सांज वेडी भागली...(भाग-७)

Mr And Mrs Danave Happy With Baby Danave
  "मि. दानवे काळजी नका करू. आपण एकत्र बसून बोलूया या विषयावर. आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून आणि तुमच्या बाळापासून कुणीच दूर करणार नाही." असे बोलून ती समोर पाहते तर मिसेस दानवे उभ्या होत्या. नेमके त्यांनी शेवटचेच वाक्य ऐकले होते.

   "मॅम मी तुम्हाला माझ्या बाजूने केस लढण्यासाठी पैसे देतेय आणि तुम्ही माझ्याच विरूद्ध.... खूप मोठी चूक केली मी तुम्हाला माझी केस देऊन. का बोलावलं तुम्ही याला इथे ? तुम्हाला ही केस रखडत ठेवायची आहे ना. जेणेकरून मी महिन्याला देणारी भरगच्च फी बंद होईल. " मिसेस दानवे रागातच आतमध्ये शिरत निलांजनावर ओरडली.

    "प्रणा थांब..! मी ॲड. निलांजना यांच्याकडे आलो. मला तुम्ही दोघी हव्या आहात म्हणून. एकदा ऐकून तरी घे माझे." मि. दानवे डोळ्यात पाणी आणून बोलत होते.

   "साकेत आता ऐकल्यासारखे काय राहीले आहे ? तू सारे  काही घडलेच नाही असे वागतोय. मला माहीत नाही तू श्रीयाला भेटायचे नाही." मिसेस दानवे बोलल्या.

   "प्रणा तुला माझी शपथ प्लीज ऐकून घे एकदाच. नंतर तू जो निर्णय घेशील मला मान्य आहे." मि. दानवे काकुळतीने बोलले.

  मिसेस दानवे काहीच न बोलता खुर्चीवर बसल्या. जी चर्चा निलांजनासमोर झाली ती त्यांनी  ते सविस्तर बायकोला सांगितले. खरं तर चुक झाली होती मि. दानवे यांच्याकडून पण ते त्यांची चुक मान्य केली होती.

  मि. दानवे खुर्चीवरून उठून मिसेस दानवे यांच्या पायाशी गुडघ्यावर बसले आणि त्यांचा हात हातात घेऊन बोलले, "प्रणाली तुला ठाऊक आहे. दादावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला आणि फसलो. पण मी एकटा पडलोय गं. मी दारू सोडली आता. मला तुम्ही दोघी हव्या आहात. माझं बाळ हवंय. मला तू हवी आहेस."

मिसेस दानवे यांना गहिवरून आले. त्या खुर्चीवरून उठल्या तसे मिस्टर दानवे पण खुर्चीवरून उठले. त्यांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली.

  "श्रीया कुठे आहे..?" मिस्टर दानवे यांनी डोळे पुसतच विचारले.

  "बाहेर आहे. तिला सांभाळायला एक मावशी असतात. त्यांच्या खांद्यावर झोपली. मी सामान सोबत घेऊन तिला घरी आणते थोड्या वेळाने..." त्यांनीही डोळ्यातील पाणी टिपत उत्तर दिले.

    "नाही नको. सामानाची गरज नाही. मी सगळं नवीन आणेल बाळासाठी. तुझं सामान तुझा भाऊ उद्या परवा घेऊन आला तरी चालेल." मि. दानवे बोलले.
क्रमशः

🎭 Series Post

View all