"निलू आम्ही दोघं तुला किती दिवस पुरणार आहोत गं? एकदा अरिंजयने दिलेल्या प्रस्तावाचा विचार कर ना. तुझ्यासारखा काय तुझ्यापेक्षा जास्त नावाजलेला वकील आहे. घरदार, आर्थिक स्थिती सारेकाही चांगले आहे. तो तुझ्यासकट पिल्लूला पण accept करतोय ना. काल तर पिल्लू बोलत होती की काल त्याने खास तिच्यासाठी तिला आवडते म्हणून वेगवेगळ्या देशांच्या रंगीबेरंगी नकाशाची पुस्तकं आणली पण तू ती परत दिली. " निलांजनाची वहिनी श्वेता तिला फोनवर सांगत होती.
"वहिनी अरिंजय एक माणूस म्हणून खूप चांगला आणि सज्जन माणूस आहे. तो पिल्लूला, स्पृहाला खूप जीव लावतो पण हे कसे विसरू शकते की पुढे जाऊन तो तिचा सावत्र बाप असेल. आणि सुबोध त्याने जर काही मोडता घातला....."असे बोलून तिने आवंढा गिळला.
"अगं तुला कळत कसे नाहीये. तो सुबोध, त्याचे तर आधीच लग्न झालेले असताना विवाहबाह्य संबंध होते त्याचे त्याच्या सेक्रेटरीशी... अगं आपल्या स्पृहामध्ये आणि त्याच्या आणि त्याच्या सेक्रेटरीच्या मुलामध्ये पण मोजून तीन महिन्यांचे अंतर आहे. तू सुबोधला घटस्फोट देऊन ते घर सोडून आली त्याला चार वर्षे झाली. एकदा तरी तुझ्याकडे ढुंकून पाहीले आहे का ? तो त्याच्या बायको आणि मुलामध्ये गुंतला आहे. आम्हाला स्पृहा आणि तू जड नाही झालात पण मलाही वाटते ना की माझ्या भाचीला बापाचे प्रेम मिळेल. जेव्हा तुझे दादा मुकुंदाला तुझ्या भाच्याला जवळ घेतात तेव्हा तिच्या चेहर्यावर उमटलेले भाव मी पाहते गं." असे बोलून श्वेता निलांजनाचा फोन ठेवते.
फोन ठेवताच निलांजनाने मागे वळून पाहीले तर तिची पाच वर्षांची इवलीशी लेक तिच्या पायात फाटलेले साॅक्स घालत होती.
"स्पृहा थांब बाळा, हे काय socks फाटला आहे. तू तसाच घातला आहे. पायाला रॅश होतात तुझ्या. आज तू sandal घाल. मी बाईंना सांगते. सायंकाळी आपण तुझ्यासाठी socks घेऊ.." निलांजना काळजीने तिच्या लेकीला बोलली.
"डोन्ट वरी आई... मी socks मध्दये टिश्यू पेपर ठेवला त्यामुळे socks फाटले हेही कळणार नाही आणि पायाला रॅश पण येणार नाही." स्पृहा बोलली.
"अरे वाह माझं पिल्लू खूप हुशार आहे इतकं कसं शहाणं झालं माझं बाळ...." निलांजना कौतुकाने लेकीला बोलली.
"अगं आई ही आयडीया माझी नाही. अरिंजय अंकलची आहे. त्या दिवशी तुझ्या बर्थडेला आलेला बघ तो. तू आणि मामी आत होते. तेव्हा मी पाहीले त्याचे पाय. त्याच्या एका पायाचा socks मोठ्या बोटाच्या भागावर फाटला होता. मी विचारले तुझ्याकडे पैसे नाहीत का ? तेव्हा तो बोलला नको त्या गोष्टीत विनाकारण पैसे खर्च करण्याची गरज नसते. तर त्याने मला आयडीया आली. He is my favorite. आई अरि अंकलची आई मिन्स ताराआजी काल मला बोलत होती की ती आज इडियप्पम बनवणार आहे तर तिने मला आणि तुला रात्री बोलावले आहे जेवायला. आपण जायचे का ??" स्पृहाने हळूच आवाजात आईला विचारले.
"पिल्लू अरिंजय अंकल आपले नातेवाईक नाहीत फ्रेंड आहेत त्यांना असं सारखं त्रास देणं योग्य नाही. आणि ताराआजीचे वय झाले आहे ना.. तिला सारखा त्रास देणं चुकीचं आहे." असे बोलून तिने लेकीचा गालगुच्चा घेतला आणि तिला कडेवर घेऊन घराबाहेर पडली.
~ऋचा निलिमा
क्रमशः
~ऋचा निलिमा
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा