संजना..

कविता मैत्रणी के लिए.
संजना,
तू अशी एक मुलगी..
सुंदर जशी असावी खान रत्नाची ..
सौंदर्यवती तू रुपवती तू...
जशी अप्सरा इंद्र दरबारची...
....
तुझं मन ते निर्मळ
स्वभाव तो अवखळ
अल्लडपणा लावतो त्याला
चार चाँद...
...
तुझं हास्य ते गोजिरं..
तुझ्या नयनातलं तेज ते सुखवद..
भुरळ पाडे कुणालाही एका क्षणात..
...
तुझं बोलणं ते मधापरी..
तुझा स्वभाव तो गोड जसा..
बेळगावचा कुंदा स्वादिष्ट छान..
....
तू भेटली जेव्हा पहिल्यांदा..
घातलेला तो ड्रेस पिवळा..
आणि झाला करार आपल्या मैत्रीचा..
तो दिवस वाटतो मला भाग्यवान..
...
असावी एक मैत्रीण अशी..
जीच्या असल्याने हसाव आपण निखळ..
होती इच्छा नकळत मनाची..
तू भेटली इच्छा पूर्ण झाली..
यातच आनंद वाटतो माझिया मनाला पुरेपार..
...
.
.
© सुनिध सोहमे