सांज वेडी भागली...(भाग-३)

The Past Confront
त्यावर तिची असोसिएट उत्तरली ,"एडवोकेट सुबोध दीक्षित हे मिसेस मिस्टर दानवे यांचे वकील आहेत."

   एडवोकेट सुबोध दीक्षित हे नाव ऐकून क्षणभर थांबवून ती तिच्या असोसिएट कडे बघू लागली. ती पुढे काही बोलणार इतक्यात तिच्या चेंबरच्या दरवाजावर कोणीतरी ठोठावण्याचा आवाज आला ती वरती न पाहता आत या असे बोलली.

  " तू मिसेस दानवे यांच्या बाजूने केस लढत आहेस ना " हे वाक्य ऐकून तिने चमकून वर पाहिले तर तो उभा होता. तब्बल चार वर्षांनी त्याला असे समोरासमोर पाहून तिला भांबवल्यासारखे वाटत होते काय बोलावे कसे बोलावे तिला काही सुचत नव्हते. तसा तोही कोर्टातच असायचा पण लेकीची कस्टडी नको म्हणून तिला टाळायचा. पण आज  मात्र तो नेहमीसारखा ऐटीत डोळ्यात चमक ठेवून तिच्याशी जणू काही घडलेच नाही अशा अविर्भावात बोलत होता.

तिचे काही बोलणेही बोलणे न ऐकता तो बोलला, "निलांजना जर तुला ही केस आऊट ऑफ कोर्स सेटलमेंट करायची असेल तर मी तुला साथ द्यायला तयार नाहीये. मिस्टर दानवे केस मागे घ्यायला तयार आहेत पण मुलगी त्यांना मिळेल याच अटीवर. मिसेस दानवे स्वतःचा हेका सोडत नाहीयेत त्यांना सांग मुलीला दे नवर्‍याकडे पाठवून. त्या जितक्या सुखसोई देतील त्याच्या कैक पटीने जास्त वैभव मिस्टर दानवे त्या मुलीला देतील..."
  
       त्यावर ती बोलली " जर मिसेस दानवे यांनी मुलीला देण्यास नकार दिला तर?"  त्यावर तो उत्तरला, "कम ऑन निलांजना मी एक तुझ्यापेक्षा पाच वर्ष सीनियर वकील आहे आणि खास करून मी कस्टडी लॉयर आहे हे विसरू नकोस मिस्टर दानवे यांना त्यांची मुलगी हवी आहे आणि तिची कस्टडी मी आरामशीर त्यांना मिळवून देऊ शकतो आणि हे तू पण जाणतेस सो ऑल द बेस्ट..." नेहमीच्या रुबाबात तो चेंबर बाहेर निघून गेला निलांजना मात्र त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत बसली होती.

   दिवसभरात ती कामात व्यस्त होती पण तितक्यात तिच्या लक्षात आले की स्पृहाला शाळेतून आणायचे होते. आज पाळणाघराला सुट्टी होती. ती पटापट फाईल आवरून बाहेर पडताच अरिंजय तिच्यासमोर उभा होता.

  "निलांजना हे दराडे corporater चा रिपोर्टची नोटरी जज साहेबांनी अर्ध्या तासात सादर करायला सांगितली आहे." त्याच्या हातातील फाईल तिच्यासमोर धरत बोलला.

तसेच ती कपाळावर हात मारून बोलली, "अरे देवा.. पिल्लू? तिची शाळा सुटेल आता. आज पाळणाघरात कुणीच नाही तिला वहिनीकडे सोडायचे होते पण ती जाॅबला असेल आणि आता चेंबरमध्ये कुणीच नाही."

"Relax निलांजना.. माझं काम झालंच आहे आजचं. मला आज evening court आहे. माझे घर शाळेच्या वाटेतच आहे. तिला घरी सोडतो मी. आई आहे घरी. फक्त तिचे parent card दे मला" अरिंजय बोलला.
क्रमशः
~ऋचा निलिमा

🎭 Series Post

View all