Login

संजोग.. (भाग 1)

Sanjog story of tina

                       संजोग 

टीना  बेटा उठ लवकर स्कूल ला जायला वेळ होत आहे.. तुझे बाबा तयार होऊन वाट बघत आहे.. टीना ची आई टिनाला उठवत असताना बोलत असते..                                     

  काय ग आई झोपू दे ना... टीना                                              स्कूल मध्ये कोण जाणार... टीना ची आई.                               उठली..ठीक आहे....  टीना       

टीना स्कूल मध्ये असते 5 std ला.. टिनाचे वडील एका खाजगी कंपनीत जॉब करत असतात.. सॅलरी कमीच असते त्यामुळे मुलीला कॉन्व्हेंट मध्ये टाकण्याची ईच्छा असून सुद्धा पैसे नसल्यामुळे गव्हर्नमेंट स्कूल ला टाकतात.. टीना अभ्यासात खूप हुशार असते.. पहिली पासन तिचा आतापर्यंत दरवर्षी तिचा क्लास मधनं 1 नंबर येत असतो..     

टीना अभ्यासात जेवढी हुशार तेवढीच मस्ती करण्यात सुद्धा.. स्कूल मध्ये चुकून कोणी तिला परेशान केल तर त्यांना कस सरळ करायच हे तिला कळत होत..एक दिवस स्कूल संपल्यानंतर तिच्याच क्लास ची मुले तिला परेशान करत होती तिला राग आला आणि तिने खाली असलेला दगड उचलला आणि एकाला मारला त्या मुलाच्या डोक्याला लागल.. रक्त लागल सर्व ओरडायला लागले.. स्कूल टीचर्स त्यामुलाला हॉस्पिटल ला घेऊन गेले.. त्याची ट्रीटमेंट केली. दुसऱ्या दिवशी स्कूल च्या मुख्याध्यापकानी  टीना च्या आईवडिलांना स्कूल मध्ये बोलावून घेतले आणि सर्व सांगितले व हे ही म्हणाले कि टीना खूप हुशार आहे पण ती नेहमीच काही ना काही  प्रॉब्लेम निर्माण करत असते.. आता जे घडलं हे पुन्हा न व्हायला पाहिजे ह्या करिता तुम्ही टीना करिता नवीन स्कूल बघा.. आम्ही तिला इथे नाही ठेऊ शकत.. टीना च्या आईवडिलांनी खूप प्रयत्न केला स्कूलमध्ये टीना ला ठेवण्याकरिता पण काहीच झालं नाही.. 

टीना च्या आईवडिलांना टेन्शन आलं कि आता काय करायच.. तिला कोणत्या स्कूल मध्ये पाठवायचं.. टिनाला घरी खूप ओरडा पडला पण तिला ह्याच काहीच वाटायचं नाही.. 

 टिनाच्या आई ला आठवलं कि त्यांच्या एका नातेवाईकांनी सांगितले होते कि एक स्कूल आहे जिथे हॉस्टेल पण आहे तिथलं वातावरण खूप स्ट्रिक्ट असत.. पण मस्तीखोर मुले तिथे सुधारतात.. पण ते स्कूल त्यांच्या सिटी मध्ये नव्हत ते बाहेर सिटी मध्ये होते.. 

    टिनाचे आईवडिल टिनाला घेऊन तिथे जातात आणि त्यांना सर्व सांगतात.. हे सर्व ऐकून तिथल्या मॅडम म्हणतात कि.. तुम्ही काळजी करू नका.. आम्ही तिला इथे ऍडमिशन देतो आणि इथल्या वातावरण ती पूर्ण बदलून जाईल.. 

  टिनाची ऍडमिशन तिथे होते.... पण टिनाच्या आईला भीती पण वाटत असते कि ते टिनाची काळजी घेणार कि नाही.. मुलीला आजपर्यंत कर्धीच दूर न केल आणि आता इतक्या दूर कशी राहील..                                                                                         टिनाचे वडील टिनाच्या आईला समझवतात.. पण टीना तिथे राहण्याकरिता नकार देते आणि रडते सुद्धा.. पण टिनाच काहीच चालत नाही.. टिनाला सोडून असं जाताना टिनाची आई पण खूप रडते.. 

   तिथल्या   मॅडम   टीनाला तिच्या रूम मध्ये घेऊन जातात... आणि तिथलं रुटिंग समझवून सांगतात.. पण टिनाला खूप राग आलेला असतो.. मॅडम गेल्यानंतर ती तीच सामान बघते.. तिला राग येतो तर बॅग मधले सर्व कपडे फेकफाक करते.. तिच्या रूम मध्ये अजून एक मुलगी असते.. ती टीनापेक्षा मोठी असते.. टिनाला असे बघून ती टिनाच्या जवळ जाते आणि तिला शांत करते तीच सर्व फेकलेल सामान तिला आणून देते.. 

हा होता संजोग च्या पहिला भाग.. कृपया वाचून स्टोरी छान वाटली असेल तर लाईक आणि कंमेंट्स करा.. दुसरा भाग लवकरच येईल... 

🎭 Series Post

View all