम जास्त आहे ना हल्ली त्यामुळे तो त्याच्यात व्यस्त असेल म्हणून तुला तसं वाटतंय...

      सानिका ला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही म्हणून मग ती एक दिवशी रात्री पारस झोपल्यावर त्याचा मोबाईल चेक करते तर तीला त्यात व्हॉट्स अप मेसेज मध्ये -   पारस आणि स्नेहल चे आक्षेपार्ह फोटो दिसतात... सगळे फोटो पारस ने चं स्नेहल ला पाठवलेले असतात..... सानिका खूप हादरते... पारस आणि स्नेहल मध्ये हे काय चालू आहे, अफेअर कि काय.. सानिका ला रडायला येत.. तेवढ्यात पारस ला जाग आल्यासारखं तीला वाटत म्हणून ती मोबाईल गुपचूप होता त्या जागेवर ठेवून देते...

        सानिका दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पारस शी बोलत नव्हती, तीला काय आणि कसं हे प्रकरण  कळेल ह्याच विचारात ती असते. सासू तीला येऊन बोलते पण डोळे का सुजलेत तुझे - झोप झाली नाही का कि पारस बरोबर भांडलीस रात्री, रडल्यासारखे डोळे दिसतायत बघ... सानिका नाही ओ आई काहीच नाही.. राघव  झोपत चं नव्हता रात्री लवकर त्यामुळे त्याला खेळवत  बसली म्हणून उशिरा  झोप लागली असं उत्तर देऊन ती गप्प बसते...

         सानिका ठरवते कि आज रात्री आई - बाबांन समोर पारस ला उभ  करायचं आणि सरळ विचारायचं कि हे काय चालू आहे... ती संध्याकाळी पारस ऑफिस मधून आल्यावर त्याला बोलते तुझं काही कामं असेल ऑफिस चं तर ते आटपून घे, मला आई - बाबा आणि तुझ्याशी महत्वाचे बोलायचं आहे, पारस विचारतो काय झाले तुला अशी रागात का बोलते आहेस  त्यावर सानिका बोलते कळेल रात्री...

       सानिका आई - बाबांन समोर पारस ला सांगते कि मला तूझ्या आणि स्नेहल च्या नात्याबद्दल शंका आहे तर तू स्पष्टीकरण देणार आहेस कि - मी मला काय समजलं  आहे ते मी सांगू... पारस सानिका च्या ह्या प्रश्नाने पूर्ण गोंधळून जातो आणि बोलतो अग सानिका माझी काहीच चुक नाही आहे ती स्नेहल चं माझ्या पाठी लागली आहे... पण सानिका ला त्याचं हे उत्तर पटत नाही...

( सानिका बोलते मी फोटो बघितले आहेत तुमच्या दोघांचे तूझ्या मोबाईल मध्ये तरी पण तू अजून खोटं चं बोलतो आहेस...हे ऐकून मात्र पारस च्या चेहऱ्यावरचा रंग चं उडतो....)

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - पारस काय स्पष्टीकरण देतो ते ह्या नात्याबद्दल....)

0

🎭 Series Post

View all