Login

सांज वेडी भागली....(भाग -५)

Out Of Court Settlement
"निलांजना...!

  "निलांजना ऐक ना. मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला माहीत आहे तुला काय भिती आहे. की सावत्र बाप काय प्रेम देईल मुलाला.. पण मी तुम्हा दोघींवर खूप प्रेम करतो. माझ्यासाठी नाही तर पिल्लूसाठी..." अरिंजय बोलला.

   त्याचे वाक्य तोडत निलांजना बोलली, "स्पृहा... स्पृहा नाव आहे तिचं. तिला त्याच नावाने हाक मारायची. पिल्लू बोलण्याचा हक्क फक्त तिच्या घरच्यांनाच आहे. आणि प्लीज तिच्यात जास्त involve होऊ नकोस."
असे बोलून ती स्पृहाचा हात पकडून खेचत तिला घरी घेऊन गेली आणि इकडे अरिंजय हताश होऊन लुडो हातात घेऊन कितीतरी वेळ बसला होता.
    
      दिवस सरत होते तसे निलांजनाचे कामही वाढत होते. अरिंजय आणि तिची नजरानजर होत होती. पण बोलत कुणीच नव्हते. अरिंजय पण स्पृहाला दुरूनच पाहत होता. लेकीला सांभाळत कामाकडे लक्ष देणे अवघड असले तरी निलांजनासाठी ते अशक्यप्राय कधीच नव्हते. दानवेंच्या केसमध्ये तिने स्वतःला इतके झोकून दिले होते की दुसर्‍या केस बघायलाही तिला सवड नव्हती. अर्थात तिला तिच्या कामाचे पैसे अगोदरच मिळाले होते पण तिला एका आईला तिच्या बाळापासून दूर करायचे नव्हते. त्या इवल्याशा श्रीयामध्ये तिला तिच्या स्पृहाचे बालपण आठवत होते.

  एके दिवशी ती बाकिच्या केसेस नमूद केलेली डायरी डोळ्याखालून काढत होती. काही वेळाने दारावरची थाप ऐकून तिची तंद्री भंगली आणि तिने वर मान करूस पाहीले तर मि. दानवे उभे होते. ते हळूच तिच्या टेबलापाशी येऊन उभे राहीले.

  "मॅम माझ्यात त्राण उरले नाहीत. प्लीज मी खुर्चीवर बसतोय." असे बोलत तो मटकन खुर्चीवर बसला.

  निलांजनाला त्याचे हे रूप अचंबित करणारे होते. कारण केसच्या हिअरिंगला घरापासून मोजून एक किमी अंतरावर असलेल्या फॅमिली कोर्टात नेहमी सुटाबुटात स्वतःच्या Lexus मध्ये येणारा माणूस तिच्यासमोर केविलवाणा बसला होता.

    "मॅम साॅरी मी असे अचानक तुम्हाला येऊन भेटत आहे.  तुम्ही प्रणाच्या लाॅयर आहात. तिला समजवा ना मला ती आणि पिल्लू दोघी हव्या आहेत. तुम्ही परवा तिला बोलल्या तेव्हा तिने लगेच पिल्लूला माझ्या कडेवर दिले. आधी देतच नव्हती. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मला माझं बाळ हवं." बोलता बोलता त्याला गहिवरून आले.

    "वा! मिस्टर साकेत वा..! तुम्हाला कोर्ट कचेरी खेळ वाटतो का? डिव्होर्स तुम्हीच फाईल केला होता ना. आता इतक्या दिवसांनी तुम्हाला मुलीची आणि बायकोची आठवण येत आहे. आधी तुम्ही त्यांच्याशी कसे वागलात ते आठवत नाही तुम्हाला?" तिने जरा गुश्यातच त्याला विचारले.
क्रमशः

🎭 Series Post

View all