सांज वेडी भागली....(भाग -२)

The Case Of Custody
पिल्लू अरिंजय अंकल आपले नातेवाईक नाहीत फ्रेंड आहेत त्यांना असं सारखं त्रास देणं योग्य नाही. आणि ताराआजीचे वय झाले आहे ना.. तिला सारखा त्रास देणं चुकीचं आहे." असे बोलून तिने लेकीचा गालगुच्चा घेतला आणि तिला कडेवर घेऊन घराबाहेर पडली.

    निलांजनाने तिला शाळेत सोडले आणि तिच्या चेंबरमध्ये येऊन बसली. तर एक जवळपास तिच्याच वयाची स्त्री एका लहान मुलीला  मांडीवर घेऊन बसली होती.

    "वकील  मॅडम मी तुमच्याकडे खूप आशेने आली आहे. काहीही काहीही करून मला माझ्या मुलीची कस्टडी हवी आहे. त्या माणसाकडून माझी कोणतीही अपेक्षा नाही मी माझ्या मुलीला एकटीने सांभाळण्यासाठी सक्षम आहे. तुम्ही फक्त तिची कस्टडी मला द्या मी जेवढे पैसे ठरवले आहेत, ते आत्ताच्या आत्ता तुम्हाला देईल." निलांजना समोर बसलेली बाई अक्षरशा केविलवाणी होऊन मुलीच्या कस्टडीसाठी झगडत होती.

     "हे बघा मिसेस प्रणाली दानवे तशी तुमची मुलगी दोनच वर्षांचीच आहे आणि मुले सात वर्षांची होईपर्यंत त्यांची कस्टडी त्यांच्या आईकडेच असते म्हणून तिची कस्टडी मी सहजपणे तुम्हाला देऊ शकते पण तुमचे मिस्टर साकेत दानवे हे आर्थिक दृष्ट्या तुमच्यापेक्षा जास्त सक्षम असल्याने ती सात वर्षांची झाल्यावर ऑटोमॅटिकली तिची कस्टडी तिच्या वडिलांकडे जाऊ शकते म्हणून मी सुनवाई आधी विरोधक  वकिलांसोबत बसून एक counselling करावे लागेल त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. मी तर म्हणते तुम्ही तुमच्या मिस्टरांशी एकदा संवाद साधावा. तुम्ही दोघेही एका MNC कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहात. Well educated आहात. तुमच्या  मुलीला आई वडील दोघांची गरज आहे. दोन वर्षे झाली केस रखडत आहे." ती समजावण्याच्या सुरात बोलत होती.

   "नाही मॅडम, आता त्याचा काही उपयोग नाही. मुळात त्या माणसाला आधी मुल नको होते. डबल इन्कम नो किड असे धोरण होते त्याचे. लग्नाला सहा वर्षे होऊन खोटा  वांझोटेपणाचा कलंक घेऊन वावरत होते. देवाची कृपा की काय एक दिवस आमचे नकळत जास्त प्रेम बहरले आणि माझी श्रिया माझ्या आयुष्यात आली. तरीही ह्या माणसाला तिच्याबद्दल काहीच वाटत नव्हते. घरात दोन दोन पुतणे, त्यांना हा कायकाय घेऊन यायचा. आणि माझं पाळण्यातल्या पिल्लूसाठी साधा खुळखुळा आणला नाही की पाळणा झुलवला नाही. सगळे आधीच मुलगी म्हणून तिच्याशी नीट वागत नव्हते. त्या दिवशी हा तिच्या पाळण्याजवळ बसून दारूचे घोट रिचवत  होता ते पाहून मी त्याच क्षणी घर सोडले. असो जे काही होते ते झाले, मला माझं बाळ हवंय फक्त.. येते मी." असे बोलून ती डोळ्यातील अश्रू पुसत चेंबरबाहेर निघून गेली.

    एक क्षण निलांजना सुन्न तिच्या खुर्चीवर बसली. एक मोठा निश्वास टाकून तिने तिच्या असोसिएटला विचारलं "मिस्टर अँड मिसेस दानवे केस मध्ये विरोधक वकिलांचे नाव काय आहे कळले का?"
 
   त्यावर तिची असोसिएट उत्तरली ,"एडवोकेट सुबोध दीक्षित हे मिसेस मिस्टर दानवे यांचे वकील आहेत."
~ऋचा निलिमा
क्रमशः

🎭 Series Post

View all