( मागच्या भागात आपण बघितलं - स्नेहल सर्व खरं काय ते सानिका ला सांगते आता पुढे...)
स्नेहल निघताना सानिका ला बोलते.....ताई प्लीज तुम्ही त्या पारस ला आज मी तुम्हाला काय बोलली ते सांगू नका, नाहीतर माझी नोकरी जाईल.... सानिका बोलते - स्नेहल तू आता काळजी चं करू नकोसं मी तुझं नाव न घेता आता त्या पारस चं पितळ कस उघड पाडते बघ... दुसऱ्या च्या मुलीच्या शरीराला हात लावायची लाज कशी वाटली नाही त्याला - आपली बायको पण कोणाची तरी मुलगीच आहे हे पण त्या नीच माणसाच्या मनात आले कसे नाही हेच कळत नाही आहे मला... अशा नराधम माणसाला शिक्षा ही झालीच पाहिजे.... तू बघ मी दोन चं दिवसात काय करते ते आता ते ऑफिस वाले त्या पारस आणि त्याच्या मित्राला ऑफिस मधून काढतील तुला नाही...... मला दोन दिवस दे मी विचार करते आणि माझ्या सासू ची पण मदत घेते ह्यात....आम्ही दोघी मिळून नक्कीच ह्या नालायक माणसांना धडा शिकवू....
सानिका - घरी येते, पारस आधीच आलेला असतो तिला आल्या आल्या विचारतो काय बोलली ग ती स्नेहल - सानिका खोटं सांगते कि ती बोललीय मी पुन्हा पैसे मागणार नाही मी तीला चांगलीच झापलीय ती पुन्हा तूझ्या नादी लागणार नाही.... पारस मनातल्या मानत बोलतो - म्हणजे ती स्नेहल काही बोलली नाही... कशी बोलेल - नोकरी हवीय ना तीला.....
सासू - सासरे पण विचारतात - सानिका मिटलं ना ग एकदाच हे प्रकरण - सानिका बोलते हो आई - बाबा - मुलगी तशी चांगलीच आहे ती पण पारस ची पण चूक होती ना.... आई - बाबा हो ह्या पारस ला बडबडलं पाहिजे असं बोलतात....
दुसऱ्या दिवशी सकाळी सानिका जाणूनबुजून डोकं दुखल्याच नाटक करते आणि पारस ला बोलते कि मी आज ऑफिस ला जात नाही आहे माझं डोकं खूप दुखतय असं.. तो हा आराम कर मग आज असं बोलून ऑफिस ला जातो......
सानिका पारस ऑफिस ला गेल्यावर बेडरूम बाहेर येते आणि पटकन दरवाजा लावून घेते आणि सासू - सासर्यांना बोलते - आई - बाबा आज मी मुद्दामुन घरी राहिली आहे...तुम्ही दोघं जण माझ्याबरोबर बेडरूम मध्ये या मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे... ते दोघे पण अचंबित होतात... काय सांगायचं आहे ते पण आत जावून - तर सानिका बोलते....हॉल मध्ये बोललो तर कोणीतरी बाहेर - आजूबाजूला असेल तर ऐकायला जाईल... त्यामुळे आत बेडरूम मध्ये बसून निवांत बोलू.....
सानिका - सासू - सासर्यांना कालचा स्नेहल ने सांगितलेला वृंतात सांगते... आणि विचारते तुम्हीच सांगा आता काय करायचं - सासू पटकन बोलते - माझा मुलगा असला पारस म्हणून काय झालं... त्या बिचाऱ्या बिन आई च्या पोरीच्या शरीराशी असं खेळायचं कां - त्याला शिक्षा झालीच पाहिजे....बिचारी ती आर्थिक परिस्थिती ने गांजलेली पोर म्हणून तीला असा त्रास द्यायचा कां.... तिची बाजू ऐकायला कोणीच नाही म्हणून आणि तीला नोकरी सोडता येत नाही वडिलांच्या आजारपणा मुळे....त्या गोष्टीचा हे दोन नराधम फायदा घेतायत काय....
सासरे बोलतात काय करणार आहेस तू आपल्या एकुलत्या एक मुलाला जेल ची हवा खायला पाठवणार आहेस कां.... सासरे बोलतात त्याला समज देऊन बघूया आधी..... पण सासू बोलते नाही मी सानिका च्या बाजूने आहे हे असली वृत्ती असलेली मुलं - उदया त्या स्नेहल च्या जागी दुसरी कोण मुलगी आली नोकरीला तर तिचा पण गैरफायदा घेतील... मी त्याला माफ करू शकत नाही... उदया अजून कोणतरी त्याच्या ह्या प्रकाराला बळी पडण्यापेक्षा आजच ह्यावर उपाय केला पाहिजे... नाहीतर असली वृत्ती असलेला हा मुलगा आज - उदया अजून मुलींना असा त्रास देतच राहिलं...
सासू बोलते.......मी आई असली त्याची आणि मला मुलगी नसली तरी - मी पण कोणाची तरी मुलगीच आहे.... त्यामुळे माझा एकुलता एक मुलगा असला तो म्हणून काय झालं असल्या विकृत प्रवृत्ती ला आळा बसलाच पाहिजे....बरेचदा कोणीच घाबरून आवाज उठवत नाही त्यामुळे ह्या विकृतीला आळा बसत नाही....सानिका तू चं सांग आता काय शिक्षा करायची ते त्या दोघांना....
सानिका बोलते त्याला शिक्षा करायचीचं...पण त्या स्नेहल चं नाव कुठेच घ्यायचं नाही आपण....ती बिचारी गरीब मुलगी तिच्या नावाला उगाच कलंक नको भविष्यात....सासू पण बोलते हो बरोबर आहे....सानिका तू काय ठरवलं आहेस असं सासू बोलते...
सानिका सांगते आई - पहिलं तर आपण पारस जिथे उतरतो - म्हणजे ज्या हॉटेल ला... तिथलं सी सी टीव्ही फुटेज मागवून घेऊ त्या हॉटेल चा नंबर किंवा त्यांचं कार्ड स्नेहल कडे आहे कां ते तीला विचारून घेते... म्हणजे प्रूफ होईल.. सासू बोलते अग पण तिथे सी सी टीव्ही नसले तर - सानिका बोलते आई विचारून तरी बघते.. बरेचदा ह्या मोठ्या हॉटेल मध्ये छुपे कॅमेरे लावलेले असतात...स्नेहल कडून आताच त्या हॉटेल चा नंबर आहे कां ते विचारते आणि सानिका स्नेहल ला कॉल करते...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - सानिका कसं हे सर्व पारस चं पितळ उघड पाडते ऑफिस मध्ये सर्वान समोर )...
( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )
( राहणार - देवरुख - रत्नागिरी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा