"वा! मिस्टर साकेत वा..! तुम्हाला कोर्ट कचेरी खेळ वाटतो का? डिव्होर्स तुम्हीच फाईल केला होता ना. आता इतक्या दिवसांनी तुम्हाला मुलीची आणि बायकोची आठवण येत आहे. आधी तुम्ही त्यांच्याशी कसे वागलात ते आठवत नाही तुम्हाला?" तिने जरा गुश्यातच त्याला विचारले.
"मॅम मी खूप चुकलो. आठ वर्षांचा होतो तेव्हा आई गेली. पंधराव्या वाढदिवसाच्या तीन दिवस आधी बाबा गेले. दादा आणि ताई माझ्यापेक्षा वयाने बरेच मोठे. ते सांगतील तीच पूर्व दिशा समजायचो. शिष्यवृत्तीधारक म्हणून मी माझं शिक्षण पूर्ण केले. बाबांचा वा दादाचा एकही रूपया मी माझ्या शिक्षणासाठी वापरला नाही. वहिनीची दोन बाळं सांभाळून अभ्यास करावा लागायचा नाहीतर दादा मारेल याची भिती होती. कंटाळा यायचा पण वहिनी गोड बोलून माझ्याकडून काम करवून घेत होती. कळत होतं पण काही वळत नव्हतं. नोकरी करू लागलो तेव्हा दादा ताई माझे पैसे मागायचे आपल्या मुलांची नावे घेऊन. कमावता झालो त्यांच्या मुलांवर खूप खर्च होतो म्हणून स्वतःसाठी पैसे उरत नाहीत. म्हणून मी प्रणालीच्या प्रेमात पडून लग्न केले पण मुल नको होतं. श्रीया झाली तसे घरचे खूप चिडचिड करायचे. तिला खूप वाईट शब्दाने हडतूड करायचे. मी पण त्यांच्याच तोंडून घास खाणारा माझं प्रेम आणि माझं बाळ बाजूला ठेवून घरच्यांच्या म्हणण्यानुसार वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण मला घरच्यांची खेळी कळली. मागच्या महिन्यात एकदा दादा आणि वहिनी स्वयंपाकघरात बोलत होते आणि मी नेमका माझ्यासाठी काॅफी बनवण्यासाठी स्वयंपाकघराच्या बाहेर असताना त्यांचे शब्द माझ्या कानावर पडले. दादा वहिनी त्यांच्या एका मुलाला मला दत्तक म्हणून देण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून माझी संपत्ती त्यांच्या मुलाला मिळावी आणि आणि दादा चांगलं कमावतो पण माझ्याइतका नाही. त्या दोघांनाही चांगलेच ठाऊक आहे की प्रणाली किती स्वाभिमानी आहे. ती बाळासाठी माझ्याकडुन एकही रूपया घेणार नाही. मी वेगळं स्वतःच घर घेऊन राहत आहे आता." तो डोळे पुसत बोलला.
"पण ही गोष्ट तुम्ही प्रणालीला स्वतःहून का सांगत नाही. तुमच्या वकिलांशी बोलून पहा. तुम्ही स्वतःहून बोललात तर कदाचित प्रणाली पण ऐकतील." निलांजना बोलली.
"अहो मॅम.. मि. दिक्षित तर डिव्होर्स मागे घेऊ नये असा सल्ला देत आहेत. आज पाचवी हिअरिंग झाली. तिसरी हिअरिंग झाली तेव्हापासून सांगतोय त्यांना. ते माझं ऐकत नाहीयेत. त्याचंया मते मी मी जरा जास्तच भावनिक होऊन निर्णय घेत आहे आणि मी पुन्हा त्या बंधनात अडकू नये. आणि प्रणालीचं म्हणाल तर मी बाळाला कडेवर घेतले तेव्हा ती तिथून बाहेर निघून गेली. एक मिनिटभर वेळ घालवत नाही ती माझ्यासोबत. बोलणं तर दूरची गोष्ट आहे. ती का ऐकेल माझं." तो काकुळतीने बोलला.
"मि. दानवे काळजी नका करू. आपण एकत्र बसून बोलूया या विषयावर. आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून आणि तुमच्या बाळापासून कुणीच दूर करणार नाही." असे बोलून ती समोर पाहते तर मिसेस दानवे उभ्या होत्या. नेमके त्यांनी शेवटचेच वाक्य ऐकले होते.
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा