Login

सांज वेडी भागली...(भाग -४)

Arinjay Propose Nilianjana
Relax निलांजना.. माझं काम झालंच आहे आजचं. मला आज evening court आहे. माझे घर शाळेच्या वाटेतच आहे. तिला घरी सोडतो मी. आई आहे घरी. फक्त तिचे parent card दे मला" अरिंजय बोलला.

"अरे पण उगीच तिच्यामुळे काकूंना त्रास.. ती एकेक प्रश्न विचारून डोकं भंडावून सोडते." निलांजना काळजीत बोलली.

"काय डोकं भंडावून सोडत नाही ती. आणि त्या दोघींचं खूप गुळपीठ जमतं. तू काळजी नको करूस." असे बोलून तो निलांजनाला फाईल देतो आणि तिच्या हातातील पॅरेंट कार्ड घेऊन निघून जातो.

  एकीकडे तिच्या मुलीची काळजी घेणारा अरिंजय आणि दुसरीकडे एका पक्षकाराशी गप्पा मारणारा तिचा भूतपूर्व नवरा सुबोध किती तो विरोधाभास होता.

  तितक्यात एक मुलगा सुबोधपाशी येऊन त्याच्या पायाशी बिलगला. सुबोधने त्याला कडेवर घेतले तसे तो त्याच्याशी तक्रारीच्या स्वरात बोलला,"डॅडू , आज मम्मा ना आजीच्या घरी गेली. मला सोबत पण घेतले नाही. मी तिच्याशी कट्टी आहे."

   "आयुष बेटा असं नाही बोलायचं. आजीला दवाखान्यात न्यायचे होते. तिथे तुला डॉक्टरांनी टुचूक केले तर." असे बोलून त्याने त्या मुलाच्या पोटाला गुदगुल्या केल्या आणि दोघे हसत होते.

  निलांजनाने त्या मुलाकडे पाहीले तर त्याचा चेहरा तिला हुबेहुब स्पृहासारखा वाटला. जणू तिच्या लेकीलाच पाहत होती. शेवटी त्या मुलाचा आणि तिच्या लेकीचा बाप एकच तर होता. ज्याने तिच्या आयुष्याचं वाटोळं करून स्वतः दुसरा  गुण्यागोविंदाने दुसरा संसार मांडून आनंदात आयुष्य जगत होता.

  तसे बघितले तर अरिंजयच्या घरची  परिस्थिती सुबोधपेक्षा खूप चांगली होती. पण अरिंजयमध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार नव्हता. याउपर त्याच्या आईसकट त्याचे पूर्ण कुटुंब स्पृहाला खूप प्रेम करत होते. आणि अरिंजयसाठी निलांजनाचे स्थळ दस्तुरखुद्द त्याची आई आणि मोठी वहिनीच घेऊन आल्या होत्या. तिने एक दिर्घ श्वास घेऊन कामाला सुरूवात केली इतक्यात तिचा फोन वाजला. अरिंजयच्या वहिनीचा फोन होता.

   "हॅलो प्रेरणा ताई बोला ना." निलांजनाने विचारले.

   "अगं जय भावोजींनी पिल्लूला घरी सोडले हेच सांगायला फोन केला. त्यांना कुठे ते consumer court ला जायचे होते म्हणून घाईत होते. ते बोलले की वहिनी तुम्ही निलांजनाला निरोप द्या. ती आत्ता जेवतेय. नंतर मी तिला झोपवेल. तू काळजी नको करूस. " असे बोलून तिने फोन ठेवला.

   "का करत आहेस अरिंजय तू आमच्यासाठी ? " तिने घट्ट मिटले आणि केविलवाण्या सुरात मनातल्या मनात पुटपुटली.

     सायंकाळी ती घराजवळ पोचली तर अरिंजय स्वतः सोसायटीच्या मैदानात एका बाकावर बसून  स्पृहाला लुडो शिकवत होता. स्पृहा तिच्या अरि अंकलच्या प्रत्येक सुचनेचे तंतोतंत पालन करत होती. तिची चार वर्षांची मुलगी जी घरात एकही क्षण शांत बसत नाही ती खेळताना मन एकाग्र करतेय हे पाहून तिच्या कोपरखळीतून हास्याची लकेर उमटली. 

    "आई हे बघ अरि अंकल माझ्यासाठी नवीन चेस बोर्ड घेऊन आला. त्या दिवशी माझा चेस बोर्ड चुकून मुकुंद दादाकडून खराब झाला म्हणून." स्पृहा कुतूहलाने आईला सांगत होती. 
निलांजनाला ठाऊक होते अरिंजय अंकल असला की तिची लेक दोन तीन तास तरी घरी येणार नव्हती म्हणून तिने घराकडे पाऊल वळवले तोच अरिंजयने तिला अडवले.

"निलांजना...!
क्रमशः
0

🎭 Series Post

View all