Login

सांज वेडी भागली...(भाग-८)

Niranjan Anger
निलांजनाचे आभार मानून दोघेही चेंबरबाहेर गेले. मिस्टर दानवे आपल्या इवल्याश्या लेकीसोबत खेळत गाडीत बसले आणि हे दृश्य पाहून निलांजनाचेही डोळे पाणावले आणि डावीकडे पाहता अरिंजय आणि सुबोध दोघेही उभे होते. उगीच माझा वेळ या केसमध्ये घालवला या अविर्भावात सुबोध तणतणत त्याच्या चेंबरला निघून गेला पण मिस्टर दानवे आणि त्यांच्या बाळाकडे कौतुकाने बघणारा अरिंजय आपल्या कामासाठी निघून गेला तरी निलांजनाच्या डोळ्यासमोरून हटत नव्हता.
 
      आज सायंकाळी सात वाजेपर्यंत कोर्ट होते म्हणून तिने लेकीची रवानगी वहिनीकडे केली. तिचा भाऊ आणि वहिनी त्यांच्याच सोसायटीत पण दुसर्‍या विंगमध्ये राहत होते आणि पाळणाघर पण सोसायटीतच असल्याने ती निश्चिंत होती. घड्याळात पाचचे टोल पडत होते आणि तितक्यात तिच्या भावाचा विडीओ काॅलआला.  मागून स्पृहाच्या डोक्यावर छोटेसे बॅन्ड एड आणि रडवेला  आवाज ऐकून तिच्या काळजात धस्स झाले. नीट निरखून पाहीले तर ती अरिंजयच्या मिठीत हुंदके देत रडत होती.

निलांजनाचा भाऊ :- अगं निलू घरी ये ना. पिल्लू पडली. किंचितच लागलं आहे तिला, पण आता तिला आई हवी आहे.

निलांजना :- हो दादा... मी लगेच येते. पण तिला कसे काय लागले?

निलांजनाचा भाऊ :- अगं काही नाही. मुकुंदाची सायकल घेऊन चालवत होती ती आणि तितक्यात अरिंजय आला आणि तिने सायकलवरून न उतरता त्याच्याकडे झेप घेतली. दोघांचा ताळमेळ चुकला आणि....

निलांजना (भावाचे बोलणे मध्येच तोडत) :- दादा थांब मी घरी येऊनच बोलते.

    थोड्या वेळाने निलांजना भावाच्या घरी जाते तर घराला भलेमोठा टाळा होता. स्पृहा अरिंजयच्या घरी असेल तिला कळून चुकले होते. ती गुश्यातच अरिंजयच्या घरी पोचली आणि दारावर थाप न देता घरात जाते. घरात जाताच पाहते तर तिची वहिनी आणि अरिंजयची वहिनी, दोघांचे भाऊ, अरिंजयची आई सारे डायनिंग टेबलवर चहा घेत बसले होते. दुसरीकडे अरिंजय स्पृहाला आपल्या छातीशी घट्ट कवटाळून सोफ्यावर बसला होता. ती पण तिच्या आवडत्या अरि अंकलच्या कुशीत शांत झोपली होती. 
क्रमशः

🎭 Series Post

View all